नाशिक : समाज सुसंस्कृत होण्यासाठी व समाजमनाची विधायक जडणघडण होण्यासाठी आपल्या संस्कृतीचा अध्यात्मिक परंपरेचा शोध घेण्यासाठी अध्यात्मिक पुस्तकांचे, संत चरित्रांचे वाचन करणे गरजेचे आहे. त्यातून सत्वशील समाज निर्माण होण्यास निश्चितच मदत होईल. असे प्रतिपादन विश्वास को-ऑप. बँकेचे संस्थापक अध्यक्ष विश्वास जयदेव ठाकूर यांनी केले.
विश्वास ग्रुप, रविवार कारंजा गणेशोत्सव मंडळ, रेडिओ विश्वास ९०.८ कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने गणेश चतुर्थी निमित्त रविवार कारंजा येथे मोफत अध्यात्मिक पुस्तकांचे वाटप करण्यात आले. त्याप्रसंगी श्री. विश्वास ठाकूर बोलत होते. ठाकूर म्हणाले की, वाचन संस्कृती वाढविण्याबरोबरच नव्या पिढीला विचारांची व संस्कारांची जोड देण्यासाठी पुस्तके मोलाची भूमिका बजावत असतात.
याप्रसंगी ‘ग्रंथ तुमच्या दारी’ योजनेचे शिल्पकार विनायक रानडे, रविवार कारंजा गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पवार, कार्याध्यक्ष पोपटराव नागपूरे, सेक्रेटरी रविंद्र पाटील आदी उपस्थित होते. यावेळी मराठी, हिंदी धार्मिक परंपरेतील अनेक महत्त्वपूर्ण ग्रंथाचे, संदर्भ ग्रंथांचे, मासिकांचे वाटप करण्यात आले. पुस्तक वाटप प्रसंगी अनेक भाविकांनी या अभिनव उपक्रमाचे कौतुक केले व म्हणाले की या पुस्तक वाटपातून अनेक चांगली व माहितीपर पुस्तके आम्हाला मिळाली आहेत.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रितेश पवार, तुकाराम नागपूरे, वृषाल कहाणे, जगदीश भुजबळ, जुवलेकर मॅडम, सचिन हांडे, कैलास सुर्यवंशी, ज्ञानेश्वर शिरसाठ आदींनी परिश्रम घेतले.

No comments:
Post a Comment