Thursday 30 May 2019

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे चित्रपटप्रेमींसाठी शुक्रवारी वॅगॅबॉण्ड


चित्रपट चावडी

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिक व विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक, विश्वास ज्ञानप्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक, सारस्वत बँक व रेडिओ विश्वास ९०.८ कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने चित्रपट चावडीउपक्रमांतर्गत शुक्रवार ३१ मे २०१९ रोजी सायंकाळी ६.३० वाजता सुप्रसिद्ध फ्रान्स दिग्दर्शक अ‍ॅग्नेस वरदा यांचा वॅगॅबॉण्डहा चित्रपट दाखविण्यात येणार आहे.
सदर चित्रपट डिझास्टर मॅनेजमेंट अ‍ॅण्ड ट्रेनिंग हब, ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास को-ऑप. बँकेसमोर, सावरकरनगर, गंगापूर रोड, नाशिक येथे दाखविण्यात येणार आहे.
दक्षिण फ्रान्समध्ये ग्रामीण भागात एक तरूण मुलीचे प्रेत बर्फात गोठलेल्या अवस्थेत सापडते. तिच्या ओळखीबद्दल पोलीस अनभिज्ञ असतात. मग प्रवास सुरू होतो. तिच्या अनिर्बंध वागण्याचा, फिरण्याचा, तिच्या बेफीकीरीचा. दारिद्रय, गोठवून टाकणारी थंडी, भूक, असुरक्षितता यांच्याशी सामना करणारी कोण होती ही तरूणी? गुढ तसेच चक्रावुन टाकणारे अवहेलना व गैरवर्तनांना बळी पडणारे तिचे व्यक्तिमत्त्व चित्रपट संपल्यावरही तुमचा पाठलाग करत राहते. सन १९८५ मध्ये प्रदर्शित झालेल्या या फ्रेंच चित्रपटाचा कालावधी १०५ मिनिटांचा आहे.                          
हा चित्रपट बघण्यास जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन अध्यक्ष विनायक पाटील, कार्याध्यक्ष विश्वास ठाकूर, सचिव डॉ.कैलास कमोद, कोषाध्यक्ष डॉ.सुधीर संकलेचा, सदस्य सौ.कविता कर्डक, राजवर्धन कदमबांडे, रऊफ पटेल, अ‍ॅड.नितीन ठाकरे व विक्रम मोरे यांनी केले आहे.




Monday 27 May 2019

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान तर्फे बालनाट्य शिबिराचा समारोप





नाट्यशिबीरातून स्वत:ला शोधण्याची व सुसंवादाची प्रक्रिया सुरू होते
                                                                                    - डॉ. मनोज शिंपी
आजच्या इंटरनेटच्या जगात मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी शिबिरे ही मोलाची भूमिका बजावत असतात. त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करत असतात. संवाद हरवलेल्या या काळात नाट्य शिबीरातून सुसंवादाची स्वत:ला शोधण्याची प्रक्रीया नव्याने सुरू होते. तेच अशा शिबीरांचे यश आहे. असे प्रतिपादन विश्वास ज्ञान प्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष डॉ. मनोज शिंपी यांनी केले.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, विभागीय केंद्र नाशिक, विश्वास को-ऑप. बँक लि. नाशिक, सारस्वत बँक लि., विश्वास ज्ञान प्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, रेडिओ विश्वास ९०.८ कम्युनिटी रेडिओ व विश्वास गार्डन, ग्रंथ तुमच्या दारी यांच्या संयुक्त विद्यमाने सुप्रसिद्ध नाट्यकलावंत लक्ष्मी पिंपळे यांच्या मार्गदर्शनाखाली बालनाट्य शिबिराचेआयोजन क्लब हाऊस, सावरकरनगर येथे करण्यात आले होते. त्याच्या समारोपाप्रसंगी ते बोलत होते. शिबीराची संकल्पना विश्वास जयदेव ठाकूर यांची होती. 
डॉ. शिंपी पुढे म्हणाले की, मुलांच्या जडणघडणीत पालकांची भूमिका तितकीच महत्त्वाची आहे. मुलांची मानसिकता निरोगी राहावी याकरीता त्यांना आवडत्या क्षेत्रात करियर करण्याची संधी द्यावी. त्यातून त्यांना जीवनाचा खर्‍या अर्थाने आनंद मिळेल.
शिबीर मार्गदर्शक लक्ष्मी पिंपळे म्हणाल्या की, मुलांमधील उपजत गुणांना नाट्यशिबीराच्या माध्यमातून व्यासपीठ मिळत असते व सादरीकरण करण्याचा आत्मविश्वास निर्माण होतो.
यावेळी शिबीरार्थींनी विविध नाटीका व कविता सादर केल्या. त्यात माकड व टोपीवाला, लाकुडतोड्या व कुर्‍हाड, तसेच पाऊस, परीची शाळा, फुलपाखरू, सूर्य, चित्ता, पुस्तक हाती घेऊया आदी कवितांचा समावेश होता. त्यानंतर शिबीरार्थींना डॉ. मनोज शिंपी यांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.



