आपल्या वैशिष्ट्यपूर्ण निसर्ग कविता आणि ललित लेखनाने सा-या महाराष्ट्राला वेड लावलेल्या या रसिकप्रिय सुप्रसिद्ध कवी ना.धों. महानोर यांचा अमृत महोत्सवा निमित्त कृतज्ञता सत्कार करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम ४ मार्चला सायंकाळी ५ वाजता यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई मधील नवमहाराष्ट्र युवा अभियान विभागातर्फे होणार आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला प्रतिष्ठानचे अध्यक्ष मा. शरद पवार, मा. रामदास भटकळ, मा. शरद काळे आणि मा. हेमंत टकले यांची प्रमुख उपस्थिती असेल.
लेखनाच्या आणि शेतीसारख्या आवडत्या विषयाच्या आठवणी जागवत साजरा महोत्सव साजरा करावा, अशी कल्पना असून हा केवळ सत्काराचा औपचारिक कार्यक्रम न करता त्यानिमित्ताने महानोरांच्या लेखणीतून उतरलेली शब्दशिल्पे जिवंत व्हावीत, असा प्रतिष्ठानचा विचार आहे. त्या दृष्टीने कार्यक्रमांची आखणी करण्यात आली आहे. मुख्यत: सांस्कृतिक स्वरूपाच्या या कार्यक्रमात महानोरांचं वेगळेपण सांगणारी, त्यांच्या व्यक्तिमत्वाचे पैलू उलगडणारी किंवा त्यांच्या साहित्याचे रसग्रहण करणारी काही मनोगतं दृकश्राव्य स्वरुपात सादरीकरण होणार आहे. या कार्यक्रमाचे अभिवाचन श्रीरंग देशमुख, अमृता मोरे, हेमंत टकले आणि दत्ता बाळसराफ यांच्या कडून करण्यात येणार आहे.

No comments:
Post a Comment