Sunday 31 March 2019

काव्यमैफल – ‘वाचे बरवे कवित्व’


काव्यमैफल वाचे बरवे कवित्व
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, महाराष्ट्र महिला व्यासपीठ आणि रंगस्वर यांच्या विद्यमाने ११ एप्रिल २०१९ रोजी सायंकाळी ४ वाजता सांस्कृतिक सभागृह, चौथा मजला, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई येथे काव्यमैफलीचे आयोजन करण्यात आले आहे. माणसांच्या भावभावना गुंफणारी, मनाबुद्धीच्या पल्याड चैतन्यमयी प्रदेशाला साद घालणारी वाचे बरवे कवित्व काव्यमैफल ऐकण्यासाठी आवर्जून उपस्थित रहा.



UPSC / MPSC स्पर्धा परिक्षांसाठी मार्गदर्शन शिबिर...


UPSC / MPSC स्पर्धा परिक्षांसाठी मार्गदर्शन शिबिर...
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई संचालित यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय ग्रंथालय यांच्या विद्यमाने UPSC / MPSC स्पर्धा परिक्षांसंदर्भात मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले आहे. ४ एप्रिल २०१९ रोजी सायंकाळी ४ वाजता, सांस्कृतिक सभागृह, चौथा मजला, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे द युनिक अकॅडमी, मुंबईचे मंगेश खराटे, माधवी तटवरे तसेच डॉ. पूनम जयवर, प्रा. अजित खराडे हे विनामूल्य मार्गदर्शन करणार आहेत. पोलिस उप निरिक्षक सुशांत खराटे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. अधिक माहितीसाठी अनिल पाझारे, ग्रंथालय संसाधन व ज्ञान व्यवस्थापक ९८२१६८११४७ या क्रमांकावर संपर्क करावा.      



Tuesday 26 March 2019

दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत करिअर मार्गदर्शन...


१० वी व १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत करिअर मार्गदर्शन...
परिक्षा संपली? आता पुढे काय? मार्गदर्शन हवयं?
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई तर्फे दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत करिअर मार्गदर्शन सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक २ एप्रिल २०१९ रोजी सकाळी ११ वा. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे निवड संस्थेच्या सल्लागार श्रीमती प्रीती नायडू विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. नोंदणीकरिता पुढील क्रमांकावर संपर्क करावा. ०२२-२२८१७९७५, ०२२-२२०४३६१७, ९७६९२५६३४३.



Thursday 21 March 2019

महाराष्ट्र निर्माण करण्याची क्षमता फक्त यशवंतराव चव्हाण यांच्यामध्येच होती


महाराष्ट्र निर्माण करण्याची क्षमता फक्त यशवंतराव चव्हाण यांच्यामध्येच होती
                                                                                                         - प्रा. राजेंद्र दास
 
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई विभागीय केंद्र सोलापूर आणि श्री संत दामाजी महाविद्यालय मंगळवेढा यांच्या संयुक्त विद्यमाने यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त यशवंतराव चव्हाण यांच्या संकल्पनेतला महाराष्ट्र या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. राजकारणा पेक्षा समाजकारणात त्यांनी जास्त लक्ष घातले. जातीच्या कोणत्याच कप्प्यात ते अडकले नाहीत. राजकारणाचा, सत्तेचा उपयोग सामान्यांना कसा होईल यावर त्यांचा भर होता. प्रशासन, शिक्षण, सहकार, ग्रामीण महाराष्ट्र, उद्योग व्यवसाय या प्रत्येक क्षेत्रात ते महाराष्ट्राचा विकास पाहत होते त्याचबरोबर साहित्य, कला आणि सांस्कृतिक क्षेत्रात त्यांचे योगदान मोलाचे आहे त्यामुळे तरूण पिढीने यशवंतराव चव्हाण कोण होते हे जाणून घेणे गरजेचे आहे असे प्रतिपादन प्रा. राजेंद्र दास यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी जेष्ठ विचारवंत मनोहरपंत धोगडे व प्रमुख पाहुणे म्हणुन विभागीय केंद्राचे सदस्य राहुल शहा उपस्थित होते तसेच प्राचार्य पवार यांच्यासह विद्यार्थी व प्राध्यापक उपस्थित होते. 








Monday 18 March 2019

कायदा साक्षरता कार्यशाळा संपन्न...