'सहकारी गृहनिर्माण संस्था व्यवस्थापन सर्टिफिकेट कोर्स' आता शनिवार व रविवार...


शिका आणि कमवा...
'
सहकारी गृहनिर्माण संस्था व्यवस्थापन सर्टिफिकेट कोर्स' आता शनिवार व रविवार...
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान आणि महाराष्ट्र महिला व्यासपीठातर्फे 'सहकारी गृहनिर्माण संस्था व्यवस्थापन सर्टिफिकेट कोर्स' दिनांक १ जून ते २८ जुलै २०१९ या कालावधी मध्ये (शनिवार-रविवार) दुपारी ११ ते ५ या वेळेमध्ये यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मधील बेसमेंट हॉल मध्ये प्रशिक्षण दिले जाणार आहे. हे प्रशिक्षण मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषेमध्ये असणार असून प्रशिक्षण शुल्क १०,०००/- भरून सहभागी होता येईल. कोर्स पूर्ण झाल्यानंतर परिक्षा घेण्यात येईल तसेच प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण करणा-यास प्रमाणपत्र दिले जाणार आहे. या संदर्भात अधिक माहितीसाठी व नाव नोंदणीसाठी कृपया संजना पवार यांच्याशी ( दूरध्वनी २२०४५४६०, २२०२८५९८, विस्तारित क्र. २४४ अथवा भ्रमणध्वनी ८२९१४१६२१६) वर संपर्क साधावा.






Academy of Information Technology a wing of Yashwantrao Chavan Pratishthan (AIT YCP) is an Authorized Training Centre of C-DAC (Centre for Development of Advanced Computing). C-DAC is a Scientific Society of the Ministry of Communications and Information Technology, Government of India.

Ever since C-DAC achieved world prominence and global recognition as developers of the Supercomputer PARAM, it has continuously upgraded its performance creating a focus on advanced information technologies, high-end academics and training. C-DAC's Advanced Computing Training School (ACTS) is dedicated to creating high quality manpower for C-DAC in particular and the IT industry in general through the designing and delivery of various courses. The courses are offered through a network of Authorized Training Centres (ATC's) in India. Academy of Information Technology is one of the most Prestigious Centers of C-DAC.

AIT YCP has modern infrastructure including corporate standard laboratories open for 24 hrs equipped with latest state of art technologies. We are proud to remain associated with the best faculty in the industry Academy of Information Technology has fulfilled its goal of providing Quality Computer Education transforming thousands of aspiring students into tomorrow’ s IT professionals.

Post Graduate Programs offered by C-DAC with the view to making a career in Information Technology with subject reference to Software Engineering

Post Graduate Diploma In Advanced Computing (PG-DAC) a 6 Months full time course. Course is most popular for the Training and Excellent Placement.

