अंबाजोगाई : बालसाहित्य लिहिण्यासाठी साहित्यीकांनी पुढाकार घ्यायला हवा कारण साहित्यातून कल्पना शक्ती विकसित होते आजची मुले स्मार्ट आहेत. तेंव्हा ’शामची आई’ या कथेची नव्या स्वरूपाने मांडणी करणे गरजेची आहे. अशा संमेलनातून सृजनशीलतेला वाव मिळतो. विज्ञानवादी साहित्य निर्मिती करणे काळाची गरज असून विज्ञान डोळसपणा शिकविते तर कला जीवन सौंदर्य खुलवते असे प्रतिपादन उद्घाटक दिपाताई देशमुख यांनी केले. तर यावेळी मोबाईलकडे जादूचा दिवा म्हणून बघा.कारण, मोबाईलमध्ये विश्व सामावले आहे. साहित्य जगण्याच भान देतं. जगण समृद्ध करत हे सांगुन बालकांनी साहित्य वाचल पाहिजे, जे वाटेल ते लिहिलं पाहिजे असे विचार संमेलनाध्यक्ष बालाजी मदन इंगळे यांनी मांडले. तर यावेळी स्वागताध्यक्ष म्हणून बोलताना डॉ.द्वारकादास लोहिया यांनी साने गुरूजी यांची आठवण करताना मुलांमध्ये देव बघणे हा नवा दृष्टीकोण असल्याचे सांगुन या संमेलनात हस्त लिखीत, टाकावूतून टिकावू वस्तूंची निर्मिती व त्याचे प्रदर्शन भरविल्याबद्दल संमेलन आयोजकांचे अभिनंदन केले.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान,मुंबई केंद्र अंबाजोगाई व मानवलोक संचलित मनस्विनी महिला प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने २ रे जिल्हास्तरीय बाल कुमार साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे.
यावेळी स्वागताध्यक्ष म्हणून डॉ.द्वारकादास लोहिया,उद्घाटन म्हणून दिपाताई देशमुख व संमेलन अध्यक्ष म्हणून बालाजी मदन इंगळे, संमेलन कार्यवाह अभिजीत जोंधळे,डॉ.दीपाताई क्षीरसागर,माजी आ. उषाताई दराडे,मानवलोकचे अध्यक्ष अशोकराव देशमुख,यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान अंबाजोगाईचे सचिव डॉ.नरेंद्र काळे, मनस्विनी प्रकल्पच्या प्रा.अरुंधती पाटील,वेणूताई चव्हाण कन्या शाळेच्या मुख्याध्यापक प्रतिभाताई देशमुख, बालसाहित्यीक नागनाथ बडे आदींची विचार पिठावर प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी गोदावरी कुकुंलोळ कन्या शाळेतील मुलींच्या संचाने स्वागत गीत सादर केले. मान्यवरांच्या हस्ते लोकनेते यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस अभिवादन करून दिपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी मान्यवरांचे स्वागत स्मृती चिन्ह, फेटा, शाल व मुलांनी तयार केलेल्या गुच्छांनी करण्यात आले.
प्रास्ताविक करताना संमेलन कार्यवाह अभिजीत जोंधळेयांनी ग्रंथ दिंडीत शहरातील १२ शाळा मधील सुमारे दिड हजाराहून अधिक विद्यार्थी सहभागी झाल्याचे सांगुन या समेलनाच्या यशस्वीतेसाठी मानवलोक, मनस्विनी महिला प्रकल्प व वेणुताई कन्या माध्यमिक विद्यालय तसेच यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान,मुंबई केंद्र अंबाजोगाई यांचे सहकार्य लाभले अंबाजोगाईत वर्षभर विविध व्याख्यानमाला होतात बालझुंबड सारखा उपक्रम ही घेतला जातो. कुमारवयीन मुलांसाठी असे संमेलन असावे या कल्पनेतून मुलांच्या सर्वांगिण विकासाबरोबरच समतोल विकास झाला पाहिजे. कुमारवयीन मुलांना केंद्रस्थानी ठेवून त्यांच्यातील सृजनशीलता वाढीस लागावी म्हणून हा उपक्रम संमेलन रूपाने होत असल्याचे जोंधळे म्हणाले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते साहित्याचा स्नेह पेरणार्या हस्तलिखीतांचे प्रकाशन व आदीत्य सतिष आगळे या इयत्ता ८ वर्गात शिकणार्या विद्यार्थ्यांच्या ’अक्षराचं लेण’ या हस्तलिखीत कविता संग्रहाचे प्रकाशन करण्यात आले.
