Monday 29 April 2019

कामगार दिनानिमित्त कवितेचा जागर...



महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्ताने कवितेचा जागर होणार असून त्यात नाशिक व परिसरातील नवोदित व ज्येष्ठ कवी कवितेचा जागर करणार आहेत. बुधवार दि. १ मे रोजी सकाळी १० वाजता अ‍ॅडमिनिस्ट्रेटीव्ह डिझास्टर मॅनेजमेंट अ‍ॅण्ड ट्रेनिंग हब, ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास को-ऑप. बँकेसमोर, सावरकरनगर, गंगापूर रोड येथे हे खुले कवी संमेलन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई विभागीय केंद्र नाशिक व विश्वास को-ऑप बँक लि.नाशिक, विश्वास ज्ञान प्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिटयुट, नाशिक, ग्रंथ तुमच्या दारी सारस्वत बँक व रेडिओ विश्वास ९०.८ कम्युनिटी रेडिओ, विश्वास गार्डन यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न होणार आहे.
कवी संमेलनात नारायण सुर्वे कवी कट्टा, नाशिक कवी, काव्य मंच नाशिक, माझी कविता परिवार, संवाद नाशिक आणि नाशिकमधील सर्व कवी सहभागी होणार आहेत. कवी संमेलनाचे सुत्रसंचलन कवी रविंद्र मालुंजकर हे करणार आहेत.
तरी या कवी संमेलनात मोठ्या संख्येने उपस्थित रहाण्याचे आवाहन अध्यक्ष विनायक पाटील, कार्याध्यक्ष विश्वास ठाकूर, सचिव डॉ.कैलास कमोद यांनी केले आहे.



ग्लोबल वॉर्मिंगची समस्या व पाणथळ जमिनीचे संरक्षण करण्यासाठी लोकसहभाग महत्त्वाचा - सतीश गोगटे



ग्लोबल वॉर्मिंगची समस्या आज जगासमोर उभी ठाकली असून त्यासाठी सावध होणे गरजेचे आहे. त्यासाठी पाणथळ जमिनीचे संरक्षण करणे गरजेचे आहे. आज जगातल्या महत्त्वाच्या जमीन पाणथळी वाचवण्यासाठी जनजागृती आवश्यक आहे. बायोडायव्हरसिटी जैव विविधतेकडे लक्ष वेधणे प्रत्येकाची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन जागतिक वसुंधरा दिनानिमित्ताने आयोजित व्याख्यानात सुप्रसिद्ध पक्षीतज्ञ व छायाचित्रकार सतीश गोगटे यांनी केले. नांदुरमध्यमेश्‍वर एक परिक्षण या विषयावर स्लाईड शो व व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते त्याप्रसंगी ते बोलत होते.
गोगटे यांनी या प्रसंगी ग्लोबल वॉर्मिंग, रामसर कन्व्हेंशन, नांदूरमध्यमेश्वर परीसर, नांदुरमध्यमेश्वर अभयारण्य, पक्षी वैविध्य आदी विषयांवर मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ, शासकीय यंत्रणा, शासन, सामाजिक संस्था यांच्या सहभागातून संरक्षण व संवर्धन होऊ शकते. त्यासाठी लोकसहभागही तितकाच महत्त्वाचा आहे. त्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य घेण्याची गरज आहे. आजकाल पाणी, जलसंवर्धन, पावसाच्या पाण्याचे नियोजन करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. पक्षी संरक्षणासाठी नुसतेच पर्यटन करून उपयोग नसून त्यासाठी अभ्यास करणेही महत्त्वाचे आहे.
सदर कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक करतांना प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष विश्वास ठाकूर म्हणाले की, पक्षी मित्रमंडळासाठी विविध प्रकारचे उपक्रम राबविण्यासाठी प्रतिष्ठान सहकार्य करेल. निसर्गाचे संवर्धन व पक्षांचे संरक्षण करण्यासाठी जनतेने पुढाकार घ्यावा.