All Industry based technologies are teaches in this course.

Eligibility

·         Graduate in Engineering or equivalent (e.g. BE / BTech / 4-year BSc / AMIE / DoEACC B Level, etc.) in Electronics/ Computer Science/ IT or related areas. OR
·         Post Graduate in Engineering Sciences (e.g. MSc in Computer Science, IT, Electronics, etc.). OR
·         Graduate in any discipline of Engineering or equivalent, OR
·         MCA/MCM.OR
·         Post Graduate in Physics/ Computational Sciences/ Mathematics or allied areas. OR
·         Post Graduate in Management with graduation degree in Science/ IT/ Computers.
·         The candidates must have secured a minimum of 50% marks in their qualifying examination

Selection Process

Student must be qualifying for C-DAC Common Admission Test (CCAT)

C-CAT Syllabus
English Quantitative Aptitude, Reasoning,
C Programming, Data Structures, Data Communication & Networking, Object Oriented Programming Concepts, Operating Systems

Academy of Information Technology (AIT YCP) conducting FREE C-CAT training.

For details contact: 09769256343 / 022 -22817975 / 2204 3619 / 9769256343.









Sunday 26 May 2019

नर्मदा परिक्रमा आत्मशोधाबरोबरच नव्या जगण्याचा शोध घेणारा प्रवास- विशाल मित्रा



नर्मदा परिक्रमा म्हणजे आत्मशोधाचा प्रवास असून जीवन जाणीवांना बळकटी देणारा नव्या जगण्याचा शोध घेणारा आहे. एकाच जीवनातून नव्या जीवनाची प्रत्यय देणारी ही यात्रा आतल्या अनेक शक्यतांना विस्तारणारी आहे. राग, लोभ, अहंकार, भौतिक सुख, याच्या पलीकडे खरा माणूस शोधण्याची ही खडतर प्रयोग शाळा आहे. असे प्रतिपादन विशाल मित्रा यांनी केले.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिक, मेक वल्ड बेटर, विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक, कुसुमाग्रज प्रतिष्ठान, ग्रंथ तुमच्या दारी, विश्वास ज्ञानप्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक, सारस्वत बँक व रेडिओ विश्वास ९०.८, कम्युनिटी रेडिओ व विश्वास गार्डन यांच्या संयुक्त विद्यमाने नर्मदा परिक्रमा पूर्ण करणारे विशाल मित्रा यांची मुलाखत क्लब हाऊस, ठाकूर रेसिडेन्सी, सावरकरनगर येथे आयोजित करण्यात आली होती. त्याप्रसंगी ते बोलत होते. मित्रा यांची मुलाखत डॉ. सुनिता वावरे यांनी घेतली. 
श्री. मित्रा म्हणाले की, प्रतिकुल परिस्थितीत जीवन जगण्याची कला नर्मदा परिक्रमेचा प्रवास आपल्याला शिकवते. नव्या संस्कृतीचा हा प्रवास आहे. आयुष्य बदलवून टाकणारा हा अनुभव आहे. सुखाचा शोध, आसक्ती, मोह, माया, क्रोध यांवर विजय मिळवण्याचा यातून मार्ग सापडतो. असेही श्री. मित्रा म्हणाले. तीन हजार नऊशे साठ किलो मीटर, एकशे साठ दिवसांच्या नव्या जगाची ही सफर अचंबित करणारी होती. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक मेक वर्ल्ड बेटरच्या मंजू बेळे-राठी यांनी केले. यावेळी मंजु बेळे-राठी यांनीही नर्मदा परिक्रमेचे अनुभव कथन केले. मित्रा यांचे स्वागत अशोका ग्रुपचे अध्यक्ष अशोक कटारीया यांनी केले.




विडी वळणाऱ्या महिलासाठी पुरक उद्योग गरजेचा – धर्मण्णा सादुल .