या प्रसंगी उद्घाटक म्हणून बोलताना दिपाताई देशमुख यांनी आपले मौलिक विचार मांडून मातृभाषेतून विद्यार्थ्यांची जडण-घडण होते. अशा संमेलनातून सृजनशीलतेला वाव मिळतो. कल्पना शक्ती विकसित होते. हे सांगुन त्यांनी संमेलनाच्या यशस्वी आयोजनाबद्दल संयोजकांचे अभिनंदन केले. तर संमेलन अध्यक्ष बालाजी मदन इंगळे यांनी आपल्या विविध कवितांचे सादरीकरण केले. उपस्थित विद्यार्थीनींनी त्यांना भरभरून दाद दिली. कवितेच्या वळीवर सभागृहाने ठेका धरला. तर ’मेल नाही आजूण आभाळ’ ही कविता सादर करून शेतकरी आत्महत्येचा संदर्भ देवून बालाजी इंगळे यांनी सभागृहाला आंतःर्मुख केले. उद्घाटक डॉ.द्वारकादास लोहिया यांनी बालसाहित्यातून कसदार निर्मिती व्हावी व जबाबदार समाज घडावा यासाठी शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी माजी आ. उषाताई दराडे यांनी मानवता हाच धर्म असल्याचे सांगुन आपल्या मनातले बोलता आले पाहिजे. असे त्या म्हणाल्या. लोकनेते यशवंतरावजी चव्हाण,खासदार शरदचंद्रजी पवार व खासदार सुप्रिया सुळे यांचा उल्लेख करीत यांच्यासारखे समाजभान असलेले नेतृत्व महाराष्ट्राला सांस्कृतिक व सामाजिकदृष्ट्या पुढे नेत असल्याचे त्यांनी सांगितले.तर दिपाताई क्षीरसागर यांनी लहान मुलांचे भाव विश्व जाणून घेवून साहित्यी निर्मिती झाली पाहिजे. हे सांगत मुलांचा बुद्धांक वाढला पण भावनांक कमी झाला आहे. विज्ञान विषयक साहित्य निर्मिती झाली पाहिजे. असे मौलीक विचार त्यांनी मांडले. उपस्थितांचे आभार मानताना डॉ.नरेंद्र कांळे यांनी संमेलनाच्या आयोजनाची रूपरेषा मांडली. या संमेलनातून बाल साहित्य निर्मितीला प्रोत्साहन मिळेल असे महत्वपुर्ण विचार डॉ.नरेंद्र काळे यांनी व्यक्त केले.
यावेळी सभागृहात अमर हबीब,बालाजी सुतार,डॉ.श्रीहरी नागरगोजे, संतराम कराड,प्रा.वैशाली गोस्वामी,श्रीकांत देशपांडे,सखा गायकवाड,प्रा.विष्णु कावळे,मुजीब काझी, प्रा.अनंत मरकाळे, डॉ.राहुल धाकडे,प्रविण ठोंबरे,अॅड.जयसिंग चव्हाण,परिवर्तन साहित्य चळवळीचे अध्यक्ष प्रा.गौतम गायकवाड, विद्याधर पांडे,डॉ.मुकुंद राजपंखे,डॉ.देवराज चामनर,अनंतराव चाटे, भारत सालपे,विवेक गंगणे, पत्रकार रणजित डांगे,विजय हामिने, रोहिदास हातागळे, मुशीरबाबा,विकास गरड, नंदकुमार पांचाळ, उत्तम शिनगारे,दत्ता वालेकर,वैजनाथ शेंगुळे,दत्ता देवकते आदींची यावेळी उपस्थिती होती.हे बाल कुमार साहित्य संमेलन अंबाजोगाई बसस्थानकासमोर वेणूताई चव्हाण कन्या माध्यमिक शाळेच्या परिसरात आयोजित करण्यात आले आहे.या संमेलनात शालेय विद्यार्थ्यांचे कवी संमेलन,कथाकथन, ग्रंथदिंडी,हस्तलिखित स्पर्धा,पुष्पगुच्छ बनवणे स्पर्धा,शब्द कोडी स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.
संमेलनाच्या यशस्वीतेसाठी स्वागत समिती सदस्य प्रा.अरुंधती पाटील, गणपत व्यास,सुवर्णा लोमटे मॅडम,डॉ नरेंद्र काळे,नामदेव गुंडाळे, भागवत मसने,ज्योती भोसले,बन्सी पवार आश्विनी कुमार मुकदम, उषा रामधामी,प्रभावती अवचार व गणेश कदम यांनी पुढाकार घेतला आहे.
No comments:
Post a Comment