           





Thursday 25 April 2019

नांदुरमध्यमेश्वर पक्षी निरीक्षणावर सतीष गोगटे यांचे व्याख्यान…



पक्ष्यांच्या विश्वाची अनोखी व वैविध्यपूर्ण सफर अनुभवण्याची संधी नाशिककरांना मिळणार आहे जागतिक वसुंधरा दिनानिमित्ताने सुप्रसिद्ध पक्षीतज्ञ व छायाचित्रकार सतीश गोगटे यांच्या नांदुरमध्यमेश्वर एक परिक्षण या विषयावर स्लाईड शो व व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.
शनिवार, दि. २७ एप्रिल २०१९ रोजी ६.३० वाजता अ‍ॅडमिनिस्ट्रेटीव्ह डिझास्टर मॅनेजमेंट अ‍ॅण्ड ट्रेनिंग हब, ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास को-ऑप. बँकेसमोर, सावरकरनगर, गंगापूर रोड, नाशिक ४२२०१३ येथे हे व्याख्यान संपन्न होणार आहे.
सतीश गोगटे हे पक्षीतज्ञ असून, भारतातील अनेक ठिकाणी जाऊन पक्ष्यांचा अभ्यास केला आहे व त्यात मानससरोवर, नालसरोवर, भरतपूर, पंगोट, नैनीताल, भिगवण, जायकवाडी, नांदुरमध्यमेश्वर, बोरीवली नॅशनल पार्क, फन्साड जंगल येथे त्यांनी छायाचित्रण केले आहे. पक्षी निरीक्षणावर त्यांची पुस्तकेही अभ्यासकांना उपयुक्त ठरली आहेत. निसर्ग संरक्षणासाठी सातत्याने ते विविध उपक्रम राबवत असतात. नॅचरल हिस्ट्री सोसायटी मुंबईच्या अनेक कार्यक्रमात त्यांचे योगदान असते.
           



Wednesday 24 April 2019

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे चित्रपटप्रेमींसाठी ‘क्लिओ फ्रॉम फाईव्ह टू सेव्हन’


चित्रपट चावडी

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिक व विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक, विश्वास ज्ञानप्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक, सारस्वत बँक व रेडिओ विश्वास ९०.८ कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने चित्रपट चावडीउपक्रमांतर्गत शुक्रवार २६ एप्रिल २०१९ रोजी सायंकाळी ६.३० वाजता सुप्रसिद्ध बेल्जियम दिग्दर्शक अ‍ॅग्नेस वरदा यांचा क्लिओ फ्रॉम फाईव्ह टू सेव्हनहा चित्रपट दाखविण्यात येणार आहे. सदर चित्रपट डिझास्टर मॅनेजमेंट अ‍ॅण्ड ट्रेनिंग हब, ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास को-ऑप. बँकेसमोर, सावरकरनगर, गंगापूर रोड, नाशिक येथे दाखविण्यात येणार आहे.
हा चित्रपट बघण्यास जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.




महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० संबंधी विनामूल्य व्याख्यान...




यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, आणि महाराष्ट्र महिला व्यासपीठ तर्फे सन २०१९ चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक ९, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० यात आणखी सुधारणा करण्याकरिता अध्यादेश आणि सहकारी गृहनिर्माण संस्थांवर काम करण्याचा त्याचा प्रभाव या विषयावरती विनामूल्य व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. मंगळवार दिनांक ७ मे २०१९ रोजी बेसमेंट हॉल, चव्हाण सेंटर, जनरल जगन्नाथ भोसले मार्ग, सचिवालय जिमखान्याच्या पुढे, नरिमन पॉईंट येथे दुपारी ३ ते ५ या वेळेत अॅड. प्रमोद कुमार उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत.
अधिक माहितीसाठी संपर्क :   संजना पवार.
                                        ८२९१४१६२१६
                                        २२०४५४६०
/ २२०२८५९८ विस्तारित (२४४)



Tuesday 23 April 2019

विज्ञानगंगाचे सदतीसावे पुष्प ‘ग्लास टेक्नोलॉजी’...