कायदा साक्षरता कार्यशाळा संपन्न...
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, कायदेविषयक सहाय्य व सल्ला फोरम, मुंबई व टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, खारघर यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि. १७ मार्च रोजी कायदा विद्यार्थ्यांसाठी एकदिवसीय कायदा साक्षरता कार्यशाळा टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, खारघर येथे आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेमध्ये कायद्याच्या शिक्षणाचे महत्त्व आणि त्याची उपयुक्तता, महिला व मुलांचे लैंगिक शोषण आणि प्रतिबंधीत करण्यासाठी कायदेशीर तरतुद, प्रजननविषयक करार / करार विवाह इ., सरोगेसी प्रक्रिया संबंधित कायदेशिर पैलू, माहितीच्या अधिकाराचे महत्त्व या पाच विषयांवर मराठी व इंग्रजी भाषांमध्ये व्याख्याने आयोजित करण्यात आली होती. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना कार्यशाळेचे प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, कायदेविषयक सहाय्य व सल्ला फोरमचे सचिव विनायक कांबळे, अॅड.दिलीप तळेकर, अॅड. प्रॉस्पर डिसुजा, अॅड. भूपेश सामंत, अॅड. डॉ. प्रकाश देशमुख, आदि उपस्थित होते.







Sunday 17 March 2019

आता शिका शनिवार-रविवार सोसायटी व्यवस्थापनाचे धडे...


आता शिका शनिवार-रविवार सोसायटी व्यवस्थापनाचे धडे...
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान आणि महाराष्ट्र महिला व्यासपीठातर्फे 'सहकारी गृहनिर्माण संस्था व्यवस्थापक प्रशिक्षण या विषयावर प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे. दिनांक १ जून ते २८ जुलै २०१९ या कालावधी मध्ये (शनिवार-रविवार) दुपारी ११ ते ५ या वेळेमध्ये यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मधील बेसमेंट हॉल मध्ये प्रशिक्षण दिले जाईल. हे प्रशिक्षण मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषेमध्ये असणार असून प्रशिक्षण शुल्क १०,०००/- भरून सहभागी होता येईल. कोर्स पूर्ण झाल्यानंतर परिक्षा घेण्यात येईल तसेच प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण करणा-यास प्रमाणपत्र दिले जाणार आहे.  या संदर्भात अधिक माहितीसाठी व नाव नोंदणीसाठी कृपया संजना पवार यांच्याशी ( दूरध्वनी २२०४५४६०, २२०२८५९८, विस्तारित क्र. २४४ अथवा भ्रमणध्वनी ८२९१४१६२१६) वर संपर्क साधावा.


किशोर कुमार यांच्या आठवणी व गीतांनी रसिक मंत्रमुग्ध


किशोर कुमार यांच्या आठवणी व गीतांनी रसिक मंत्रमुग्ध
एका आगळ्यावेगळ्या संकल्पनेवर आधारीत किशोरदांच्या गाण्यांचा कार्यक्रमाची निर्मिती केली असून आज मुझे कुछ कहना है... किशोर कुमार दिल से... या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.ख्वाब हो तुम या कोई हकीकत’, ‘नखरे वाली देखने मे देख लों है कैसी’, ‘भोली भाली..अशा एकाहून सरस लोकप्रिय गीतांनी व आठवणींनी विश्वास गार्डन येथील रसिकांची संध्याकाळ सोनेरी झाली. किशोर कुमार यांच्या अष्टपैलू गायकाचा स्वभावाचा पैलूंचा अनोखा अविष्कार गायक मिलींद इंगळे व आरजे दिलीप यांनी प्रभावीपणे सादर केला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सुधीर संकलेचा यांनी केले. ध्वनी व्यवस्था पराग जोशी यांची होती. कार्यक्रमामध्ये वृंदा अदिवरेकर, इंडियन ऑईलचे जनरल मॅनेजर के. गुरूराज व वर्क्स मॅनेजर राजीवकुमार शर्मा, शैलेश कुटे, निलेश इंगलकर, मिलिंद इंगळे, आर.जे. दिलीप यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमास आ. छगन भुजबळ, मुन्ना उर्फ योगेश हिरे, नितीन महाजन, डॉ. मनोज शिंपी, रंजन ठाकरे,
डॉ. प्रशांत पाटील, अ‍ॅड. नितीन ठाकरे, रागिणी कामतीकर, रंगनाथ शिरसाठ, प्रसाद विजय पाटील, मिलींद धटींगण, नानासाहेब सोनवणे, अरूण नेवासकर, अनिल लाड, अमर भागवत आदी मान्यवर व रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.






