Tuesday 18 October 2016

'पर्व-प्रगतीचे, परिवर्तनाचे' ....


यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई ही संस्था गेली तीन दशके सामाजिक-सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत आहे. अनेक क्षेत्रांत वेगवेगळे उपक्रम राबविताना नव्या पिढीची जडण-घडण सम्यकपणे घडावी, असा आम्हा सर्वांचाच प्रयत्न असतो. प्रागतिक आणि परिवर्तनवादी विचारांची विधायक दृष्टी असलेली क्रियाशील तरुणाई या प्रक्रियेतून पुढे येईल, अशी आशा आहे. त्यादृष्टीने शालेय व महाविद्यालयीन युवा वाचकांसाठी 'पर्व-प्रगतीचे, परिवर्तनाचे' ही पुस्तिका प्रकाशित करीत आहोत व त्याला एक राज्यव्यापी उपक्रमाची जोड देत आहोत. या पुस्तिकेचा संदर्भ असलेले विषय घेऊन माध्यमिक विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा व कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धा जिल्हा स्तरावर व राज्य स्तरावर आयोजित केली आहे. या निबंध व वक्तृत्व स्पर्धेच्या माध्यमातून या पुस्तिकेचे व इतर अनुषंगिक साहित्याचे वाचन व मनन विद्यार्थी करतील आणि या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होतील, अशी अपेक्षा आहे.
आदरणीय पवारसाहेबांच्या कायदे मंडळातील कारकिर्दीला अविरत पाच दशकांचा कालावधी एकाही दिवसाच्या खंडाविना पूर्ण होत आहे, ही आपल्या सर्वांनाच आनंदानची व अभिमानाची बाब आहे. यानिमित्ताने त्यांच्या या कारकिर्दीतील काही महत्त्वाची धोरणे व निर्णय यांचा या पुस्तिकेत अतिशय मोजक्या शब्दांत परिचय करून दिला आहे. अतिशय कमी वेळेत या पुस्तिकेच्या संदापनाची जबाबदारी ज्येष्ठ पत्रकार पद्मभूषण देशपांडे यांनी पार पाडली, त्याबद्दल त्यांचे मन:पूर्वक आभार.
- सुप्रिया सुळे, कार्याध्यक्ष, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई
http://ycpmumbai.com/images/pdf/s_pawar_book_18102016.pdf

No comments:

Post a Comment