संपूर्ण विडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई व मराठी विज्ञान परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने विज्ञानगंगाकार्यक्रमांतर्गत सदतीसावे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. शास्त्रज्ञ डॉ. गोविंद प्रसाद कोठीयाल यांनी ग्लास टेक्नोलॉजीया विषयावर व्याख्यान दिले. त्यांनी काचेच युग अत्यंत सोप्या भाषेत समजावून सांगितले. काचेच्या जन्मापासून ते आत्ताच्या आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती शास्त्रज्ञ डॉ. गोविंद प्रसाद कोठीयाल यांनी आपल्या व्याख्यानातून दिली. त्यांनी माहितीचे प्रेझेंटेशन सादर केले. शेवटी उपस्थितांना प्रश्नोत्तर सत्रात त्यांनी मार्गदर्शन केले.










Sunday 21 April 2019

उत्तम आरोग्य व सकारात्मक जीवनशैलीसाठी निसर्गाशी मैत्री करा - नितूबेन पटेल


उत्तम आरोग्य व सकारात्मक जीवनशैलीसाठी निसर्गाशी मैत्री करा
                                                                             - नितूबेन पटेल
निसर्गाशी मैत्री म्हणजे उत्तम आरोग्य व सकारात्मक जगण्यासाठी भरपूर उर्जा असलेला मार्ग आहे. त्याचा अंगीकार केल्यास जीवन आनंदी व सुदृढ होऊ शकते, त्यासाठी निसर्गाच्या सोबतीने रोजच्या दिवसाचे नियोजन करा. आहारात भाजीपाला व फळे तसेच नैसर्गिक वनस्पतींचा वापर करावा, असे प्रतिपादन सेंद्रीय शेती, आयुर्वेद तज्ज्ञ व उद्योजक नितूबेन पटेल यांनी केले.
समाजात आरोग्य
, कृषी क्षेत्राच्या आधुनिकतेविषयी जनजागृती व्हावी या उद्देशाने मेक वर्ल्ड बेटर या सामाजिक संस्थेतर्फे मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते, त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. सदर व्याख्यानात त्यांनी स्वयंपाक घरातूनच आहाराचे नियोजन, घरगुती आयुर्वेदिक औषधांपासून आजारांची मुक्ती तसेच मायग्रेन, थॉयरॉईड, सर्व्हायकल स्पाँडीलाइटीस, त्वचेचे विकार, निद्रानाश  तसेच तणावावर नियंत्रण, तसेच कान, नाक, डोळे अशा अनेक आजारांपासून सुटका आदी विषयावर मार्गदर्शन केले.
यावेळी त्यांनी जीवन व्यवहारात महत्वाची भूमिका बजावणार्‍या वनस्पती औषधांची माहिती दिली. केसांवरील आजारांसाठी
भृंगराज,नाकाच्या विकारांसाठी देशी गायीचे तुप,सर्व्हायकल स्पॉन्डिलायटिस साठी एरंडेल तेल,मातीच्या लेपाची उपचार 
पद्धती तसेच किडनीवरील आजारांसाठी राजमा,बी.12
साठी शेवगा उपयुक्त असल्याचे त्यांनी नमुद केले. अ‍ॅसीडीटी व अल्कलाईनचा जीवनशैलीवर परिणाम अग्नीहोत्राचा उपयोग आदी विषयांवर सोप्या भाषेत विचार मांडले व उपस्थितांच्या प्रश्नांना उत्तरे दिली.







अभिनेते प्रदीप वेलणकर यांनी घडविली हिंदी गीतांची अविस्मरणीय सफर...


अभिनेते प्रदीप वेलणकर यांनी घडविली हिंदी गीतांची अविस्मरणीय सफर...
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, विभागीय केंद्र नाशिक व विश्वास को-ऑप बँक लि., नाशिक, यांच्या संयुक्त विद्यमाने जुन्या हिंदी गीतांवर आधारीत तकरार भी...इकरार भी...या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सुप्रसिद्ध अभिनेते प्रदीप वेलणकर यांनी हा कार्यक्रम सादर केला. प्रदीप वेलणकरांचा चित्रपट क्षेत्राचा व्यासंग आणि अभिरुची याचे हे अप्रतिम सादरीकरण होते. गीतांमधील अवीट गोडी, काळाच्याही पलीकडे जाणवणारे शब्दांचे वेगळेपण आजच्या प्रश्‍नांशी निगडीत आहे, याचीच प्रचिती तकरार भी... इकरार भी...या कार्यक्रमांतून रसिकांनी घेतली. हिंदी चित्रपट संगीतातील अनोख्या विश्वाची संगीतमय सफर अभिनेते प्रदीप वेलणकर यांनी घडवली.