अभिजात स्वरांनी रंगली पहाटेची मैफिल...


अभिजात स्वरांनी रंगली पहाटेची मैफिल...
सूर विश्वासउपक्रमाचे द्वितीय पुष्प आशिष रानडे यांनी गुंफले.  त्यांनी आपल्या दमदार सादरीकरणाने मैफिलीत रंग भरला.  रानडे यांनी मैफलीची सुरूवात बैरागी भैरवरागातील विलंबित एक तालाने केली. शब्द होते पिया के घर..., त्यानंतर त्यांनी छोटी तीन तालातील बंदिश सादर केली. वातावरणात सुमधूर तालाचा अनुभव होता.  मैफिलीची सांगता राम रंगी रंगलेया गीताने झाली.  मैफिलीला साथसंगत ईश्वरी दसककर (हार्मोनियम), रसिक कुलकर्णी (तबला), तानपुरा साथ सिद्धार्थ निकम व हेमांगी कटारे यांनी केली. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डॉ. स्मिता मालपुरे यांनी केले. ध्वनी व्यवस्था पराग जोशी यांची होती.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई विभागीय केंद्र नाशिक व विश्वास को-ऑप बँक लि. नाशिक, विश्वास ज्ञान प्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिटयुट, नाशिक, ग्रंथ तुमच्या दारी सारस्वत बँक व रेडिओ विश्वास ९०.८ कम्युनिटी रेडिओ, विश्वास गार्डन यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमास शेफाली भुजबळ, किशोर पाठक, अनिल लाड, डॉ. मनोज शिंपी, अमर भागवत, सुरेखा गोविलकर, डॉ. हरी कुलकर्णी, सी.एल. कुलकर्णी, विवेक केळकर, माधुरी कुलकर्णी, संजय परांजपे, सतीश गायधनी, मिलींद धटींगण आदी मान्यवर उपस्थित होते.





Friday 15 March 2019

विज्ञानगंगाचे छत्तीसावे पुष्प ‘मेंदूतले डावे-उजवे’...

संपूर्ण विडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

विज्ञानगंगाचे छत्तीसावे पुष्प मेंदूतले डावे-उजवे’...
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमुंबई व मराठी विज्ञान परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने विज्ञानगंगा’ कार्यक्रमांतर्गत छत्तीसावे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. संशोधक डॉ. उज्ज्वला दळवी यांनी मेंदूतले डावे-उजवे’ या विषयावर व्याख्यान दिले. मेंदूचे डावे-उजवे त्यांनी अगदी उत्तमरीत्या समजावून सांगितले. मेंदू कसा काम करतो, मेंदूचा डावा व उजवा भाग कसा कार्य करतो, प्रत्येक भागाकडे कोणते कार्य विभागून दिलेले असते याबाबतची संपूर्ण माहिती डॉ. उज्ज्वला दळवी यांनी आपल्या व्याख्यानातून दिली. त्यांनी माहितीचे प्रेझेंटेशन सादर केले. शेवटी उपस्थितांना प्रश्नोत्तर सत्रात त्यांनी मार्गदर्शन केले.



















Thursday 14 March 2019

सुप्रसिद्ध गायक किशोर कुमार यांच्या गीतांच्या मैफलीचे आयोजन…


सुप्रसिद्ध गायक किशोर कुमार यांच्या गीतांच्या मैफलीचे आयोजन

आज मुझे कुछ कहना है
प्रसिद्ध गायक मिलिंद इंगळे यांनी एका आगळ्यावेगळ्या संकल्पनेवर आधारीत किशोरदांच्या गाण्यांच्या  कार्यक्रमाची निर्मिती केली असून आज मुझे कुछ कहना है... किशोर कुमार दिल से... या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार, १६ मार्च २०१९ रोजी सायं. ६ वाजता विश्वास गार्डन, ठाकूर रेसिडेन्सी, सावरकरनगर, गंगापूर रोड, नाशिक येथे या कार्यक्रमाचा विनामूल्य आस्वाद घेता येणार आहे. मैफिलीचे निवेदन सुप्रसिद्ध आरजे दिलीप (बिग एफ.एम., मुंबई) हे करणार आहेत.



