यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई व मराठी विज्ञान परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने 'विज्ञानगंग' कार्यक्रमांतर्गत प्रा. नागेश टेकाळे यांचे 'हल्लीच्या फुलांना वास का येत नाही?" या विषयावरील अकरावे पुष्प सोमवार दि. १६ जानेवारी २०१७ रोजी सायंकाळी ५.०० वाजता चव्हाण सेंटर, सांस्कृतिक सभागृह, चौथा मजला, जनरल जगन्नाथराव भोसले मार्ग, मंत्रालय समोर, नरिमन पॉईंट, मुंबई येथे आयोजित केलेले आहे. प्रा. नागेश टेकाळे हे वनस्पतीशास्त्रज्ञ असून त्यांनी विपुल लिखाण केले आहे. तरी वरील कार्यक्रमा आपण उपस्थित रहावे ही विनंती.
Thursday, 22 December 2016
विज्ञानगंगाचे अकरावे पुष्प.. 'हल्लीच्या फुलांना वास का येत नाही?'
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई व मराठी विज्ञान परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने 'विज्ञानगंग' कार्यक्रमांतर्गत प्रा. नागेश टेकाळे यांचे 'हल्लीच्या फुलांना वास का येत नाही?" या विषयावरील अकरावे पुष्प सोमवार दि. १६ जानेवारी २०१७ रोजी सायंकाळी ५.०० वाजता चव्हाण सेंटर, सांस्कृतिक सभागृह, चौथा मजला, जनरल जगन्नाथराव भोसले मार्ग, मंत्रालय समोर, नरिमन पॉईंट, मुंबई येथे आयोजित केलेले आहे. प्रा. नागेश टेकाळे हे वनस्पतीशास्त्रज्ञ असून त्यांनी विपुल लिखाण केले आहे. तरी वरील कार्यक्रमा आपण उपस्थित रहावे ही विनंती.
Friday, 9 December 2016
मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी गिरवले चित्रपट समीक्षणाचे धडे
यशवंत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा स्तुत्य उपक्रम- कुलगुरू डॉ. संजय देशमुख
दरवर्षी यशवंत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव काहीतरी वेगळे देत असते. या वर्षी या चित्रपट महोत्सवाचे आकर्षण ठरणार आहे ते महाविद्यालयीन विद्यार्थांनी केलेले चित्रपटाचे समीक्षण. चित्रपट निव्वळ न पाहता तो वाचता देखील यावा या उद्देशाने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी ‘चित्रपट समीक्षण कार्यशाळेचे’ आयोजित करण्यात आले होते. दिनांक ९ डिसेंबर २०१६ रोजी सकाळी ९.३० ते सायंकाळी ५.०० वाजे पर्यंत मुंबई विद्यापीठामधील अल्केश मोदी हॉल येथे या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेचे उदघाटन मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांनी केले. यशवंत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल आणि चित्र- नाट्य अभ्यासक समर नखाते यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
‘’चित्रपटाचा आस्वाद कसा घ्यावा याकरिता या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबई विद्यापीठ ७ व्या यशवंत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे सहयोगी आहेत. पुढील वर्षी हा चित्रपट महोत्सव विद्यापीठाच्या आवारात करावा अशी विनंती डॉ. जब्बार पटेलांना करतो’’, असे उदगार डॉ. देशमुख यांनी काढले.
‘’चित्रपट फक्त पाहायचा नसतो तर तो वाचायचा देखील असतो. विशेषतः विद्यार्थ्यांना तो कसा वाचावा हे कळण्यासाठीच या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे’’, असे डॉ. जब्बार पटेल यांनी सांगितले. ‘’चित्रपटाला भाषा नसते, आपल्या महोत्सवामध्ये मराठी चित्रपटांचे परीक्षण विदेशी परीक्षक करतात’’, असे डॉ पटेलांनी अधोरेखित केले.
चित्र- नाट्य अभ्यासक समर नखाते यांनी चित्रपटाचा इतिहास, चित्रपट निर्मितीची प्रक्रिया याविषयी माहिती दिली. तसेच चित्रपट कसा पहावा याचे धडे विद्यार्थ्यांना दिले.
