Sunday 11 August 2019

कल्याणी दसककर-तत्त्ववादी यांच्या स्वरांतून निथळली अभिजात रिमझिम



दि. १०: सूर विश्वासचे सातवे पुष्प गायिका कल्याणी दसककर-तत्त्ववादी यांच्या गायनाने गुंफले. ईश्वरी दसककर (हार्मोनियम), सारंग तत्त्ववादी (तबला), गंधाली आफळे (तानपुरा) यांनी साथसंगत केली. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन विनायक रानडे यांनी केले. विश्वास ग्रृपचे कुटुंबप्रमुख विश्वास ठाकूर हे या उपक्रमाचे आयोजक असून, संकल्पना विनायक रानडे यांची आहे.
बाहेर चिंब पाऊस सुरू आहे आणि विश्वास हब येथे स्वरांची अनोखी रिमझिम रसिकांना अभिजात आणि प्रयोगशील आनंद देत होती. रागदारी संगीताची मूलभूत जाण घेऊन शास्त्रीय संगीतातील प्रतिभासंपन्न अविष्काराने रसिक मोहून गेले नाहीत तर नवलच.
मैफीलीची सुरवात अहिर भैरव रागातील बडा ख्यालाने केली. मोहे कल नही आयेया शब्दांतून भेटीची आस, मनाची तगमग अलवारपणे व्यक्त झाली. त्यानंतर गौड मल्हार रागातील पापी दा दुर्वातराणा सादर केला. यातून भावभक्तीचा आवेग व्यक्त झाला. मैफलीचा समारोप तिलक कामोद रागातील ठुमरी ने केली. बैरन रतियातून विरक्ती, आर्ततेचे सुर कानात घुमत होते. शब्द आणि स्वरांची ही स्वरवेळ रसिकांनी जपून ठेवली असेल.
सदर कार्यक्रम अ‍ॅडमिनिस्ट्रेटीव्ह डिझास्टर मॅनेजमेंट अ‍ॅण्ड ट्रेनिंग हब, ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास गार्डन शेजारी, विश्वास को-ऑप. बँकेसमोर, सावरकरनगर, गंगापूर रोड, नाशिक येथे संपन्न झाला.
कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्याबद्दल सन्मानित करण्यात आले. त्यात पं. भीमसेन जोशी पुरस्काराबद्दल पं. अविराज तायडे यांना तर कवी किशोर पाठक यांना बेचकीत जन्मतो जीवया काव्य संग्रहाच्या पुरस्कारांबद्दल व चित्रकार रविंद्र दंडगव्हाळ यांना भारतीय डाक सेवेच्या राष्ट्रीय चित्र स्पर्धेत पुरस्काराबद्दल अ‍ॅड. नंदकिशोर भुतडा, कॅप्टन, आनंद बोडस व विश्वास ठाकूर यांच्या शुभहस्ते गौरविण्यात आले. कलाकारांचा सत्कार डॉ. विकास गोगटे, देवेंद्र बापट, आर्कि. संजय पाटील व विश्वास ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आला.
सदर कार्यक्रम यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई विभागीय केंद्र नाशिक व विश्वास को-ऑप बँक लि., नाशिक, विश्वास ज्ञान प्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिटयुट, नाशिक, सारस्वत बँक व रेडिओ विश्वास ९०.८ कम्युनिटी रेडिओ, विश्वास गार्डन, कुसुमाग्रज प्रतिष्ठान, ग्रंथ तुमच्या दारी यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न झाला.






No comments:

Post a Comment