Wednesday 13 March 2019

नव्या पिढीतील गायक आशिष रानडे यांच्या गायनाचे आयोजन...


नव्या पिढीतील गायक आशिष रानडे यांच्या गायनाचे आयोजन...

नव्या पिढीतील कलाकारांच्या अविष्काराला हक्काचे व्यासपीठ देण्यासाठी सूर विश्वास या अनोख्या मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार दि. १६ मार्च २०१९ रोजी सकाळी ६.३० वा. क्लब हाऊस, विश्वास को-ऑप. बँकेसमोर, सावरकरनगर, नाशिक येथे आशिष रानडे सादर करणार आहेत. तर ईश्वरी दसककर (हार्मोनियम) व  रसिक कुलकर्णी (तबला) हे त्यांना साथ देणार आहेत.




Tuesday 12 March 2019

‘यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार’ डॉ. रघुराम राजन यांना प्रदान...

संपूर्ण विडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

STARKEY FOUNDATION, AMERIKA.

यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार डॉ. रघुराम राजन यांना प्रदान...

यशवंतराव चव्हाण यांच्या १०६ व्या जयंती रोजी यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार - २०१८’ च्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रतिष्ठानच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी केले. यशवंतराव चव्हाण कोण होते, त्यांनी केलेल्या कार्याची येणा-या पिढीला माहिती व्हावी, यासाठी यशवंतराव चव्हाण यांची माहिती पुस्तिका काढण्यात येणार आहे, असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले. पुरस्काराच्या सन्मानपत्राचे वाचन कोषाध्यक्ष हेमंत टकले यांनी केले. यानंतर यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान चे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते स्टारकी फाउंडेशनचे संस्थापक बिल ऑस्टीन यांना यशवंतराव चव्हाण विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, टाटा ट्रस्ट, ठाकरसी ग्रुप, आर. व्ही. एस. ट्रस्ट, पवार पब्लिक ट्रस्ट, महात्मा गांधी सेवा संघ जिल्हा पुनर्वसन केंद्र, पुणे यांना गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. स्टारकी फाउंडेशनचे संस्थापक बिल ऑस्टीन यांनी मनोगत व्यक्त केले. समितीचे अध्यक्ष अनिल काकोडकर यांनी राष्ट्रीय पुरस्काराबद्दल थोडक्यात माहिती दिली. या राष्ट्रीय पुरस्काराच्या मानपत्राचे वाचन प्रतिष्ठानचे सरचिटणीस शरद काळे यांनी केले. हा पुरस्कार रिझर्व बँक ऑफ इंडियाचे माजी गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांना प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंबरीष मिश्र यांनी केले. व्यवसाय करत असताना सामाजिक प्रश्नांचं भान बाळगण्याच काम बिल ऑस्टीन यांनी केलं आहे, असे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले. ते पुढे म्हणाले की, जगभरात विविध गटांतील कर्णबधीर लोकांना मोफत कर्णयंत्र देण्याचा जागतिक उपक्रम ते राबवत आहेत. शरद पवार यांच्या अध्यक्षीय भाषणानंतर सामूहिक राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.













Monday 11 March 2019

शब्द सूर व कलावंतांच्या अनोख्या आठवणींनी रंगली ‘दिलखुलास मैफल गप्पांची’...


