नाशिक : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिक व विश्वास को-ऑप. बँक लि. नाशिक, विश्वास ज्ञानप्रबोधिनी अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक, सारस्वत बँक व रेडिओ विश्वास ९०.८ कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘चित्रपट चावडी’ उपक्रमांतर्गत शनिवार १६ डिसेंबर २०१७ रोजी सायंकाळी ६.३० वाजता सुप्रसिद्ध फिनलँड दिग्दर्शक अकी कौरीस्माकी यांचा ‘ल हावर’ हा चित्रपट दाखविण्यात येणार आहे. सदर चित्रपट डिझास्टर मॅनेजमेंट अॅण्ड ट्रेनिंग हब (विश्वासलॉन्स), ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास को-ऑप.बँकेसमोर, सावरकरनगर, गंगापूर रोड, नाशिक ४२२०१३ येथे दाखविण्यात येणार आहे.
फिनलँडचे चित्रपट दिग्दर्शक अकी कौरीस्माको ह्यांच्या तीन चित्रपटांच्या मालिकेतील हा शेवटचा चित्रपट.
‘ल हावर’ ह्या चित्रपटाचे कथानक उत्तर फ्रान्समधील ल हावर बंदरात घडते. आफ्रिकेतील अनेक देशातून लोक अनधिकृतपणे युरोपातील अनेक देशामध्ये आश्रय घेऊ पाहतात. इद्रीस हा गॅबन मधून आलेला कुमारवयीन मुलगा व मार्सेल हा बुटपॉलीश करून पोट भरणारा वृद्ध यातील ही आश्वासक, उबदार कथा, मार्सेल, इद्रीसला त्याच्या आईला भेटविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतो ते पहाण्यासाठी अवश्य या. २०११ मध्ये फिनलँड येथे प्रदर्शित झालेल्या या सिनेमाचा कालावधी ९३ मिनिटांचा आहे.
‘ल हावर’ हा चित्रपट बघण्यास जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन अध्यक्ष विनायक पाटील, कार्याध्यक्ष विश्वास ठाकूर, सचिव डॉ. कैलास कमोद, कोषाध्यक्ष डॉ. सुधीर संकलेचा, सदस्य सौ. कविता कर्डक, राजवर्धन कदमबांडे, रऊफ पटेल, अॅड. नितीन ठाकरे व विक्रम मोरे यांनी केले आहे.

No comments:
Post a Comment