धूम्रपान कायदा कडक झाल्यामुळे विडी वळणाऱ्या महिलाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न भविष्यात बिकट होणार आहे त्यामुळे लवकरच त्यांच्यासाठी पुरक उद्योग सुरु करणे गरजेचे असून त्यासाठी सामुदायिक प्रयत्नाची गरज आहे असे प्रतिपादन माजी खासदार धर्मण्णा सादुल यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त यशवतराव चव्हाण प्रतिष्ठान मुबई विभागीय केंद्र सोलापूर आयोजित विडी वळणाऱ्या महिलाच्या मेळाव्यात ते बोलत होते प्रथम यशवतराव चव्हाण याच्या प्रतिमेचे पूजन श्री धर्मण्णा सादूल, श्री जनार्धन कारमपुरी डॉ. गोवर्धन सुचु, श्री अप्पाशा म्हेत्रे याच्या हस्ते करण्यात आले प्रतिष्ठानचे सचिव दिनेश शिदे यानी मेळाव्या आयोजना मागील भूमिका विषद केली कामगार नेते डॉ गोवर्धन सुंचू यांनी विडी उद्योग आणि यावर अवलबुन असणाऱ्या महिला कामगाराच्या अडचणी मांडल्या.
मेळाव्यात मार्गदर्शन करताना माजी महापौर जनार्धन कारमपुरी यांनी वस्त्र उद्योग हा पुरक व्यवसाय असून त्याचे प्रशिक्षण प्रथम या महिलांना देणे गरजेचे आहे त्यासाठी मी आणि धर्मण्णा सादुल साहेब सयुक्त प्रयत्न करू यासाठी सुप्रियाताई सुळे यांची मदत घेतली जाणार असल्याचे सागितले. याप्रसंगी यशवतराव चव्हाण प्रतिष्ठान वतीने मान्यवराचे हस्ते महिला कामगाराना साडी भेट देण्यात आली सुमारे ३०० महिला या मेळाव्यास उपस्थित होते.
सतीश दासरी,सत्यनारायण बल्ला ,नागनाथ भंडारी ,अबिका गदास ,विजया आडप, राधा याल्दंडी ,व्यंकटेश कुरापती ,महेश्वरी सामलेटी ,लक्ष्मीं मंडल अबंना सायपूर यांनी मेळावा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.





विज्ञानाच्या वाटचालीला नवे वळण दिले...


यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई व मराठी विज्ञान परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने 'विज्ञानगंगा' कार्यक्रमांतर्गत अडतीसावे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. डॉ. राजीव चिटणीस यांनी 'आइन्स्टाइनचा सापेक्षातावाद' या विषयावर बोलताना आइन्स्टाइनचा संशोधनाचा कालखंडारूप प्रवास त्यांनी उलघडून दाखवला. तसेच गतीचा वस्तुमानावरचा परिणाम, वस्तुमान-ऊर्जेची समतुलता व गुरुत्वाकर्षण व त्वरण यामधील फरक ह्याविषयी उदाहरणासहित विज्ञानप्रेमीना समजून सांगितले. विज्ञानप्रेमीच्या प्रश्नोत्तर सत्रात त्यांनी मार्गदर्शन केले. 








