Wednesday 31 August 2016

डॉ. बाबासाहेब आंबेडकर या डॉ. दिलिप गरुड लिखित पुस्तकावर प्रश्नमजुषा...



पुणे विभागीय :  केंद्रामार्फत दरवर्षी, इयत्ता ८ वी व ९ वीच्या विद्यार्थ्यासाठी एखाद्या राष्ट्रीय पुढा-याचे आत्मचरित्रावर प्रश्न मंजुषा आयोजित केली जाते. यंदा राष्ट्रहितैषी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या डॉ. गरुड लिखित पुस्तकावर ही परिक्षा घेण्यात येत आहे.

शाळांना प्रतिष्ठानने या पुस्तकाच्या प्रत्येकी पाच मोफत प्रती वाटल्या आहेत. त्या शिवाय संबंधित शाळातील ९३ शिक्षकांना भिडे परिवार ( मंगेशी) यांनी या पुस्तकाच्या प्रती मोफत वाटल्या आहेत हे पुस्तक प्रतिष्ठानने लिहून घेतले असून आजवर त्याच्या २००० प्रतीची प्रथम आवृत्ती पूर्णपणे खपली असल्याचे प्रकाशकांकडून समजते. सदर पुस्तकांवर आधारित "प्रश्नमंजूषा" प्रश्नोत्तराच्या २९४६ प्रती ५७ शाळांमधून आजपावेतो प्राप्त झाल्या असून, अंदाजे ७५ शाळांमधील ३५०० विद्यार्थी या प्रश्नमंजूषा कार्यक्रमांत भाग घेतली अशी अपेक्षा. सदर पेपर तपसणीचे काम चालू असून साधारणपणे यांतून २०० गुणवान विद्यार्थ्यांची निवड करण्यांत येईल. त्यांना प्रत्येकी रु. १००/- चे शैक्षणिक साहित्य वाटण्यात येईल.

शनिवार दिनांक २४ सप्टेंबर २०१६ रोजी कै. डॉ. वसंतदादा पाटील विद्यानिकेतन या प्रशालेत या दोनशे विद्यार्थी व सहभागी शाळेचा प्रत्येकी एक शिक्षक वा शिक्षक पालक संघासाठी एक दिवसाचे शिबीर आयोजित केले आहे. त्यामध्ये २०० विद्यार्थ्यांची परिक्षा घेऊन पत्येकी ७वी, ९वी तर्फे प्रथम रु. ५००/-, द्वितीय रु ४००/-, तृतीय रु. ३००/- व उत्तेजनार्थ प्रत्येकी रु. २००/- प्रत्येकी पाच पारितोषिके त्याच दिवशी वाटण्यांत येणार आहेत.
त्याशिवाय तज्ञांची खालील विषयावर व्याख्यानेही आयोजिण्यांत येत आहेत.

१. टीन एजर्सचे मनांत २. बुद्धी वर्धन (मन:शक्ती ) ३. आरोग्यम् धनसंपदा याशिवाय राष्ट्रहितैषी डॉ. बाबासाहेब या विषयावर प्राथमिक व उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षण अन्य सेवक यांचेकडून दोन हजार शब्दसंख्या मर्यादेपर्यंचे निबंध मागविण्यात आले आहेत. त्यातील प्रथम क्र. रु. १०००/-, द्वितीय क्र रु. ७५०/-, तृतीय क्रमांक ५००/- उत्तेजनार्थ रु. ४००/- अशी पारितोषिके वाटली जातील.

Tuesday 30 August 2016

महिलांसाठी सौंदर्यविषयक कार्यशाळा संपन्न...




यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई महाराष्ट्र महिला व्यासपीठातर्फे व 'ब्यूटीलाईन खुबसुरत'च्या संयोगाने महिलांसाठी सौंदर्यविषयक मार्गदर्शनासाठी एक विनामूल्य कार्यशाळा मंगळवार दिनांक ३० ऑगस्ट २०१६ रोजी आयोजित करण्यांत आली होती. ह्या कार्यशाळेला महिलांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला संयोजिका ममता कानडे यांनी प्रास्ताविक केले व कार्यशाळेची सुत्रे 'ब्यूटीलाईन खबसुरत"च्या संचालिका गीता सरवय्या यांचेकडे दिली. गीता सरवय्या यांनी उपस्थित महिलांना सौंदर्यविषयक विविध बाबींसंबंधी तपशीलवार माहिती दिली. केसांची निगा, त्वचा, डोळे वगैरेंची काळजी घेण्याच्या पद्धती व नानाविध टीप्स देत वेगवेगळ्या सौंदर्य प्रसाधनाचा वापर कसा करावा याचे धडे कार्यशाळेत दिले. कार्यक्रमाच्या अखेरीस,  प्रतिष्ठानच्या महाराष्ट्र महिला व्यासपीठाच्या संचालिका ममता कानडे यांनी सांगितले की  २६ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर या काळात पाच दिवसांची सौंदर्यविषयक मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यांत आली आहे. त्यात शुल्क रू.३००/- शुल्क भरून महिलांना सहभागी होता येईल.
या संदर्भात अधिक माहिती व नावनोंदणीसाठी कृपया संजना पवार व संगिता गवारे यांच्याशी ( दूरध्वनी - २२०४५४६० विस्तारित क्र. २४४ अथवा भ्रमणध्वनी ८२९१४१६२१६ ) वर संपर्क साधावा.