Saturday 20 April 2019

आनंद अत्रे यांच्या स्वरांनी रसिक मंत्रमुग्ध...


आनंद अत्रे यांच्या स्वरांनी रसिक मंत्रमुग्ध...
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान आणि विश्वास गृपतर्फे सूर विश्वास या अनोख्या मैफिलाचे आयोजन करण्यात आले होते. सूर विश्वास उपक्रमाचे  तृतीय पुष्प आनंद अत्रे यांनी गुंफले. आनंद अत्रे यांनी आपल्या दमदार सादरीकरणाने मैफिलीत उत्साह निर्माण केला. त्यांनी शास्त्रीय संगीताबरोबरच उर्दू- हिंदी भाषेतील गझल सादर केली. हर्षद वडजे (हार्मोनियम) , रोहित नागरे (तबला) यांनी त्यांना साथ दिली. सूर तालाच्या साथीने रसिकांची सकाळ रम्य झाली.




‘मेक वर्ल्ड बेटर’ सामाजिक संस्थेतर्फे आरोग्याविषयक मार्गदर्शन व्याख्यान...


यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिक, मेक वर्ल्ड बेटर व विश्वास ग्रुपतर्फे
निरोगी आहार व आरोग्याविषयी, समाजात आरोग्य, कृषी क्षेत्राच्या आधुनिकतेविषयी जनजागृती व्हावी या उद्देशाने मेक वर्ल्ड बेटरया सामाजिक संस्थेतर्फे मार्गदर्शनपर जाहीर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. शरीराचे नेमके कार्य काय?, उत्कृष्ठ आहार म्हणजे काय? आदि विषयांवर नितूबेन पटेल (सेंद्रीय शेती, आयुर्वेद तज्ज्ञ व उद्योजक), डॉ. शबरीबेन (नॅचरोपॅथी तज्ज्ञ), जेंतीभाई (सेंद्रीय शेती तज्ज्ञ) हे मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत. अ‍ॅडमिनिस्ट्रेटीव्ह डिझास्टर मॅनेजमेंट अ‍ॅण्ड ट्रेनिंग हब, ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास को-ऑप. बँकेसमोर, सावरकरनगर, गंगापूर रोड, नाशिक येथे रविवार, २१ एप्रिल २०१९ रोजी सकाळी ९ वा. हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.



Thursday 11 April 2019

‘वाचे बरवे कवित्व’ – रमणीय काव्यमैफलीचे आयोजन...

संपूर्ण काव्यमैफल पाहण्यासाठी क्लिक करा.

वाचे बरवे कवित्व रमणीय काव्यमैफलीचे आयोजन...

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, महाराष्ट्र महिला व्यासपीठ आणि रंगस्वर तर्फे वाचे बरवे कवित्व या काव्यमैफलीचे आयोजन करण्यात आले होते. अनुपमा उजगरे, गौरी कुलकर्णी, लता गुठे, ज्योती कपिले, पल्लवी बनसोडे, संगिता अरबुने, उषा चांदुरकर, जयश्री संगितराव, हेमांगी नेरकर, प्रतिभा सराफ आणि महाराष्ट्र महिला व्यासपीठाच्या प्रमुख संयोजिका रेखा नार्वेकर यांनी स्वलिखित कविता अणि गझल सादर केली. कवितेवर प्रेम करणा-या प्रेक्षकांच्या उपस्थितीत ही काव्यमैफल अत्यंत सुरेख पार पडली.















वाचे बरवे कवित्व- काव्यमैफल संपूर्ण विडिओ

Tuesday 9 April 2019

जुन्या हिंदी चित्रपट गीतांवर आधारीत ‘तकरार भी... इकरार भी’


जुन्या हिंदी चित्रपट गीतांवर आधारीत
तकरार भी... इकरार भी
जुन्या हिंदी चित्रपट गीतांवर आधारीत तकरार भी... इकरार भी या अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सुप्रसिद्ध अभिनेते प्रदीप वेलणकर कार्यक्रम सादर करणार आहेत. शनिवार २० एप्रिल २०१९ रोजी सायं. ५.३० वाजता अॅडमिनीस्ट्रेटिव्ह डिझास्टर मॅनेजमेंट अँड ट्रेनिंग हब, ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास को-ऑप. बँकेसमोर, सावरकरनगर, गंगापूर रोड, नाशिक येथे या कार्यक्रमाचा आस्वाद घेता येणार आहे.