यापूर्वी आम्ही चित्रपट मनोरंजनाचे माध्यम म्हणून पाहत होतो. परंतु आजच्या कार्यशाळेने चित्रपटाकडे पाहण्याची दृष्टी बदलली, असे पत्रकारितेची विद्यार्थिनी दिशा खातू हिने सांगितले. चित्रपट म्हणजे फक्त अभिनेता, अभिनेत्री याभोवतीच फिरतो असे पूर्वी वाटायचे पण त्याचे विविध पैलू खऱ्या अर्थाने आज आम्हांला उमजले, असे जनसंपर्क शाखेचा विद्यार्थी अभिजीत कांबळे म्हणाला.
यावेळी संज्ञापन व पत्रकारिता विभागाचे विभागप्रमुख प्रा. डॉ. सुंदर राजदीप, सहाय्यक प्राध्यापक प्रा. डॉ. संजय रानडे, यशवंत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे समन्वयक महेंद्र तेरेदेसाई आदी मान्यवर उपस्थित होते.

Wednesday, 7 December 2016
सहकारी गृहनिर्माण संस्था व्यवस्थापक प्रशिक्षण
महाराष्ट्र महिला व्यासपीठातर्फे
सहकारी गृहनिर्माण संस्था व्यवस्थापक प्रशिक्षण
मुंबई शहरामध्ये २० ते ४० हजार सहकारी गृहनिर्माण संस्था आहेत. या सर्व संस्थांचे काम चांगले होण्यासाठी शासनाचे कायदे किंवा उपविधी लोकांना माहिती असणे आवश्यक आहे. हे लक्षात घेऊन महाराष्ट्र महिला व्यापीठातर्फे "'सहकारी गृहनिर्माण संस्था व्यवस्थापक प्रशिक्षण" दिनांक ३० जानेवारी ते ३ मार्च २०१७ पर्यंत (सोमवार ते शुक्रवार) दुपारी २ ते ५ या वेळेमध्ये यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या बेसमेंट हॉलमध्ये दिले जाणार आहे. हे प्रशिक्षण मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषेमध्ये असणार आहे. प्रशिक्षण शुल्क ४५००/- भरून सहभागी होता येईल. तसेच प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण करणा-यास प्रमाणपत्र दिले जाणार आहे. पूर्णवेळ व अर्धवेळ नोकरी मिळविण्यासाठी सहकार्य केले जाईल असे महाराष्ट्र महिला व्यासपीठातर्फे सांगण्यात आले आहे. या संदर्भात अधिक माहिती व नावनोंदणीसाठी कृपया संजना पवार व संगिता गवारे यांच्याशी ( दूरध्वनी - २२०४५४६० विस्तारित क्र. २४४ अथवा भ्रमणध्वनी ८२९१४१६२१६ ) वर संपर्क साधावा

Sunday, 4 December 2016
Monday, 28 November 2016
७ वा यशवंत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०१७ पत्रकार परिषद...
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे
७वा यशवंत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०१७ पत्रकार परिषद...
जानेवारी २०१७ मध्ये होणा-या '७ व्या यशवंत आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा'चे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षी या चित्रपट महोत्सवाचे आकर्षण ठरणार आहे ते महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी केलेले चित्रपटाचे समीक्षण. महाराष्ट्रातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी 'चित्रपट समीक्षण स्पर्धा' आयोजित करण्यात आली आहे
'७व्या यशवंत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०१७' च्या निमित्ताने बुधवार ३० नोव्हेंबर २०१६ रोजी दुपारी १२.०० वाजता पत्रकारांसाठी चर्चा व स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला श्री. शरद काळे, सरचिटणीस (यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई ) डॉ. जब्बार पटेल - फेस्टिवल डायरेक्टर ( यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई ) उपस्थित राहणार आहेत आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहून स्नेहभोजनाचा आस्वाद घ्यावा. याविषयी अधिक माहितीसाठी श्री. संजय बनसोड (९८१९९६२६३६ ) श्री. शैलेश चव्हाण ( ९९२०३९७२९८ ) वर संपर्क करू शकता.

विज्ञानगंगाचे दहावे पुष्प...
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई व मराठी विज्ञान परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने 'विज्ञानगंगा' कार्यक्रमांतर्गत पुण्याच्या डेक्कन कॉलेजमधील मानववंश शास्त्राचे निवृत्त प्राध्यापक डॉ. सुभाष वाळिबे यांचे 'आशिया खंडातील मानव मुळात आफ्रिकन होता का ?' या विषयावरील दहावे पुष्प गुरुवार दि. ८ डिसेंबर २०१६ रोजी सायंकाळी ५.०० वाजता चव्हाण सेंटर, सांस्कृतिक सभागृह, चौथा मजला, जनरल जगन्नाथराव भोसले मार्ग, मंत्रालय समोर, नरिमन पॉईंट, मुंबई ४०००२१ येथे आयोजित केलेले आहे. तरी वरील कार्यक्रमास आपण उपस्थित रहावे ही विनती.
