शिक्षणप्रेमींनी शिक्षणाविषयी काही औपचारिक आणि काही अनौपचारिक पद्धतीने चर्चा करण्याचे ठिकाण म्हणजे 'शिक्षणकट्टा’.
शिक्षणतज्ञ, मुख्याध्यापक, शिक्षक, पत्रकार, पालक, विद्यार्थी यांना घेऊन हा कट्टा गेली पाच वर्ष सुरू आहे. यावेळी हा कट्टा शनिवार, दिनांक १५ ऑक्टोंबर २०१६ रोजी दुपारी २ वाजता सांस्कृतिक सभागृह, चौथा मजला, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान,मुंबई येथे आयोजित केला आहे. यावेळी शिक्षण कट्ट्यावर ‘माध्यमिक स्तरावरील विषययोजना’ हा विषय ठेवण्यात आला आहे. या अनुषंगाने पुढील मुद्यांवर चर्चा आयोजित केली आहे.
१) मा.ना.शिक्षणमंत्री यांनी नुकतीच घोषणा केली आहे की गणित आणि इंग्रजी हे विषय ऐच्छिक ठेवण्याचा विचार सुरू आहे.
२) समाजशास्त्राऐवजी राष्ट्रीय माध्यमिक स्तरावर व्होकेशनल कोर्सेसचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे.
३) माध्यमिक स्तरावरील सहशालेय (श्रेणी) विषयांच्या अध्यापनात व मूल्यमापनात काय सुधारणा करता येतील, तसेच अंतर्गत मूल्यमापन आणखी प्रभावी कसे करता येईल या दृष्टीनेही शासनाचा अभ्यास सुरू आहे.
या तीनही मुद्द्यांवर येत्या कट्ट्यात चर्चा होईल.
‘शिक्षण विकास मंच’ चे मुख्य संयोजक डॉ. वसंत काळपांडे यांची विशेष उपस्थिती यावेळी राहणार आहे. तरी आपण कट्ट्यात सहभागी होऊन आपली भूमिका मांडावी ही विनंती.
श्रीमती बसंती रॉय
संयोजक
शिक्षणकट्टा, शिक्षण विकास मंच, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई
लक्ष्यवेध: ‘
माध्यमिक स्तरावरील विषययोजना’ या विषयासंदर्भात कोणत्याही संस्थेला किंवा सदस्यांना स्वतःचे सादरीकरण करावयाचे असल्यास, कृपया आधी संपर्क करावा. ठिकाण-सांस्कृतिक सभागृह, चौथा मजला, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई ,मंत्रालय समोर, नरीमन पॉईंट, मुंबई ४०० ०२१
अधिक माहितीसाठी संपर्क – माधव सूर्यवंशी (समन्वयक-९९६७५४६४९८)
No comments:
Post a Comment