Tuesday, 18 December 2018

सोलापूर विभागातर्फे यंदाचा यशवंतराव चव्हाण गौरव पुरस्कार डॉ. शिवाजीराव देशमुख यांना प्रदान

सोलापूर विभागीय केंद्र आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबईतर्फे पहिला यशवंतराव चव्हाण गौरव पुरस्कार महाराष्ट्रातील जेष्ठ विचारवंत प्रा. डॉ. अशोक चौसाळकर यांच्या शुभहस्ते प्रा. डॉ. शिवाजीराव देशमुख यांना हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या डॉ. वा.का.किर्लोस्कर सभागृहात प्रदान करण्यात आला रोख रु. १५,०००/- मानपत्र शाल व श्रीफळ व पुष्पहार असे या पुरस्काराचे स्वरूप होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. गो. मा. पवार होते. 
देशमुख यांनी यशवंतराव चव्हाण साहेबांच्या साहित्यावर संशोधनावर केल्यामुळे डॉ. बाबासोहब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने त्यांना पीएचडी ही पदवी बहाल केली आहे. चव्हाण साहेबांच्या साहित्यावर पीएचडी करणारे देशमुख हे पहिले पीएचडी धारक आहेत. तसेच यशवंतराव चव्हाण यांच्या साहित्यावर त्यांचे ३ ग्रंथ प्रकाशित झाले आहेत. यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्धी निमित्त त्यांनी महाराष्ट्रात ३०० हून अधिक व्याख्याने दिली आहेत. त्यांच्या एकूण साहित्य सेवेबद्दल त्यांना यंदाचा यशवंतराव चव्हाण गौरव पुरस्कार देण्यात येत असल्याचे मा. दत्ता गायकवाड यांनी सांगितले.
महाराष्ट्र निर्मितीचा पाया आणि यशवंतराव चव्हाण या विषयावर प्रमुख पाहुणे प्रा. डॉ. अशोक चौसाळकर यांनी सखोल माहिती आपल्या व्याख्यानातून दिली. या प्रसंगी विभागीय केंद्राचे कोषाध्यक्ष राजशेखर शिवदारे सदस्य युन्नुसभाई शेख, दत्ता गायकवाड, राहुल शहा, दीपक साळुंखे आणि प्रकाश येलगुलवार यांच्यासह साहित्य कला सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मंडळी या समारंभात उपस्थित होते.

Tuesday, 11 December 2018

ज्येष्ठ नागरिकांचा कायदा आणि विविध योजना या विषयावरती कायदेविषयक मार्गदर्शन

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई आणि कायदेविषयक सहाय्य व सल्ला फोरम यांच्या 'आपला कायदा जाणून घ्या' या व्याख्यानमाले तर्फे 'ज्येष्ठ नागरिकांचा कायदा आणि विविध योजना' या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. या विषयावरती मा. अॅड. भुपेश सामंत हे मार्गदर्शन करणार असून हा कार्यक्रम शुक्रवारी १४ डिसेंबर २०१८ रोजी सायंकाळी ५ वा. बोर्ड रूम, पाचवा मजला, यशवंतराव चव्हाण केंद्र. जनरल जगन्नाथ भोसले मार्ग, नरिमन पाईंट, मुंबई येथे सुरू होईल. 

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे अध्यक्ष मा. शरदचंद्रजी पवार यांना ७८ व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे अध्यक्ष मा. शरदचंद्रजी पवार यांना ७८ व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...


Monday, 10 December 2018

१५ डिसेंबरपासून ‘फिल्मिन्गो आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सव-२०१८’

प्रयोग मालाड संस्था, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबईच्या नवमहाराष्ट्र युवा अभियानतर्फे ‘फिल्मिन्गो आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सव-२०१८’ चे आयोजन करण्यात आले आहे. हा फेस्टिवल १५ डिसेंबर आणि १६ डिसेंबर २०१८ रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई येथे होईल. 

Wednesday, 5 December 2018

९ व्या यशवंत आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलच्या नोंदणीला सुरूवात..


No automatic alt text available.
दरवर्षीप्रमाणे यंदाही बहुचर्चित यशवंत आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला १८ जानेवारी २०१९ ला सुरूवात होत आहे. चित्रपट महोत्सव यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई आणि पुणे फिल्म फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने चव्हाण सेंटर, जनरल जगन्नाथराव भोसले मार्ग, नरिमन पॉईंट येथे होणार आहे.

