यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई शिक्षण विकास मंच, शिक्षणकट्टा अंतर्गत वेगवेगळ्या शैक्षणिक विषयांवर चर्चा होत असते. यावेळी हि चर्चा 'माध्यमिक स्तरावरील विषययोजना' या विषयावर करण्यात आली. या कार्यक्रमास शिक्षण, प्राध्यापक, निवृत्त शासकीय अधिकारी, शैक्षणिक विषयांवर काम करणा-या सामाजिक संस्था, शिक्षण क्षेत्रातील कार्यकर्ते, समाज माध्यम प्रतिनिधी, व शिक्षणप्रेमी यांची उपस्थिती होती. माध्यमिक स्तरावरील विषययोजनेचे स्वरूप या कट्टयाच्या संयोजक बसंती रॉय यांनी समजावून सांगितले. काट्याचे आयोजनाचे महत्व समन्वयक श्री. माधव सुर्यवंशी यांनी सांगितले. या चर्चासत्रास शिक्षणविकास मंचचे मुख्य संयोजक मा. डॉ. वसंत काळपांडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
No comments:
Post a Comment