सूर विश्वास कार्यक्रमाच्या तिस-या पुष्पाचे आयोजन…


सूर विश्वास कार्यक्रमाच्या तिस-या पुष्पाचे आयोजन

नव्या पिढीतील कलाकारांच्या अविष्काराला हक्काचे व्यासपीठ देण्यासाठी सूर विश्वास या अनोख्या मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे.
शनिवार दि. २० एप्रिल २०१९ रोजी सकाळी ६.३० वाजता क्लब हाऊस, विश्वास को-ऑप. बँकेसमोर, सावरकरनगर, नाशिक येथे गायक आनंद अत्रे सादर करणार आहेत. तर हर्षद वडजे (हार्मोनियम) व  रोहित नागरे (तबला) हे त्यांना साथ देणार आहेत.



Monday 8 April 2019

विज्ञानगंगा कार्यक्रमांतर्गत सदतीसावे पुष्प ‘ग्लास टेक्नोलॉजी’...


विज्ञानगंगा कार्यक्रमांतर्गत सदतीसावे पुष्प ग्लास टेक्नोलॉजी...
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई व मराठी विज्ञान परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने विज्ञानगंगा कार्यक्रमांतर्गत सदतीसावे व्याख्यान ‘ग्लास टेक्नोलॉजी या विषयावर शास्त्रज्ञ डॉ. जी. पी. कोठीयाल मंगळवार दि. २३ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता चव्हाण सेंटर, सांस्कृतिक सभागृह, चौथा मजला, जनरल जगन्नाथराव भोसले मार्ग, मंत्रालया समोर, नरिमन पॉईंट मुंबई येथे गुंफणार आहे. तरी वरील कार्यक्रमास आपण उपस्थित रहावे ही विनंती.



Thursday 4 April 2019

विद्यार्थ्यांनी घेतला UPSC / MPSC स्पर्धापरिक्षा मार्गदर्शन शिबिराचा लाभ

संपूर्ण विडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

विद्यार्थ्यांनी घेतला UPSC / MPSC स्पर्धापरिक्षा मार्गदर्शन शिबिराचा लाभ
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई संचालित यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय ग्रंथालय यांच्या विद्यमाने UPSC / MPSC स्पर्धा परिक्षांसंदर्भात मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते. द युनिक अकॅडमी, मुंबईचे मंगेश खराटे, माधवी तटवरे, अजित खराडे आणि पोलिस उप निरिक्षक सुशांत खराटे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे  सरचिटणीस शरद काळे यांनी विद्यार्थ्यांना स्वानुभव सांगितला. स्पर्धा परिक्षांबाबत विद्यार्थ्यांच्या मनात अनेक गैरसमज निर्माण होतात. गैरसमज करून न घेता अभ्यास कसा करावा, अभ्यासाचे नियोजन कशा प्रकारे करावे अशा अनेक प्रश्नांची उत्तरे पोलिस उप निरिक्षक सुशांत खराटे यांनी प्रश्नोत्तरावेळी विद्यार्थ्यांना दिली.







  








Tuesday 2 April 2019

प्रीती नीयडूंचे विद्यार्थ्यांना मोफत करिअर मार्गदर्शन

संपूर्ण विडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
प्रीती नीयडूंचे विद्यार्थ्यांना मोफत करिअर मार्गदर्शन...
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई आणि यशवंतराव चव्हाण माहिती व तंत्रज्ञान प्रबोधिनी तर्फे दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत करिअर मार्गदर्शन सेमिनारचे आयोजन करण्यात आले होते. दिनांक २ एप्रिल २०१९ रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे निवड संस्थेच्या सल्लागार श्रीमती प्रीती नायडू यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
करिअरक्षेत्र कसे निवडावे, आपल्या आवडत्या क्षेत्रात आपण कसे करिअर करू शकतो, भविष्यात कोणत्या क्षेत्रात संधी निर्माण होतील अशा अनेक विषयांवर त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.