Sunday, 27 November 2016
”भारतीय संविधान दिना” निमित्त मोफत आरोग्य चिकित्सा शिबिर
२६ नोव्हेंबर २०१६ ”भारतीय संविधान दिना” निमित्त सॅम मित्र मंडळ व यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान कोकण विभाग जिल्हा रायगड यांच्या संयुक्त विद्यमानाने मु. पेडली, ता.सुधागड , जिल्हा रायगड इथे मोफत आरोग्य चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते . खारघर ,नवीन मुंबई येथील नामांकित यरला रुग्णालयातील तज्ञ डॉक्टर डॉ. प्रशांत जगताप व टीम, तसेच सुधागड पी.अस.सी. मधून डॉ.मुळे व सौ. डॉ. भिडे व टीम रुग्णांच्या चेकप साठी उपस्थित होते. डायबेटीस, ब्ल्डप्रेशर, मुल्व्याद, हर्निया, अॅपेंडीक्स, मासिक पाळी , गर्भ पिशवी विकार, गर्भावती महिला, डोळे तपासणी, इत्यादी विकारांवर तपासणी केली गेली. ”भारतीय संविधान दिना” चे औचित्य साधून, शिबिर दरम्यान उपस्थित प्रत्येक व्यक्तीला भारताचे प्रीअॅम्बल दिले गेले व सामुहिक वाचनाच्या माध्यमातून ‘ समानता व बंधुत्वाचा निरोप देण्याच प्रयत्न सॅम मित्र मंडळाचे अध्यक्ष सचिन खामकर साहेब यांनी केले आहे. अश्या शिबाराचा फायदा जास्तीत जास्त लोकांनी घ्यावा असे मत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान चे रायगड जिल्हाध्यक्ष मा.अभिजित दादा देशमुख यांनी केले आहे. युवा कार्यकर्ते नंदकीशोर शिंदे, संदीप ठाकूर, प्रणीत कडू, बाजीरंग कुर्ले, दर्शन तळेकर, सौरभ खामकर, प्रशांत दळवी, रुपेश कुर्ले, राज तळेकर, शुभम मेणे, सुनील कुवर, प्रवीण खानेकर, शिवराज खामकर, प्रशांत सगळे, विजय देशमुख यांनी सक्रीय सहभाग घेतला. कार्यक्रमास तळेकर गुरुजी, मेने सर, विजयजी जाधव, सचिन झुन्झाराव, निलेश देशमुख, पोलीस पाटील देशमुख व इतर मान्यवर उपस्थित होते.
Wednesday, 16 November 2016
'विज्ञानगंगा'चे नववे पुष्प..
'कृष्ण विवर' ह्या विषयावर शास्त्रज्ञ प्रा. जे. एस. यादव यांचे व्याख्यान संपन्न..
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई व मराठी विज्ञान परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने 'विज्ञानगंगा' कार्यक्रमांतर्गत टाटा इन्स्टिटयुट ऑफ फंडामेंटल रिसर्चचे शास्त्रज्ञ प्रा. जे. एस यादव यांचे 'कृष्ण विवर' या विषयावरील नववे पुष्प बुधवार दि. १६ नोव्हेंबर २०१६ रोजी सांस्कृतिक सभागृहात पार पडले. 'कृषण विवर', श्याम विवर, कृष्ण गर्त या ब्लॅक होल याविषयी गुरूत्वाकर्षण कसे प्रबळ आहे याविषयी माहिती प्रा. जे. एस.यादव यांनी दिली. केलेले मार्गदर्शन लक्षपूर्वक ऐकून कार्यक्रमाच्या शेवटी शंकासमाधनासाठी अनेक प्रश्न विचारले गेले.
Friday, 11 November 2016
यशवंतराव चव्हाण राष्टीय पुरस्कार समिती बैठक पार पडली...