श्रीमती महाश्वेतादेवी यांच्या जीवनावर व साहित्यावर लोकसंवाद उपक्रमांतर्गत कथावाचन आणि चर्चासत्राचे आयोजन



राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रसिद्ध साहित्यिका श्रीमती महाश्वेतादेवी यांचे नुकतेच निधन झाले आहे. साहित्य क्षेत्रामध्ये अनेक लेखकांनी आपपल्या लेखनाने आपली दालने समृद्ध केली आहे. श्रीमती महाश्वेतादेवी त्यांमधील एक आहेत. त्यांची हजार चौरासी की मॉ ही कादंबरी प्रसिद्ध आहे. त्यांच्या जीवनावर व साहित्यावर लोकसंवाद उपक्रमांतर्गत कथावाचन आणि चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.

हे चर्चासत्र शनिवार दिनांक ३ सप्टेंबर २०१६ रोजी सायंकाळी ४ ते ९ या वेळेत प्रतिष्ठानच्या सांस्कृतिक सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. 

कार्यक्रमाची रुपरेषा खालीलप्रमाणे -
४:०० - ४:१० स्वागत , प्रस्तावना
४:१० - ४:४५ / महाश्वेतादेवी जीवन व कार्य - इलिना सेन 
४:४५ - ५:४५ / कथावाचन  - उल्का महाजन , सोनाली शिंदे
५:४५ - ८:१५ / फिल्म स्क्रीनिंग - रॅमन मॅगसेसे पुरस्कारप्राप्त कादंबरी आधारित - 'हजार चौरासी की मॉ'
८:१५ - ८:४५ / मते आणि चर्चा 







Saturday 27 August 2016

अणू-रेणूंची संरचना विषयावर रंगले डॉ. मानसी राजाध्यक्ष यांचे व्याख्यान


यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई आणि मराठी विज्ञान परिषद ह्या दोन संस्थांच्या वतीने ‘डावे-उजवे’ अर्थात अणू-रेणूंची संरचना ही संकल्पना जनसामान्यांसमोर सोप्या भाषेत स्पष्ट करणारे व्याख्यान शुक्रवार दिनांक २६ ऑगस्ट रोजी प्रतिष्ठानच्या सभागृहात आयोजित करण्यांत आले होते. हे व्याख्यान ऐकण्यासाठी उपस्थित श्रोत्यांमध्ये शाळकरी विद्यार्थ्यांची मोठी उपस्थिती होती. व्याख्यानानंतर वक्त्यांशी झालेल्या प्रश्नोत्तर सत्रात मोठ्यांबरोबर ह्या विद्यार्थ्यांनीही अतिशय उत्साहाने सहभाग घेतला. ‘दिसायला सारखे असणे वा वाटणे, आणि प्रत्यक्ष सारखे असणे’ यात खूप मोठा फरक असतो हे अणू-रेणूंच्या संरचनेमध्ये काळजीपुर्वक लक्षात घ्यावे लागते’ हा मुद्दा डॉ. मानसी राजाध्यक्ष यांनी प्रश्नोत्तरा दरम्यान अधिक स्पष्ट केला. डॉ. राजाध्यक्ष यांचे व्याख्यान पडद्यावर बदलणा-या अनेक स्लाईडसच्या मदतीने होत असल्याने श्रोत्यांपर्यंत ते उत्तमरित्या पोहोचले, व अतिशय रंगले.

Wednesday 24 August 2016

महिलांसाठी ३० ऑगस्ट (मंगळवार) रोजी सौंदर्यविषयक कार्यशाळा प्रवेश नि:शुल्क




सुंदर व नीटनेटके रहावे असे प्रत्येक स्त्रीला वाटते मग ती नोकरी करणारी असो वा गृहिणी असो. २१ व्या शतकातील स्त्री  नोकरी व घर सांभाळून स्वत:च्या व्यक्तिगत सौंदर्याबाबत जागरुक झाली आहे. ह्याच उद्देशाने व्यक्तिगत सौंदर्य प्रसाधन म्हणजेच Personal Grooming या विषयावरील  विनामूल्य कार्यशाळा मंगळवार दिनांक ३० ऑगस्ट २०१६ रोजी दुपारी २ ते ५ ह्या वेळेत  यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई,  बेसमेंट हॉल, नरिमन पाँईट, मुंबई -४०००२१. येथे आयोजित केले आहे.  कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी कृपया संजना पवार व संगिता गवारे यांच्याशी ( दूरध्वनी - २२०४५४६० विस्तारित क्र. २४४ अथवा भ्रमणध्वनी ८२९१४१६२१६ ) वर संपर्क साधावा.

