नाशिक : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिक व विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक, विश्वास ज्ञानप्रबोधिनी अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक, सारस्वत बँक व रेडिओ विश्वास ९०.८ कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘चित्रपट चावडी’ उपक्रमांतर्गत शनिवार १८ ऑगस्ट २०१८ रोजी सायंकाळी ६.३० वाजता सुप्रसिद्ध दिग्दर्शक ईस्माईल मर्चंट यांचा ‘द मिस्टीक मॅस्युर’ हा चित्रपट दाखविण्यात येणार आहे.
सदर चित्रपट डिझास्टर मॅनेजमेंट अॅण्ड ट्रेनिंग हब, ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास को-ऑप. बँकेसमोर, सावरकरनगर, गंगापूर रोड, नाशिक येथे दाखविण्यात येणार आहे.
नोबेल पारीतोषिक विजेते लेखक विद्याधर सुरजप्रसाद नायपॉल (व्ही.एस. नायपॉल) यांचे नुकतेच निधन झाले. ते भारतीय वंशाचे पण त्रिनीदाद, टोबॅगो येथील रहिवासी त्यांच्या पहिल्याच कादंबरीवर आधारीत द मिस्टीक मॅस्युर हा चित्रपट आहे.
साधारण १९४० चे त्रिनीदाद हे शहर एक ब्रिटीश वसाहत तिथे गणेश रामसेयोर नावाचा भारतीय वंशाचा तरूण व त्याची पत्नी लीला रहात असतात. गणेश लेखक होण्याची स्वप्ने पहातांना हिंदु धर्माचा प्रचार करतो. परंतु, त्याची किर्ती हळुहळु दैवी शक्ती असलेला अशी झाली. गणेशच्या महत्त्वाकांक्षा वाढत जातात. त्यानंतर नेमके काय घडते? हे बघण्यासाठी अवश्य या. सन २००१ मध्ये प्रदर्शित झालेल्या या इंग्लिश चित्रपटाचा कालावधी ११७ मिनिटांचा आहे.
हा चित्रपट बघण्यास जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन अध्यक्ष विनायक पाटील, कार्याध्यक्ष विश्वास ठाकूर, सचिव डॉ.कैलास कमोद, कोषाध्यक्ष डॉ.सुधीर संकलेचा, सदस्य सौ.कविता कर्डक, राजवर्धन कदमबांडे, रऊफ पटेल, अॅड.नितीन ठाकरे व विक्रम मोरे यांनी केले आहे.

No comments:
Post a Comment