दिनांक ११ नोव्हेंबर २०१६ रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई तर्फे दिला जाणारा 'यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार"च्या समिती बैठक यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या पाचवा मजला, समिती कक्षामध्ये पार पडली. यावेळी बैठकीस राष्ट्रीय पुरस्कार समितीचे अध्यक्ष मान. श्री. अनिल काकोडकर, DAE Homi BHABHA Chair Person, Member AEC, Bhabha Atomic Research center, मान.श्री शरद काळे सरचिटणीस यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, डॉ. संजय देशमुख उपकुलगुरू, मुंबई विद्यापीठ, Mr. I M Kadri Architects, श्री रघुनाथ माशेलकर उपस्थित होते. यावेळी मा. अनिल काकोडकर यांच्या वाढदिवसानिमित्त यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई चे सरचिटणीस श्री. शरद काळे यांनी पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या.
Saturday, 5 November 2016
'विज्ञानगंगा'चे नववे पुष्प.. 'कृष्ण विवर'
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई व मराठी विज्ञान परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने 'विज्ञानगंगा' कार्यक्रमांतर्गत टाटा इन्स्टिटयुट ऑफ फंडामेंटल रिसर्चचे शास्त्रज्ञ प्रा. जे. एस यादव यांचे 'कृष्ण विवर' या विषयावरील नववे पुष्प बुधवार दि. १६ नोव्हेंबर २०१६ रोजी सायंकाळी ५.०० वाजता चव्हाण सेंटर, सांस्कृतिक सभागृह, चौथा मजला, जनरल जगन्नाथराव भोसले मार्ग, मंत्रालयासमोर, नरिमन पॉईंट, मुंबई ४०००२१ येथे आयोजित केलेले आहे. प्रा. यादव हे आय.एफ.आर मध्ये सन १९८२ पासून कार्यरत असून एस्ट्रोसेट उपग्रहावर कृष्ण विवरांसंबंधी माहिती मिळविण्यासाठी बसविलेल्या उपकरणाचे ते निर्माते आहेत. तरी वरील कार्यक्रमास आपण उपस्थित रहावे ही विनंती..
Friday, 4 November 2016
'पर्व-प्रगतीचे, परिवर्तनाचे' पुस्तिका प्रकाशित...
पुणे विभागीय केंद्र : आदरणीय पवारसाहेबांच्या कायदे मंडळातील कारकीर्दीला अविरत पाच दशकांचा कालावधी एकाही दिवसांच्या खंडाविना पूर्ण होत आहे. यानिमित्ताने शालेय व महाविद्यालयीन युवा वाचकांसाठी 'पर्व-प्रगतीचे, परिवर्तनाचे' ही पुस्तिका प्रकाशित करण्यात येत आहे. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांनी या निमित्ताने आयोजित उपक्रमाची माहिती पुण्यात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत काल दिली.
या पुस्तिकेच्या प्रकाशनाला राज्यव्यापी उपक्रमाची जोड देत या पुस्तिकेचा संदर्भ असलेले विषय घेऊन माध्यमिक विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा व कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धा जिल्हा स्तरावर व राज्य स्तरावर आयोजित केली आहे. या निबंध व वक्तृत्व स्पर्धेच्या माध्यमातून या पुस्तिकेचे व इतर आनुषंगिक साहित्याचे वाचन व मनन विद्यार्थी करतील आणि या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होतील, अशी अपेक्षा आहे.
http://ycpmumbai.com/images/pdf/parva_parivatan_2016.pdf

Saturday, 29 October 2016
'रंगस्वर' तर्फे 'सूरप्रभात' कार्यक्रम संपन्न...
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान व "रंगस्वर" तर्फे दीपावलीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी "सूरप्रभात' हा कार्यक्रम शनिवार दिनांक २९ ऑक्टोबर रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या मुख्य सभागृहात संपन्न झाला. श्रीमती सुष्मीता दास (गायन) तबला- ओजस अधिया संवादिनी - सिद्धेश बिचोलकर आणि पंडित गणपती भट ( गायन) तबला- श्रीधर मंदारे संवादिनी - केबल कावले यांचा संगीतमय जादूने रसिकांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन रेखा नार्वेकर यांनी केले.
Sunday, 23 October 2016
पाचवी शक्ती ह्या विषयावर शास्त्रज्ञ प्रा. एन. कृष्णन यांचे व्याख्यान संपन्न...
