अहमदनगर : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई विभागीय केंद्र अहमदनगर यांच्यातर्फे संपुर्ण वर्षभर विविध उपक्रम राबवले जातात. नवमहाराष्ट्र युवा अभियान अंतर्गत ग्रामीण भागातील युवकांच्या कलागुणांना चालना व प्रेरणा मिळावी व त्यांच्या गुणवत्तेला वाव मिळावी या हेतूने यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई व प्रयोग मालाड आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई विभागीय केंद्र अहमदनगर यांच्या संयुक्त विघमाने आंतरराष्ट्रीय समिक्षक व दिगदर्शक आशोक राणे यांची एकदिवसीय लघुपट (शॉर्टफिल्म) निर्मिती कार्यशाळा आयोजीत करण्यात आली आहे. गुरूवारी दिनांक ५ आॉक्टोबर २०१७ रोजी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत ही कार्यशाळा हॉटेल सिंगरेसिडन्सी तारकपुर बसस्टॅंड शेजारी येथे होणार असून याप्रसंगी लघुपट निर्मितीबाबतच्या सर्व बाबींवर प्रात्यक्षिकासह अशोक राणे मार्गदर्शन करणार आहेत. यानिमित्ताने अशोक राणे पहिल्यांदाच नगररत्न कार्यशाळा घेत आहेत. त्यामुळे चित्रपटनिर्मिती क्षेत्रात करिअर करू इच्छिणा-या व्यक्तीना लघुपट म्हणजे काय, पटकथालेखन, दृश्ये, अभिनय व इतर तांत्रिक बाजू समजण्यास मदत होणार आहे . जागतिक दर्जाचे लघुपट अहमदनगर जिल्हयातून निर्माण व्हावेत व लघुपटाविषयी माहिती युवकापर्यंत पोहचावी हा या कार्यशाळेचा प्रमुख हेतू आहे. त्यामुळे अधिक लोकांनी या कार्यशाळेस उपस्थित रहावे असे आवाहन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र अहमहनगरचे सचिव प्रशांत गडाख यांनी केले आहे. या कार्यशाळेत सहभागी होऊ इच्छिणा-या व्यक्तिंनी नाव नोंदणीसाठी ८८८८०८०८८१४ व ७७२००१३३२४ या क्रमांकावर संपर्क साधावा असे अवाहन करण्यात आले आहे. तसेच सदर कार्यशाळेसाठी प्रवेश पुर्णपणे विनामुल्य आहे.
Tuesday, 3 October 2017
समीक्षक व दिग्दर्शक अशोक राणे यांची नगररत्न कार्यशाळा

Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment