अपंग हक्क विकास मंच आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने 'दिव्यांग कट्टा' अंतर्गत 'दिव्यांग व्यक्ती आणि सरकारी विविध अर्थिक योजना' या विषयावरती मा. नंदकुमार फुले यांचे व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी २९ डिसेंबर २०१८ रोजी दुपारी २ वाजता बेसमेंट हॉल मध्ये दिव्यांग कट्ट्याला सुरूवात होईल. अपंग विकास मंचतर्फे दिव्यांग मित्र मंडळीसह बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. अधिक संपर्क - सुकेशनी शेवडे ८६५२११८९४९
Monday, 24 December 2018
Sunday, 23 December 2018
रविवारी सुप्रसिद्ध लेखक वसंत लिमये यांची जाहीर मुलाखत मुलाखतकार, आ. हेमंत टकले
नाशिक : लॉक ग्रिफिन, विश्वस्त या लोकप्रिय कादंबर्यांचे लेखक वसंत लिमये यांच्या जाहीर मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. श्री. लिमये यांची मुलाखत आ. हेमंत टकले घेणार आहेत.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिक व विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक, ग्रंथ तुमच्या दारी, विश्वास ज्ञानप्रबोधिनी अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक, सारस्वत बँक व रेडिओ विश्वास ९०.८ कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने सदर मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार दि. २३ डिसेंबर २०१८ रोजी सकाळी १०.३० वाजता डिझास्टर मॅनेजमेंट अॅण्ड ट्रेनिंग हब, ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास को-ऑप. बँकेसमोर, सावरकरनगर, गंगापूर रोड, नाशिक येथे हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.
आय.आय.टी. मधून मेकॅनिकल इंजिनिअरची पदवी घेऊन बाहेर पडलेल्या वसंत लिमये यांनी आय.टी. क्षेत्रातील मोठ्या पगाराची नोकरी न करता गिर्यारोहण, फोटोग्राफी व लेखन अशा विविध क्षेत्रात मुशाफिरी करत आहेत. लॉक ग्रिफिन, विश्वस्त, कॅम्पफायर अशा पुस्तकांनी त्यांनी आपला स्वतंत्र वाचक वर्ग निर्माण केला आहे. अशा बहुआयामी व्यक्तिमत्त्वाची जीवन व साहित्य प्रवासाची सफर मुलाखतीतून उलगडली जाणार आहे.
तरी या कार्यक्रमास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन अध्यक्ष विनायक पाटील, कार्याध्यक्ष विश्वास ठाकूर, सचिव डॉ.कैलास कमोद, कोषाध्यक्ष डॉ.सुधीर संकलेचा, सदस्य सौ.कविता कर्डक, राजवर्धन कदमबांडे, रऊफ पटेल, अॅड.नितीन ठाकरे व विक्रम मोरे तसेच विश्वास ज्ञानप्रबोधिनी अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष डॉ. मनोज शिंपी, ग्रंथ तुमच्या दारीचे शिल्पकार विनायक रानडे यांनी केले आहे.
Tuesday, 18 December 2018
सोलापूर विभागातर्फे यंदाचा यशवंतराव चव्हाण गौरव पुरस्कार डॉ. शिवाजीराव देशमुख यांना प्रदान
सोलापूर विभागीय केंद्र आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबईतर्फे पहिला यशवंतराव चव्हाण गौरव पुरस्कार महाराष्ट्रातील जेष्ठ विचारवंत प्रा. डॉ. अशोक चौसाळकर यांच्या शुभहस्ते प्रा. डॉ. शिवाजीराव देशमुख यांना हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या डॉ. वा.का.किर्लोस्कर सभागृहात प्रदान करण्यात आला रोख रु. १५,०००/- मानपत्र शाल व श्रीफळ व पुष्पहार असे या पुरस्काराचे स्वरूप होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. गो. मा. पवार होते.
देशमुख यांनी यशवंतराव चव्हाण साहेबांच्या साहित्यावर संशोधनावर केल्यामुळे डॉ. बाबासोहब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने त्यांना पीएचडी ही पदवी बहाल केली आहे. चव्हाण साहेबांच्या साहित्यावर पीएचडी करणारे देशमुख हे पहिले पीएचडी धारक आहेत. तसेच यशवंतराव चव्हाण यांच्या साहित्यावर त्यांचे ३ ग्रंथ प्रकाशित झाले आहेत. यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्धी निमित्त त्यांनी महाराष्ट्रात ३०० हून अधिक व्याख्याने दिली आहेत. त्यांच्या एकूण साहित्य सेवेबद्दल त्यांना यंदाचा यशवंतराव चव्हाण गौरव पुरस्कार देण्यात येत असल्याचे मा. दत्ता गायकवाड यांनी सांगितले.
महाराष्ट्र निर्मितीचा पाया आणि यशवंतराव चव्हाण या विषयावर प्रमुख पाहुणे प्रा. डॉ. अशोक चौसाळकर यांनी सखोल माहिती आपल्या व्याख्यानातून दिली. या प्रसंगी विभागीय केंद्राचे कोषाध्यक्ष राजशेखर शिवदारे सदस्य युन्नुसभाई शेख, दत्ता गायकवाड, राहुल शहा, दीपक साळुंखे आणि प्रकाश येलगुलवार यांच्यासह साहित्य कला सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मंडळी या समारंभात उपस्थित होते.