मानवी नातेसंबंध, अपुरेपण यांचा अविष्कार ‘चार सख्य चोवीस’ मधून सादर




मानवी नातेसंबंध, जगण्याची उत्कटता, जगण्यातले वैविध्यपण, माणूस म्हणून जगण्याची नेमकी गरज, काळाला पूरून उरणा-या नात्यांची उपयुक्तता, काळाचा वेग आणि कौटुंबिक अस्वस्थता यांचा अनोखा वेध चार सख्य चोवीसकथांच्या अभिवाचनातून रसिक घेत होते. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई विभागीय केंद्र नाशिक व विश्वास को-ऑप. बँक लि., नाशिक, विश्वास ज्ञान प्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक, सारस्वत बँक व रेडिओ विश्वास ९०.८ कम्युनिटी रेडिओ, विश्वास गार्डन, कुसुमाग्रज प्रतिष्ठान, ग्रंथ तुमच्या दारी यांच्या संयुक्त विद्यामाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  
संपदा जोगळेकर- कुलकर्णी यांच्या
ध्यानस्थकथेने अभिवाचनाची सुरुवात झाली. त्यानंतर सोनाली लोहार यांनी कालाय तस्मै नम:या कथेतून जगण्यातील गुंतवळ, अपुरेपण, आतली धुसपूस प्रभावीपणे मांडली. कथेतून आजूबाजूच चित्र जसेच्या तसे उभे राहत होते. संवादातील तरलता, भाषेचा स्वाभाविक वापर कथांची परिणामकारकता वाढवत होता.
सुप्रसिद्ध अभिनेत्री संपदा जोगळेकर-कुलकर्णी, हर्षदा बोरकर, निर्मोही फडके, सोनाली लोहार या चौघी जणींनी हा कथा अविष्कार सादर केला. विश्वास ग्रुपचे कुटुंबप्रमुख विश्वास ठाकूर हे या कार्यक्रमाचे आयोजक व संयोजक विनायक रानडे होते.
चार समविचारी, सहसंवेदना असणा-या मैत्रिणींनी कथामधून आजचं जगण्याचं नेमकं विश्व उभे केले. स्त्री लेखिकांनी अभिव्यक्तीचा नवा अविष्कार भाषेचे वेगळेपण घेऊन समोर आला.
हेमंत टकले यांनी आपले मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले की,
स्त्रियांनी केलेले लेखन हे नवी उर्मी आणि गरज घेऊन निर्माण होत आहे. त्यातून समाजाचं नेमकं प्रतिबिंब पडत आहे.
कार्यक्रमाचे प्रास्तविक डॉ. हरी विनायक कुलकर्णी यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन राजश्री शिंपी यांनी केले. संपदा जोगळेकर-कुलकर्णी यांचा सन्मान आ. हेमंत टकले यांनी, हर्षदा बोरकर यांचा सन्मान सारिका देशपांडे, निर्मोही फडके यांचा सन्मान विनायक रानडे, सोनाली लोहार यांचा सन्मान डॉ. मनोज शिंपी यांनी केला. आभार प्रदर्शन विनायक रानडे यांनी केले.






Thursday 16 May 2019

क्रिस्तोफर नोलन यांच्या ‘डंकिर्क’ चित्रपटाचे प्रदर्शन...




यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, विभागीय केंद्र औरंगाबाद व एमजीएम पत्रकारीता महाविद्यालय संचालीत एमजीएम फिल्म आर्ट्स विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित चित्रपट चावडी उपक्रमाअंतर्गत शनिवार, दि. १८ मे २०१९ रोजी सायं. ६ वा. क्रिस्तोफर नोलन यांचा डंकिर्कहा चित्रपट चित्रपती व्ही. शांताराम प्रेक्षागृह, एमजीएम फिल्म आर्ट विभाग, एमजीएम पत्रकारीता महाविद्यालय, औरंगाबाद येथे दाखविण्यात येणार आहे.
ब्रिटिश-अमेरिकन-फे्रंच-डच यांची सहनिर्मिती असलेला डंकिर्कहा चित्रपट असून यामध्ये जॅक लोडेन, हॅरी स्टिल्स, एन्युरीन बर्नार्ड, जेम्स डी आर्सी, बॅरी किओहान, केनेथ ब्रानाघ, सिल्लियन मर्फी, मार्क रिलान्स आणि टॉम हार्डी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटासाठी क्रिस्तोफर नोलन यांना दिग्दर्शन करण्यासाठी प्रथम ऑस्कर नामांकन मिळाले आहे. दुसर्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर आयमॅक्स फॉरमॅटमध्ये चित्रीत झालेला डंकिर्कहा चित्रपट बघण्यासाठी त्याच दर्जाचे थिएटर असणे गरजेचे असते. एमजीएमच्या फिल्म आर्टच्या चित्रपती व्ही शांताराम थिएटरमध्ये या सर्व सुविधा आहेत. त्यामुळे दुसर्या महायुद्धात डंकर्क या ठिकाणी घडलेला थरार प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.
चित्रपट सर्वांसाठी खुला असून चित्रपट रसिकांनी या चित्रपटाचा लाभ घ्यावा, असे आवाहन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई विभागीय केंद्र औरंगाबादचे अध्यक्ष अंकुशराव कदम, कोषाध्यक्ष सचिन मुळे, सचिव नीलेश राऊत,  कार्यकारिणी सदस्य डॉ. भालचंद्र कांगो, विजय कान्हेकर आदींनी केले आहे.