चित्रपट महोत्सवाचे हे नववे वर्ष असून १८ जानेवारी ते २४ जानेवारी दरम्यान होणा-या महोत्सवामध्ये ग्लोबल सिनेमा, रेट्रोस्पेक्टीव्ह, इंडियन सिनेमा, कंट्री फोकस आणि मराठी सिनेमा इत्यादी प्रकारचे सिनेमे दाखवण्यात येणार आहेत. तसेच ऑनलाईन नोंदणी पुढील लिंकवरती करता येईल www.yiffonline.com.

Wednesday, 28 November 2018

विदर्भ संशोधन मंडळ, नागपूर या संस्थेला यशंवतराव चव्हाण राज्यस्तरीय २०१८ पुरस्कार प्रदान...


Image may contain: 6 people, people smiling, people standing and wedding
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या ३४ व्या पुण्यतिथीनिमित्त यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात शुक्रवारी २५ नोव्हेंबर २०१८ रोजी यशंवतराव चव्हाण राज्यस्तरीय २०१८ पुरस्कार प्रदान सोहळा पार पडला. यावेळी स्वागतपर भाषण प्रतिष्ठानचे कोषाध्यक्ष हेमंत टकले यांनी केले. त्यानंतर खासदार व प्रतिष्ठानच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी प्रास्ताविक भाषणात अपंग हक्क विभागातर्फे ६००० विद्यार्थांना श्रवणयंत्र वाटप करण्यात आले याची दखल गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झाली असल्याचे सांगितले. त्यामध्ये विजय कान्हेकर यांचे महत्वपूर्ण योगदान लाभले त्याबद्दल यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान तर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. प्रतिष्ठानच्यावतीने आरोग्य, अपंग व इतर उपक्रमाविषयी थोडक्यात आढावा घेतला. तसेच विधवा महिला पुनर्वसन उपक्रम 'उमेद'च्या माध्यमातून राबविला जात आहे. शिक्षण व शिक्षणक्षेत्रात होणारे बदल प्रतिष्ठानच्या माध्यामतून राबविणे अशा अनेक उपक्रमांविषयी माहिती दिली. यावेळी या कार्यक्रमात १२ मार्च २०१९ रोजी ‘यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार’ रिझर्व्ह बँकेचे माजी २३ वे गव्हर्नर रघुराम राजन यांना दिला जाईल अशी घोषणा पुरस्कार समितीचे अध्यक्ष अनिल काकोडकर यांनी केली.

नव्या पिढीच्या संशोधकांना स्वतंत्र व्यासपीठ प्राप्त व्हावे, त्यांच्यात संशोधनाविषयी आवड निर्माण व्हावी व त्यांच्या संशोधनाला चालना प्राप्त होऊन नव-नवीन संशोधन विद्वज्जनांच्या पुढे यावे या उद्देशाने विदर्भ संशोधन मंडळाची स्थापना होऊन विस्तार झाला. सदर संस्थेचे दीर्घकालीन वाङमयीन व ऐतिहासिक कार्य लक्षात घेता या कार्याची गौरवपूर्ण नोंद घ्यावी म्हणून यावर्षी यशंवतराव चव्हाण राज्यस्तरीय २०१८ पुरस्कार विदर्भातील 'विदर्भ संशोधन मंडळ, नागपूर' या संस्थेला प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष अरुण गुजराथी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. पुरस्कार संस्थेच्या वतीने राजेंद्र पाठारे व मदन कुलकर्णी यांनी स्विकारला.या पुरस्काराच्या सन्मानपत्राचे वाचन प्रतिष्ठानचे सरचिटणीस शरद काळे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमरिश मिश्रा यांनी केले

राजू परुळेकरांचे सत्याविरुध्दचे प्रचारयुग विषयावरवरती विध्यार्थ्यांना धडे

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई आणि विभागीय केंद्र ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने बा.ना बांदोडकर विज्ञान महाविद्यालय ठाणे येथे सत्याविरुद्धचे प्रचार या विषयावरती ज्येष्ठ पत्रकार राजू परुळेकर यांच्या व्याख्यानाचे आयोजन केले होते.
कार्यक्रम महाविद्यालयात असल्याने विद्यार्थ्यांची अधिक उपस्थिती होती. विध्यार्थ्यांना कळेल आणि समजेल अशा उदाहरणे देऊन परुळेकरांनी व्याख्यानाला सुरुवात केली. एक असत्य बोलल्यावर किती असत्य बोलावं लागतं. हे उदाहरण त्यांनी सुरुवातीला दिल. त्यानंतर त्यांनी प्रत्येक क्षेत्रातील उदाहरणे दिली. हा संपूर्ण कार्यक्रम खालील लिंकवरती उपलब्ध आहे.
https://www.facebook.com/ybchavanpratishthan/videos/2114104765570632/