नाशिक : लॉक ग्रिफिन, विश्वस्त या लोकप्रिय कादंबर्यांचे लेखक वसंत लिमये यांच्या जाहीर मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. श्री. लिमये यांची मुलाखत आ. हेमंत टकले घेणार आहेत.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिक व विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक, ग्रंथ तुमच्या दारी, विश्वास ज्ञानप्रबोधिनी अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक, सारस्वत बँक व रेडिओ विश्वास ९०.८ कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने सदर मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार दि. २३ डिसेंबर २०१८ रोजी सकाळी १०.३० वाजता डिझास्टर मॅनेजमेंट अॅण्ड ट्रेनिंग हब, ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास को-ऑप. बँकेसमोर, सावरकरनगर, गंगापूर रोड, नाशिक येथे हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.
आय.आय.टी. मधून मेकॅनिकल इंजिनिअरची पदवी घेऊन बाहेर पडलेल्या वसंत लिमये यांनी आय.टी. क्षेत्रातील मोठ्या पगाराची नोकरी न करता गिर्यारोहण, फोटोग्राफी व लेखन अशा विविध क्षेत्रात मुशाफिरी करत आहेत. लॉक ग्रिफिन, विश्वस्त, कॅम्पफायर अशा पुस्तकांनी त्यांनी आपला स्वतंत्र वाचक वर्ग निर्माण केला आहे. अशा बहुआयामी व्यक्तिमत्त्वाची जीवन व साहित्य प्रवासाची सफर मुलाखतीतून उलगडली जाणार आहे.
तरी या कार्यक्रमास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन अध्यक्ष विनायक पाटील, कार्याध्यक्ष विश्वास ठाकूर, सचिव डॉ.कैलास कमोद, कोषाध्यक्ष डॉ.सुधीर संकलेचा, सदस्य सौ.कविता कर्डक, राजवर्धन कदमबांडे, रऊफ पटेल, अॅड.नितीन ठाकरे व विक्रम मोरे तसेच विश्वास ज्ञानप्रबोधिनी अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष डॉ. मनोज शिंपी, ग्रंथ तुमच्या दारीचे शिल्पकार विनायक रानडे यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment