Thursday 22 March 2018

वृद्धत्व विरोधी वैद्यकीय व नैसर्गिक उपचार याविषयी डॉ पूर्णिमा म्हात्रे मार्गदर्शन



यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबईच्या महाराष्ट्र महिला व्यासपीठतर्फे वृद्धत्व विरोधी वैद्यकीय व नैसर्गिक उपचार याविषयी मोफत व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे होते. २२ वर्ष स्वत: त संशोधन करून तयार केलेल्या औषधांनी रूग्णांवरती कशा पध्दतीने उपचार केले, आणि काम करत असताना आलेले अनुभव डॉ पूर्णिमा म्हात्रे यांनी उपस्थितांना सांगितले. 

प्रख्यात मेडीकल कॉस्मोलोजीस्ट डॉ पूर्णिमा म्हात्रे यांच्या मुंबईमध्ये क्लिनिक जॉरजेअस नावाच्या ब-याच ठिकाणी शाखा आहेत. या शाखांमध्ये मुंबईतील विविध ठिकाणाहून उपचारांसाठी लोक येत असतात. चेह-यावरचे डाग, केस गळणे, वजन कमी करणे आणि बदलत्या शैलीनूसार फीट राहणे यासाठी माझा सल्ला घेऊन उपचार घेत असतात असं म्हात्रे म्हणाल्या.

वैद्यकीय आणि नैसर्गिक उपचारानंतर रूग्णांवरती २२ वर्षांच्या कालावधी मध्ये काणताही साईड इफेक्ट झाला नाही. तसेच उपचारानंतर रूग्ण खूष होतात. असंही म्हात्रे त्यांनी सांगितलं. विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी अचूक उत्तरेही दिली.

No comments:

Post a Comment