शिक्षणप्रेंमींनी शिक्षणाविषयी काही औपचारिक आणि काही अनौपचारिक पध्दतीने चर्चा करण्याचे ठिकाण म्हणजेच शिक्षण विकास मंच चा 'शिक्षण कट्टा'. शिक्षकतज्ज्ञ, मुख्याध्यापक, शिक्षक, पत्रकार, पालक आणि विद्यार्थी यांना घेऊन हा कट्टा मागील पाच वर्षांपासून कार्यरत आहे. शिक्षण विकास मंच, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान ,मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने 'शिक्षणकट्टा' या उपक्रमांर्तगत नियमितपणे आयोजन केले जाते.
शनिवारी ७ ऑक्टोबर २०१७ रोजी दुपारी २ वाजता 'प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत पायाभूत चाचण्या' या विषयावर बोर्ड रूम, पाचवा मजला, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई येथे शिक्षण कट्टयाचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यातील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक स्तर आजमावण्यासाठी शैक्षणिक वर्षे २०१५ पासून पायाभूत चाचण्या २ री ते ८ वी तील सर्व विद्यार्थ्यांना लागू करण्यात आला आहेत.
या अनुषंगाने पुढील मुद्दयांवर चर्चा होणार आहे. चाचण्यांचा मुख्य उद्देश/ प्रयोजन, या चाचण्यामुळे अंमलबजावणी शालेयस्तरावर कशा प्रकारे सुरू आहे ?, या चाचण्यामुळे शाळांमध्ये कोणते बदल दिसून येत आहेत ?, या कार्यक्रमाची अंमलबजावणी करताना आलेले अनुभव आणि हा कार्यक्रम अधिक प्रभावी कशाप्रकारे करता येईल. वरील सर्व मुद्द्यांवर शिक्षण कट्ट्यात चर्चा होईल. 'शिक्षण विकास मंच' चे मुख्य संयोजक डॉ. वसंत काळपांडे यांची विशेष उपस्थिती यावेळी राहणार आहे. तरी आपण कट्ट्यात सहभागी होऊन आपले विचार मांडावेत ही विनंती.
No comments:
Post a Comment