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान तर्फे विद्यार्थ्यांसाठी विविध मार्गदर्शन शिबीरे आयोजित केली जातात. त्यातील एक उपक्रम म्हणजे 'विज्ञानगंगा' हा उपक्रम प्रतिष्ठान आणि मराठी विज्ञान परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने राबवला जातो. 'विज्ञानगंगा' उपक्रमांतर्गत होणा-या कार्यक्रमाचे आठवे पुष्प प्रतिष्ठानच्या सभागृहात नुकतेच पार पडले. ह्या आठव्या मार्गदर्शन कार्यक्रमाचा विषय होता The fifth force (पाचवी शक्ती) प्रा. एन. कृष्णन्. आतापर्यंत आपल्याला गुरूत्वाकर्षण शक्ती, चुंबकीय शक्ती, तीव्र अणुशक्ती, आणि सौम्य अणुशक्ती ह्या चार प्रकारच्या शक्ती माहित आहेत. तथापि, पाचवी शक्ती अस्तित्वात असल्याचे पुरावे हाती येत आहेत याची माहिती प्रा. एन. कृष्णन् यांनी दिली. केलेले मार्गदर्शन लक्षपूर्वक ऐकून कार्यक्रमाच्या शेवटी शंकासमाधनासाठी अनेक प्रश्न विचारले गेले.
Tuesday, 18 October 2016
'पर्व-प्रगतीचे, परिवर्तनाचे' ....
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई ही संस्था गेली तीन दशके सामाजिक-सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत आहे. अनेक क्षेत्रांत वेगवेगळे उपक्रम राबविताना नव्या पिढीची जडण-घडण सम्यकपणे घडावी, असा आम्हा सर्वांचाच प्रयत्न असतो. प्रागतिक आणि परिवर्तनवादी विचारांची विधायक दृष्टी असलेली क्रियाशील तरुणाई या प्रक्रियेतून पुढे येईल, अशी आशा आहे. त्यादृष्टीने शालेय व महाविद्यालयीन युवा वाचकांसाठी 'पर्व-प्रगतीचे, परिवर्तनाचे' ही पुस्तिका प्रकाशित करीत आहोत व त्याला एक राज्यव्यापी उपक्रमाची जोड देत आहोत. या पुस्तिकेचा संदर्भ असलेले विषय घेऊन माध्यमिक विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा व कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धा जिल्हा स्तरावर व राज्य स्तरावर आयोजित केली आहे. या निबंध व वक्तृत्व स्पर्धेच्या माध्यमातून या पुस्तिकेचे व इतर अनुषंगिक साहित्याचे वाचन व मनन विद्यार्थी करतील आणि या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होतील, अशी अपेक्षा आहे.
आदरणीय पवारसाहेबांच्या कायदे मंडळातील कारकिर्दीला अविरत पाच दशकांचा कालावधी एकाही दिवसाच्या खंडाविना पूर्ण होत आहे, ही आपल्या सर्वांनाच आनंदानची व अभिमानाची बाब आहे. यानिमित्ताने त्यांच्या या कारकिर्दीतील काही महत्त्वाची धोरणे व निर्णय यांचा या पुस्तिकेत अतिशय मोजक्या शब्दांत परिचय करून दिला आहे. अतिशय कमी वेळेत या पुस्तिकेच्या संदापनाची जबाबदारी ज्येष्ठ पत्रकार पद्मभूषण देशपांडे यांनी पार पाडली, त्याबद्दल त्यांचे मन:पूर्वक आभार.
- सुप्रिया सुळे, कार्याध्यक्ष, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई

http://ycpmumbai.com/images/pdf/s_pawar_book_18102016.pdf
Monday, 17 October 2016
यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पारितोषिक २०१६ सुप्रसिद्ध उद्योगपती श्री प्रतापशेठ दादा साळुंखे यांना देण्यात येणार...