शब्द सूर व कलावंतांच्या अनोख्या आठवणींनी दिलखुलास गप्पांची मैफल रंगली

जीवन हा आस्वाद घेण्याचा स्वर्ग आहे आणि या स्वर्गात अनेक कवी, कलावंत, साहित्यिकांनी आपल्या विलक्षण अविष्काराने रसिकांना अवर्णनीय आनंद दिला आणि त्यातून अनेकांचे जीवन समृद्ध केले. ग.दि. मांडगुळकरांनी काव्य, गीतांतून जीवनगाणे जगासमोर आणले. गुलजारांनी कवितेतून सामान्य माणसाची अस्वस्थता आपल्या गीतांतून संवेदनशीलतेने रेखाटली. पुस्तकांचे जग त्यांनी आपल्या कवितांतून दाखवले. विंदा करंदीकर, पु.ल. देशपांडे, कवी बा.भ. बोरकर यांनी आपल्या लेखनातून गावाकडचं जग, चालीरीती विविध शब्दांतून मनावर रेंगाळत ठेवण्याचे काम ठेवले आहे.
यशंवतराव चव्हाणांनी महाराष्ट्राला सुसंस्कृत, समाजकारणाची दिशा दिली. कला-साहित्य-संस्कृतीच्या विकासासाठी मोठे योगदान दिले आहे. त्यांचे स्मरण म्हणजे त्यांच्या विचारांची जोपासना होय.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिक, विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक, सारस्वत बँक, विश्वास ज्ञानप्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक, व रेडिओ विश्वास ९०.८ कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने कुलकर्णी यांच्या दिलखुलास-मैफल गप्पांचीया कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
मिलिंद कुलकर्णी यांनी शब्द-सूरांच्या आठवणींनी संध्याकाळ सोनेरी केली. यावेळी मिलींद कुलकर्णी यांनी शांता शेळके, सुधीर मोघे, वैभव जोशी, लता मंगेशकर, वसंतराव देशपांडे यांच्या कलाकर्तुत्वाच्या आठवणींना उजाळा दिला.
स्वागत व प्रास्ताविक प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष विश्वास ठाकूर यांनी केले. परिचय कोषाध्यक्ष डॉ. सुधीर संकलेचा यांनी करून दिला. मिलिंद कुलकर्णी यांचा सन्मान डॉ. मनोज शिंपी यांनी केला. सौ. ज्योत्स्ना कुलकर्णी यांचा सन्मान विवेक केळकर यांनी केला.
कार्यक्रमास प्रतिष्ठानचे सदस्य अ‍ॅड. नितीन ठाकरे, डी.जी. हंसवाणी, साधना जाधव, सतिश गायधनी, रघुनाथ सावे, प्रसाद पाटील, संतोष पाटील, डॉ. हरी कुलकर्णी, रमेश बागुल आदि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.



विशेष व्याख्यान दुष्काळाच्या झळा व निवडणुकीचे राजकारण




निवडणुकीच्या धुराळ्यात दुष्काळाच्या झळा जाणीवपूर्वक दुर्लक्षित होतील : आसाराम लोमटे

संपूर्ण देशात आता लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आहेत आणि याच काळात मराठवाडा भीषण दुष्काळाला तोंड देतोय,निवडणुकीच्या धामधुमीत दुष्काळग्रस्तांचे प्रश्न बाजूला पडण्याची भीती आहे. परंतु ते प्रश्न सजग नागरिक म्हणून आपण लावून धरायला हवे,असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार व साहित्यिक आसाराम लोमटे यांनी केले.
आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या १०६ व्या जयंतीच्या निमित्ताने यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान,मुंबई विभागीय केंद्र औरंगाबाद व एमजीएम जनसंवाद व वृत्तपत्रविद्या महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विशेष व्याख्यानात ते बोलत होते. या प्रसंगी प्राचार्य प्रतापराव बोराडे,विभागीय केंद्राचे सचिव नीलेश राऊत,प्राचार्या डॉ.रेखा शेळके,सुहास तेंडुलकर, शिव कदम,डॉ.संदीप शिसोदे प्रमुख उपस्थित होते.
याप्रसंगी बोलतांना श्री.लोमटे यांनी महाराष्ट्रात आजवर पडलेल्या दुष्काळाचा आढावा घेतला व त्या त्या वेळी त्यावेळच्या सुधारकांनी व राज्यकर्त्यांनी दुष्काळाबाबत काय दूरगामी विचार केला होता याची मांडणी केली. यात प्रामुख्याने महात्मा फुले,महाराजा सयाजीराव गायकवाड, राजर्षी शाहू महाराज यांच्या कारकिर्दीचा समावेश होता. 'मराठवाड्याच्या दुष्काळाचा निवारणाचा सातत्याने विचार झाला निर्मूलनाचा आता व्हायला हवा', असे मत त्यांनी मांडले.
कार्यक्रमास मोठ्या संख्येने नागरिक, विद्यार्थी, अभ्यासक उपस्थित होते. यावेळी मॅट्रिक एकांकिका सवाई नाट्य स्पर्धेत प्रथम आल्याबद्दल नाटकाचे लेखक दिग्दर्शक प्रवीण पटेकर यांचा सत्कार आसाराम लोमटे यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सुबोध जाधव,विशाखा गारखेडकर,उमेश राऊत,अक्षय गोरे आदींनी परिश्रम घेतले.