Wednesday 15 May 2019

स्वाक्षरी विश्लेषण कार्यशाळा संपन्न...

संपूर्ण विडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, महाराष्ट्र महिला व्यासपीठ तर्फे स्वाक्षरी विश्लेषण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. स्वाक्षरीमुळे आपल्या आयुष्यात खूप फरक पडत असतो. स्वाक्षरी करण्याच्या पद्धतीवर आपल यश-अपयश अवलंबून असत. स्वाक्षरीवरून माणसाची विचार करण्याची पद्धत, माणसाचा स्वभाव ओळखता येतो, असे प्रशिक्षक प्रकाश मोहिते म्हणाले.
या कार्यशाळेत स्वाक्षरी कशी असावी, प्रगतीतील अडथळे दूर करण्याचे उपाय, आर्थिक प्रगतीचे व यशाचे उपाय, राग नियंत्रित कसा करणे, आत्मविश्वास वाढविणे, स्मरणशक्ती व एकाग्रता वाढविणे, ताण तणाव कमी करण्याचे उपाय अशा विविध विषयांवर प्रकाश मोहिते यांनी मार्गदर्शन केले.
कार्यशाळेला उत्तम प्रतिसाद मिळाला. कार्यशाळा पूर्ण करणा-यांना प्रमाणपत्र देण्यात आले.



















Sunday 12 May 2019

विज्ञानगंगा कार्यक्रमांतर्गत अडतीसावे पुष्प ‘आइन्स्टाइनचा सापेक्षतावाद’...



यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई व मराठी विज्ञान परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने विज्ञानगंगा कार्यक्रमांतर्गत अडतीसावे व्याख्यान ‘आइन्स्टाइनचा सापेक्षतावाद या विषयावर डॉ. राजीव चिटणीस शुक्रवार दि. १७ मे रोजी सायंकाळी ५ वाजता चव्हाण सेंटर, सांस्कृतिक सभागृह, चौथा मजला, जनरल जगन्नाथराव भोसले मार्ग, मंत्रालया समोर, नरिमन पॉईंट मुंबई येथे गुंफणार आहे. तरी वरील कार्यक्रमास आपण उपस्थित रहावे ही विनंती.




युवा छायाचित्रकारांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन...



यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - विभागीय केंद्र औरंगाबाद व कलर्स ऑफ औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने औरंगाबाद शहरातील ६० युवा छायाचित्रकारांच्या समावेश असलेल्या छायाचित्र प्रदर्शनाचे उदघाटन रविवार १२ मे रोजी सकाळी मनपा आयुक्त डॉ.निपुण विनायक यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी शहराचे महापौर नंदकुमार घोडेले उपस्थित होते.
पुढील तीन रविवार शहरातील विविध ठिकाणी हे प्रदर्शन संपन्न होणार आहे. याप्रसंगी विभागीय केंद्राचे सचिव नीलेश राऊत, विजय कान्हेकर, अॅड. स्वप्नील जोशी, प्रदर्शनाचे संयोजक ज्ञानेश्वर पाटील, आदित्य दिवाण, किशोर निकम, सुबोध जाधव, निखिल भालेराव आदी उपस्थित होते.