आरोग्याची काळजी कशी घ्यावी कार्याशाळा संपन्न...



सध्याच्या धकाधकीच्या जीवनात लोक स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. व त्याचे दुष्परिणाम फार त्रासदायक होतात. तेव्हा आपल्या आरोग्याविषयी सतर्क रहाणे फार गरजेचे आहे. हे लक्षात घेऊन आरोग्याविषयी काय काय काळजी घ्यावी,दिनचर्या व आहार कसा असावा तसेच विविध शारीरिक व्याधी व त्यावरील उपाय व या व्याधी होऊच नये म्हणून घेण्यात येणारी दक्षता यावरील आयुर्वेदिक उपचार पद्धती याविषयी पोतदार आयुर्वेदिक कॉलेज मधील डॉक्टरांचे दोन दिवसीय शिबिर  यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई महाराष्ट्र महिला व्यासपीठातर्फे दि २ व १२ ऑगस्ट २०१६ रोजी दुपारी २ ते ५ या वेळेत माफक शुल्कात आयोजित केले होते या शिबिरास  महिलांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्त्रीरोग, नेत्र आरोग्य,स्वास्थ स्वंरक्षण व घरगुती फेसपॅक व आयुर्वेदिक साबण निर्मिती या विषयावर प्रशिक्षकांनी पी पी टी, नोट्स प्रात्यक्षिक द्वारे मार्गदर्शन केले. तयार केलेले लिपबाम, साबण महिलांना वाटण्यात आले.

Monday 22 August 2016

कुठलीही कला शिकायची असेल तर वेळ लागतो पण ती अशक्य नाही..


'यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान'च्या महाराष्ट्र महिला व्यासपीठ विभागातर्फे तसेच ओरिगामी, ठाणे यांच्या सहकार्याने पर्यावरण स्नेही हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन ओरिगामी कागदी कलेचा वापर करुन इको फ्रेंडली पद्धतीने गणेशाची नऊ इंच प्रतिकृती, उंदिर, मोदक व कागदाची फुलांची सजावट शिकविण्याचे प्रशिक्षणाची २२ ऑगस्ट २०१६ पार पडले.  ह्या प्रशिक्षण कार्यक्रमांत अनेक महिलांनी सहभाग नोंदविला होता.




कार्यक्रमाची सुरुवातीला कार्यक्रमाच्या संयोजिका ममता कानडे यांनी ओरिगामी, ठाणे चे रविंद्र प्रधान व त्यांचे सहकारी ( जयंत कायल, प्रकाश सागुरडेकर, विद्याधर म्हात्रे ) यांचा परिचय करुन दिला व महाराष्ट्र महिला व्यासपीठमार्फत राबविलेल्या जाणा-या कार्यक्रम व उपक्रमाची थोडक्यात माहिती करुन दिली. त्यावेळी ओरिगामी, ठाणे चे संस्थापक रविंद्र प्रधान यांनी सांगितले की 'कुठलीही कला शिकायची असेल तर वेळ लागतो पण ती अशक्य नाही', त्यानंतर ओरिगामी, ठाणे यांच्या सहकार्याने महिलांना गणेशाची प्रतिकृती, उंदिर, मोदक बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले.

या प्रशिक्षणास पार पाडण्यासाठी महाराष्ट्र महिला व्यासपीठाच्या संजना पवार व संगिता गवारे ह्याचे मोलाचे सहकार्य लाभले. २३ ऑगस्ट रोजी दुपारी २ ते ५ हा वेळामध्ये शुल्क ३००/- भरून हे पुढील भाग म्हणजे 'ओरिगामी कागदी फुलांची सजावट' प्रशिक्षण दिले जाणार आहे.

Tuesday 16 August 2016

'विज्ञानगंगा'चे सहावे पुष्प...


यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई व मराठी विज्ञान परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने 'विज्ञानगंगा' कार्यक्रमांतर्गत डॉ. मानसी राजाध्यक्ष यांचे एखाद्या रसायनातील काही रेणूंची रचना त्याच रसायनाच्या इतर रेणूंच्या तुलनेत उलटी असली तर त्या रेणूंचे गुणधर्म अगदी वेगळे आणि विपरीत असू शकतात. अशा उलट्या रचना असणा-या रसायनांच्या शोधांचा आणि ते वेगळे करण्याच्या पद्धती यावर 'डावे उजवे' या विषयावरील सहावे पुष्प शुक्रवार दिनांक २६ ऑगस्ट २०१६ रोजी सायंकाळी ५.०० वाजता चव्हाण सेंटर, रंगस्वर सभागृह, ४ था मजला, जनरल जगन्नाथराव भोसले मार्ग, मंत्रालयासमोर, नरिमन पॉईट, मुंबई - ४०००२१ येथे आयोजित केलेले आहे. तरी वरील कार्यक्रमास आपण उपस्थित रहावे.