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी कृषी, औद्योगिक, समाजरचना/व्यवस्थापन प्रशासन, सामाजिक एकात्मता / विज्ञान तंत्रज्ञान, ग्रामीण विकास / आर्थिक सामाजिक विकास, मराठी साहित्य, संस्कृति/कला क्रीडा या क्षेत्रांमध्ये लक्षणीय कामगिरी करणा-या महाराष्ट्रातील व्यक्तीस/संस्थेस यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पारितोषिक देण्यात येते. रोख रक्कम. रु. २,००,०००/- व मानपत्र असे या पारितोषिकाचे स्वरुप आहे..वरील क्षेत्रामध्ये लक्षणीय कार्य करणा-या व्यक्ती अगर संस्था यांच्या विषयी प्राप्त झालेल्या शिफारसींचा विचार करुन पारितोषिक निवड समितीने सुप्रसिद्ध उद्योगपती श्री. प्रतापशेठ दादा साळुंखे यांची या वर्षीच्या पारितोषिकासाठी निवड केलेली आहे. श्री प्रतापशेठ दादा साळुंखे यांनी गेली अनेक औद्योगिक क्षेत्रात उल्लेखनीय काम केले आहे. या क्षेत्रातील त्यांचे असाधारण कर्तृत्व लक्षांत घेऊन हे पारितोषिक मा. यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी म्हणजे दिनांक २५ नोव्हेंबर २०१६ रोजी सायंकाळी ५.३० वाजता चव्हाण केंद्रात आयोजित केलेल्या कार्यक्रमाध्ये प्रतिष्ठानचे अध्यक्ष मा. श्री. शरद पवार यांच्या हस्ते श्री. प्रतापशेठ दादा साळुंखे यांना देण्यात येईल.
Sunday, 16 October 2016
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मध्ये रंगला 'कट्टा शिक्षणाचा'......
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई शिक्षण विकास मंच, शिक्षणकट्टा अंतर्गत वेगवेगळ्या शैक्षणिक विषयांवर चर्चा होत असते. यावेळी हि चर्चा 'माध्यमिक स्तरावरील विषययोजना' या विषयावर करण्यात आली. या कार्यक्रमास शिक्षण, प्राध्यापक, निवृत्त शासकीय अधिकारी, शैक्षणिक विषयांवर काम करणा-या सामाजिक संस्था, शिक्षण क्षेत्रातील कार्यकर्ते, समाज माध्यम प्रतिनिधी, व शिक्षणप्रेमी यांची उपस्थिती होती. माध्यमिक स्तरावरील विषययोजनेचे स्वरूप या कट्टयाच्या संयोजक बसंती रॉय यांनी समजावून सांगितले. काट्याचे आयोजनाचे महत्व समन्वयक श्री. माधव सुर्यवंशी यांनी सांगितले. या चर्चासत्रास शिक्षणविकास मंचचे मुख्य संयोजक मा. डॉ. वसंत काळपांडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
Wednesday, 12 October 2016
कृषिमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष मा. खा. शरदचंद्रजी पवार यांच्या संसदीय कारकीर्दीला ५० वर्षे पूर्ण होत आहेत
राज्यस्तरीय शालेय निबंध स्पर्धा...
माजी केंद्रीय कृषिमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष मा. खा. शरदचंद्रजी पवार यांच्या संसदीय कारकीर्दीला दि. २२ फेब्रवारी २०१७ रोजी ५० वर्षे पूर्ण होत आहेत. सलग ५० वर्षे राज्याच्या व देशाच्या कायदेमंडळात सदस्य असलेले शरद पवार हे एकमेव नेते आहेत. राज्य व केंद्रात विविध मंत्रिपदे आणि अनेक संस्थांची धुरा यशस्वीपणाने हाताळणा-या मा. शरद पवार यांचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे या विषयी अधिक माहिती डाऊनलोड करा
http://ycpmumbai.com/images/pdf/vaktrutva_spardha2016.pdf
माजी केंद्रीय कृषीमंत्री आदरणीय शरद पवार साहेब यांच्या संसदीय कारकीर्दीस 22 फेब्रुवारी 2017 रोजी पन्नास वर्षे पूर्ण होत आहे. या पाच दशकांमध्ये पवार साहेबांच्या हस्ते अनेकविध निर्णय झाले. अनेक प्रकल्प उभे राहिले. आदरणीय पवार साहेबांचे हे विचार आणि कार्य महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांसाठी राज्यस्तरीय शालेय निबंध स्पर्धा आणि महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. जिल्हा आणि राज्यस्तरावर या स्पर्धा घेण्यात येणार आहे. सोबतच्या माहितीपत्रकांत शालेय निबंध स्पर्धा आणि महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा यांची सविस्तर माहिती दिली आहे. अधिकाधिक विद्यार्थी आणि युवांनी यात आपला सहभाग नोंदवावा.
http://ycpmumbai.com/images/pdf/nibhandh_spardha2016.pdf

शिक्षण कट्टा - माध्यमिक स्तरावरील विषययोजना १५ ऑक्टोंबर २०१६
शिक्षणप्रेमींनी शिक्षणाविषयी काही औपचारिक आणि काही अनौपचारिक पद्धतीने चर्चा करण्याचे ठिकाण म्हणजे 'शिक्षणकट्टा’.
