यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय महाविद्यालयीन
नियतकालिक स्पर्धा – २०१७ साठी अंक पाठविण्याचे आवाहन
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई व नवमहाराष्ट्र युवा अभियान यांचा उपक्रम
नियतकालिक स्पर्धा – २०१७ साठी अंक पाठविण्याचे आवाहन
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई व नवमहाराष्ट्र युवा अभियान यांचा उपक्रम
दरवर्षी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई व नवमहाराष्ट्र युवा अभियान यांच्या वतीने राज्यातील उत्कृष्ट महाविद्यालयीन नियतकालिकास यशवंतराव चव्हाण पारितोषिकाने सन्मानित केले जाते. प्रथम पारितोषिक रु. १०,०००/- चा धनादेश, द्वितीय पारितोषिक रु. ७,०००/- चा धनादेश, तृतीय पारितोषिक रु. ५,०००/- चा धनादेश, उत्तेजनार्थ दोन पारितोषिक रु. १,०००/- प्रत्येकी, स्मृतीचिन्ह व सन्मानपत्र असे पारितोषिकाचे स्वरूप आहे.
राज्यातील विद्यार्थ्यांच्या विचारांचे आणि भावनांचे प्रतिबिंब असंख्य महाविद्यालयीन नियतकालिकांमध्ये पडलेले पहावयास मिळते या नियतकालिकांमध्ये आपले लेख, कविता लिहणाऱ्या विद्यार्थ्यांमधूनच उद्याचे साहित्यिक घडत असतात. युवांना आपले मत मांडायची संधी देतानाचा त्यांच्यातील कलागुणांना वाव देणाऱ्या नियतकालिकांचे महत्व लक्षात घेऊन राज्यातील उत्कृष्ट नियतकालिकांचा सन्मान करणारा हा महाराष्ट्रातील एकमेव उपक्रम आहे. या स्पर्धेकरिता सादर केलेल्या नियतकालिकांचे यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय ग्रंथालयामध्ये जतन करून ते विद्यार्थी व अभ्यासकांसाठी उपलब्ध केले जाणार आहेत.
स्पर्धेकरिता महाविद्यालयांनी आपली नियतकालिकेची मुदत वाढवून दि. २७ डिसेंबर २०१७ पर्यंत करण्यात आली आहे. तेव्हा महाविद्यालयांनी आपली नियतकालिका २७ डिसेंबर च्या आत प्रती, संघटक, नवमहाराष्ट्र युवा अभियान, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, जनरल जगन्नाथराव भोसले मार्ग, मंत्रालयासमोर, मुंबई – २१ या पत्यावर पाठवावेत. पुरस्कारासंबधी तपशील http://ycpmumbai.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. या स्पर्धेच्या अधिक माहितीकरिता कार्यालयामध्ये ०२२-२२०२८५०८ या दूरध्वनी क्रमांकावर किंवा श्री. सुबोध जाधव (९८२३०६७८७९) व श्रीमती. मनीषा खिल्लारे (९०२२७१६९१३) यांच्याशी संपर्क साधावा. असे आवाहन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबईच्या कार्याध्यक्ष्या खा.सुप्रिया सुळे व कार्यक्रम संयोजक दत्ता बाळसराफ यांनी केले आहे.
- दत्ता बाळसराफ, कार्यक्रम व्यवस्थापक (यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई)
- निलेश राऊत, संघटक (नवमहाराष्ट्र युवा अभियान, मुंबई)
- निलेश राऊत, संघटक (नवमहाराष्ट्र युवा अभियान, मुंबई)
No comments:
Post a Comment