विधी साक्षरता कार्यशाळा संपन्न...
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, कायदेविषयक सहाय्य व सल्ला फोरम, मुंबई व ठाणे सब कॅम्पस, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि. २४ फेब्रुवारी रोजी एम.एस. डब्ल्यु. (मास्टर ऑफ सोशल वर्क) च्या विद्यार्थ्यांसाठी एकदिवसीय ‘विधी साक्षरता कार्यशाळा’ टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, खारघर येथे आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेमध्ये भारतीय संविधान व पर्यावरण विषयक तरतुदी, महिला व बालक यांच्या लैंगिक शोषणाविरोधी कायदेशीर तरतुद, बाल गुन्हेगारी संबंधित परिस्थिती आणि कायदेशीर तरतुदी, ज्येष्ठ नागरीकांसंबंधी विविध तरतुदी, ग्राहक संरक्षण विषयक तरतुदी व उपाय या पाच विषयांवर मराठी व इंग्रजी भाषांमध्ये व्याख्याने आयोजित करण्यात आली होती. नेमका कायदा काय असतो त्याविषयी सखोल ज्ञान मिळावे म्हणून सदर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. एम.एस. डब्ल्यु. (मास्टर ऑफ सोशल वर्क) च्या जवळपास ९० विद्यार्थ्यांनी यावेळी उपस्थिती दर्शवली. त्याच्याकडून संविधान सरनाम्याचे सामूहिक वाचन करवून घेण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना कार्यशाळेचे प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, कायदेविषयक सहाय्य व सल्ला फोरमचे सचिव विनायक कांबळे अॅड. प्रमोद ढोकळे, अॅड. प्रॉस्पर डिसुजा, अॅड.प्रकाश धोपटकर, अॅड. भूपेश सामंत, अॅड. डॉ. प्रकाश देशमुख, आदि उपस्थित होते.
No comments:
Post a Comment