शिक्षणतज्ञ, मुख्याध्यापक, शिक्षक, पत्रकार, पालक, विद्यार्थी यांना घेऊन हा कट्टा गेली पाच वर्ष सुरू आहे. यावेळी हा कट्टा शनिवार, दिनांक १५ ऑक्टोंबर २०१६ रोजी दुपारी २ वाजता सांस्कृतिक सभागृह, चौथा मजला, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान,मुंबई येथे आयोजित केला आहे. यावेळी शिक्षण कट्ट्यावर ‘माध्यमिक स्तरावरील विषययोजना’ हा विषय ठेवण्यात आला आहे. या अनुषंगाने पुढील मुद्यांवर चर्चा आयोजित केली आहे.
१) मा.ना.शिक्षणमंत्री यांनी नुकतीच घोषणा केली आहे की गणित आणि इंग्रजी हे विषय ऐच्छिक ठेवण्याचा विचार सुरू आहे.
२) समाजशास्त्राऐवजी राष्ट्रीय माध्यमिक स्तरावर व्होकेशनल कोर्सेसचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे.
३) माध्यमिक स्तरावरील सहशालेय (श्रेणी) विषयांच्या अध्यापनात व मूल्यमापनात काय सुधारणा करता येतील, तसेच अंतर्गत मूल्यमापन आणखी प्रभावी कसे करता येईल या दृष्टीनेही शासनाचा अभ्यास सुरू आहे.
या तीनही मुद्द्यांवर येत्या कट्ट्यात चर्चा होईल.
‘शिक्षण विकास मंच’ चे मुख्य संयोजक डॉ. वसंत काळपांडे यांची विशेष उपस्थिती यावेळी राहणार आहे. तरी आपण कट्ट्यात सहभागी होऊन आपली भूमिका मांडावी ही विनंती.
श्रीमती बसंती रॉय
संयोजक
शिक्षणकट्टा, शिक्षण विकास मंच, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई
लक्ष्यवेध: ‘
माध्यमिक स्तरावरील विषययोजना’ या विषयासंदर्भात कोणत्याही संस्थेला किंवा सदस्यांना स्वतःचे सादरीकरण करावयाचे असल्यास, कृपया आधी संपर्क करावा. ठिकाण-सांस्कृतिक सभागृह, चौथा मजला, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई ,मंत्रालय समोर, नरीमन पॉईंट, मुंबई ४०० ०२१
अधिक माहितीसाठी संपर्क – माधव सूर्यवंशी (समन्वयक-९९६७५४६४९८)
Tuesday, 11 October 2016
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सोलापूर विभागीय केंद्राचा शुभारंभ...
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबईच्या विभागीय केंद्राचा शुभारंभ रविवारी सायंकाळी वा. का. किर्लोस्कर सभागृहात पार पडला. यावेळी 'आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीत यशवंतराव चव्हाणांचे योगदान' या विषयावर पवार बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यस्थानी ज्येष्ठ साहित्यिक यशवंतराव प्रतिष्ठान सोलापूर केंद्राचे अध्यक्ष गो. मा. पवार होते. व्यासपीठावर माजी आमदार युन्नूसभाई शेख, माजी खासदार धर्मण्णा सादूल, आमदार दिलीप सोपल, राजशेखर शिवदारे, राहुल शहा, विचारवंत दत्ता गायकवाड, प्रतिष्ठानचे सचिव दिनेश शिंदे उपस्थित होते.
प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्ज्वलन आणि यशवंतराव चव्हाणांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर सचिव दिनेश शिंदे यांनी प्रास्ताविक केले. राज्यात प्रतिष्ठानची १० कार्यालये असून, सोलापूरचा ११ व्या केंद्राचा शुभारंभ होत असल्याचे स्पष्ट केले.
प्रतिष्ठानचे सदस्य, आमदार दिलीप सोपल यांनी यशवंतरावांच्या आठवणींना उजाळा दिला. आजच्या गतिमान काळात कोणाला थांबायला वेळ नाही.. डायरेक्ट वरच्या पदापर्यंत पोहोचण्याची घाई झाली आहे. तळागाळातील सामान्यांचे काम करुन आलेल्या अनुभवावर जनतेचे प्रश्न मांडता येतात, हे हल्लीची पिढी विसरत चालल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली.
