यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबईच्या नवमहाराष्ट्र युवा अभियानातर्फे दरवर्षी दिल्या जाणा-या ‘यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा सामाजिक व क्रीडा पुरस्कार २०१७’ चा सोहळा कल्चरल सेंटर, सिंह्गड इन्स्टिट्यूट कॅम्पस, सिंह्गड रोड, वडगाव, पुणे येथे संपन्न झाला. या कार्यक्रमाला प्रतिष्ठानच्या कार्याध्य़क्षा सुप्रिया सुळे, श्री. अजित निंबाळकर यांची प्रमुख उपस्थिती होती. पुरस्काराचे यंदाचे एकोणिसावे वर्ष असल्याने कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात गर्दी होती.
सन २०१७ सालचा‘यशवंतराव चव्हाण विशेष युवा क्रीडा पुरस्कार’ भारतीय हॉकीपटू आकाश चिकटे (हॉकी), तर या वर्षीचा ‘यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा क्रीडा पुरस्कार – युवक व युवती’ क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल मोहम्मद नुबैरशेख (बुद्धिबळ) व किशोरी शिंदे (कबड्डी) यांना तर सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल सतीश सिडाम (ताडोबा वनक्षेत्रात आदिवासी हक्कासाठी कार्यरत) व कृपाली बिडये (हिजडा आणि ट्रान्सजेन्डर समूहासाठी कार्यरत)यांना ‘यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा सामाजिक पुरस्कार, सर्व पुरस्कार प्रतिष्ठानच्या कार्याध्य़क्षा सुप्रिया सुळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानची स्थापणा झाल्यापासून समाजातल्या वेगवेगळ्या घटकांसोबत काम करण्याचा प्रयत्न आम्ही सातत्याने करत असतो. तसेच कै. यशवंतराव चव्हाण साहेबांची अपूरी राहिलेली स्वप्नं यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मागील ३० वर्षांपासून महाराष्ट्रातल्या सगळ्या घटकांसोबत राहून करण्याचा प्रयत्न करत आहे, असे प्रतिष्ठानच्या कार्याध्य़क्षा सुप्रिया सुळे सांगितले. नंतर ताईंनी शिक्षण क्षेत्रात प्रथम नामक संस्थेचा उल्लेख करून त्यांच्या कार्याचे कौतूक केले.
No comments:
Post a Comment