नाशिक : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिक व विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक, विश्वास ज्ञानप्रबोधिनी अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक, सारस्वत बँक व रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने‘चित्रपट चावडी’ उपक्रमांतर्गत शनिवार 6 जानेवारी 2018 रोजी सायंकाळी 6.30 वाजता सुप्रसिद्ध कॅनेडियन दिग्दर्शक अॅटम एगोयान यांचा ‘द स्वीट हिअर आफ्टर’ हा चित्रपट दाखविण्यात येणार आहे. सदर चित्रपट डिझास्टर मॅनेजमेंट अॅण्ड ट्रेनिंग हब (विश्वासलॉन्स), ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास को-ऑप.बँकेसमोर, सावरकरनगर, गंगापूर रोड, नाशिक-422013 येथे दाखविण्यात येणार आहे.
कॅनेडियन दिग्दर्शक अॅटम एगोयान यांना भारताच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2017 मध्ये जीवनगौरव हा सर्वोच्च सन्मान प्रदान करण्यात आला. इजिप्शीयन आर्मेनियन वंशाचे एगोयान कॅनेडातील तसेच जागतिक पटलावरचे महत्त्वाचे दिग्दर्शक मानले जातात.
‘द स्वीट हिअर आफ्टर’ ह्या त्यांच्या चित्रपटात कॅनडातील एक छोट्या गावात स्कूल बसच्या अपघातात अनेक मुले मृत्युमुखी पडतात. एक वकील त्या गावातील लोकांसाठी विशेषत: ज्यांची मुले त्या अपघातात वारली त्यांना मदत करण्यासाठी येतात. परंतु त्यामुळे त्या छोट्या गावातील सर्वांचेच जीवन ढवळून निघते. दिग्दर्शकाने एका फार मोठ्या शोकांत अनुभवातूनसुद्धा एक आशेचा सहवेदनेचा फुंकर घालणारा सुर लावला आहे ते पहाण्यासाठी अवश्य या. 1997 मध्ये कॅनडा येथे प्रदर्शित झालेल्या या सिनेमाचा कालावधी 112 मिनीटांचा आहे.
‘द स्वीट हिअर आफ्टर’ हा चित्रपट बघण्यास जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन अध्यक्ष विनायक पाटील, कार्याध्यक्ष विश्वास ठाकूर, सचिव डॉ.कैलास कमोद, कोषाध्यक्ष डॉ.सुधीर संकलेचा, सदस्य सौ.कविता कर्डक, राजवर्धन कदमबांडे, रऊफ पटेल, अॅड.नितीन ठाकरे व विक्रम मोरे यांनी केले आहे.

No comments:
Post a Comment