उल्हास पवार यांनी आपल्या व्याख्यानातून यशवंतरावांच्या विविध पैंलूंवर प्रकाश टाकला. जातीनिरपेक्षता मांडणारे प्रभावी नेते, उत्त संसदपटू होते. जनसंपर्क कसा असावा याचा आदर्श वस्तूपाठ त्यांनी घालून दिला. सामान्य कार्यकर्त्यांची उंची कशी वाढवावी याची उत्तम जाण त्यांच्याकडे होती. वसंतराव नाईक यांच्यासारख्या दूददृष्टी नेता ११ वर्षे राज्याचा मुख्यमंत्री राहिला हे यशवंतरावांनी त्यांच्यातील हेरलेल्या कार्तकर्तृत्वामुळेच. आजचा काळातही आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये यशवंतरावांचे योगदान मोलाचे असल्याचे स्पष्ट केले.
कार्यक्रमाचा समारोप डॉ. गो. मा. पवार यांच्या अध्यक्षीय भाषणाने झाला. त्यांनी यशवंतरावांच्या विविध पैलूंची उदाहरणे दिली.
Thursday, 6 October 2016
पाचवी शक्ती ह्या विषयावर शास्त्रज्ञ प्रा. एन. कृष्णन यांचे व्याख्यान
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान आणि मराठी विज्ञान परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने प्रा. एन. कृष्णन (शास्त्रज्ञ, टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ फंडामेंटल रिसर्च) यांचे The fifth force (पाचवी शक्ती) ह्या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. आतापर्यंत आपल्याला गरूत्वाकर्षण शक्ती, चुंबकीय शक्ती, तीव्र अणुशक्ती, आणि सौम्य अणुशक्ती ह्या चार प्रकारच्या शक्ती माहित आहेत. तथापि, पाचवी शक्ती अस्तित्वात असल्याचे पुरावे हाती येत आहेत. हीच पाचवी शक्ती हा सदर व्याख्यानाचा विषय आहे. व्याख्यान २२ ऑक्टोबर २०१६ रोजी सायंकाळी ५.०० वाजता रंगस्वर सभागृह, चौथा मजला, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान केंद्र, जनरल जगन्नाथराव भोसले मार्ग, मंत्रालयाजवळ, मुंबई ४०००२१ येथे होणार आहे.
Tuesday, 4 October 2016
स्व. भा. ल. भोळे स्मृती व्याख्यानमाला संपन्न..
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान विभागीय केंद्र नागपूर, आधार बहुउद्देशिय संस्था, नागपूर व महात्मा गांधी स्मारक निधीच्या संयुक्त विद्यमाने 'विवेकवादी जगणे खरंच इतके कठीण आहे का?" या विषयावर अंधश्रद्धा निर्मूलन समिती, दापोलीचे कार्यकर्ते मा. मुक्ता दाभोळकर यांच्या व्याख्यानाचे आयोजन दि. ३० सप्टेंबर २०१६ रोजी सायं ६.०० वाजता श्रीमंत बाबुराव धनवटे सभागृह, राष्ट्रभाषा संकुल, शंकरनगर चौक, नागपूर येथे करण्यात आले.
याप्रसंगी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान विभागीय केंद्र. नागपूरचे अध्यक्ष मा. डॉ. गिरीश गांधी अध्यक्षस्थान होते
सोलापूर विभागीय केंद्रातर्फे व्याख्यानाचे आयोजन..
सोलापूर विभाग : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सोलापूर विभागीय केंद्राच्या वतीने 'आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीत यशवंतराव चव्हाणांचे योगदान' हे व्याख्यान रविवार ९ ऑक्टोबर, सायंकाळी ५.३० वाजता वा.का. किर्लोस्कर सभागृह, २ रा मजला, हिराचंद नेमचंद वाचनालय, सोलापूर येथे आयोजित केले आहे. वक्ते मा. उल्हासदादा पवार व कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. डॉ. गो. मा. पवार असणार आहेत या कार्यक्रमास व व्याख्यनास आपली उपस्थिती रहावे अशी विनंती यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सोलापूर विभागीय केंद्राच्या वतीने करण्यात आली आहे.
Subscribe to:
Posts (Atom)