Tuesday, 11 December 2018
ज्येष्ठ नागरिकांचा कायदा आणि विविध योजना या विषयावरती कायदेविषयक मार्गदर्शन
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई आणि कायदेविषयक सहाय्य व सल्ला फोरम यांच्या 'आपला कायदा जाणून घ्या' या व्याख्यानमाले तर्फे 'ज्येष्ठ नागरिकांचा कायदा आणि विविध योजना' या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. या विषयावरती मा. अॅड. भुपेश सामंत हे मार्गदर्शन करणार असून हा कार्यक्रम शुक्रवारी १४ डिसेंबर २०१८ रोजी सायंकाळी ५ वा. बोर्ड रूम, पाचवा मजला, यशवंतराव चव्हाण केंद्र. जनरल जगन्नाथ भोसले मार्ग, नरिमन पाईंट, मुंबई येथे सुरू होईल.
Monday, 10 December 2018
Wednesday, 5 December 2018
९ व्या यशवंत आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलच्या नोंदणीला सुरूवात..

दरवर्षीप्रमाणे यंदाही बहुचर्चित यशवंत आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला १८ जानेवारी २०१९ ला सुरूवात होत आहे. चित्रपट महोत्सव यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई आणि पुणे फिल्म फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने चव्हाण सेंटर, जनरल जगन्नाथराव भोसले मार्ग, नरिमन पॉईंट येथे होणार आहे.
चित्रपट महोत्सवाचे हे नववे वर्ष असून १८ जानेवारी ते २४ जानेवारी दरम्यान होणा-या महोत्सवामध्ये ग्लोबल सिनेमा, रेट्रोस्पेक्टीव्ह, इंडियन सिनेमा, कंट्री फोकस आणि मराठी सिनेमा इत्यादी प्रकारचे सिनेमे दाखवण्यात येणार आहेत. तसेच ऑनलाईन नोंदणी पुढील लिंकवरती करता येईल www.yiffonline.com.
Wednesday, 28 November 2018
विदर्भ संशोधन मंडळ, नागपूर या संस्थेला यशंवतराव चव्हाण राज्यस्तरीय २०१८ पुरस्कार प्रदान...

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या ३४ व्या पुण्यतिथीनिमित्त यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात शुक्रवारी २५ नोव्हेंबर २०१८ रोजी यशंवतराव चव्हाण राज्यस्तरीय २०१८ पुरस्कार प्रदान सोहळा पार पडला. यावेळी स्वागतपर भाषण प्रतिष्ठानचे कोषाध्यक्ष हेमंत टकले यांनी केले. त्यानंतर खासदार व प्रतिष्ठानच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी प्रास्ताविक भाषणात अपंग हक्क विभागातर्फे ६००० विद्यार्थांना श्रवणयंत्र वाटप करण्यात आले याची दखल गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झाली असल्याचे सांगितले. त्यामध्ये विजय कान्हेकर यांचे महत्वपूर्ण योगदान लाभले त्याबद्दल यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान तर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. प्रतिष्ठानच्यावतीने आरोग्य, अपंग व इतर उपक्रमाविषयी थोडक्यात आढावा घेतला. तसेच विधवा महिला पुनर्वसन उपक्रम 'उमेद'च्या माध्यमातून राबविला जात आहे. शिक्षण व शिक्षणक्षेत्रात होणारे बदल प्रतिष्ठानच्या माध्यामतून राबविणे अशा अनेक उपक्रमांविषयी माहिती दिली. यावेळी या कार्यक्रमात १२ मार्च २०१९ रोजी ‘यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार’ रिझर्व्ह बँकेचे माजी २३ वे गव्हर्नर रघुराम राजन यांना दिला जाईल अशी घोषणा पुरस्कार समितीचे अध्यक्ष अनिल काकोडकर यांनी केली.
नव्या पिढीच्या संशोधकांना स्वतंत्र व्यासपीठ प्राप्त व्हावे, त्यांच्यात संशोधनाविषयी आवड निर्माण व्हावी व त्यांच्या संशोधनाला चालना प्राप्त होऊन नव-नवीन संशोधन विद्वज्जनांच्या पुढे यावे या उद्देशाने विदर्भ संशोधन मंडळाची स्थापना होऊन विस्तार झाला. सदर संस्थेचे दीर्घकालीन वाङमयीन व ऐतिहासिक कार्य लक्षात घेता या कार्याची गौरवपूर्ण नोंद घ्यावी म्हणून यावर्षी यशंवतराव चव्हाण राज्यस्तरीय २०१८ पुरस्कार विदर्भातील 'विदर्भ संशोधन मंडळ, नागपूर' या संस्थेला प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष अरुण गुजराथी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. पुरस्कार संस्थेच्या वतीने राजेंद्र पाठारे व मदन कुलकर्णी यांनी स्विकारला.या पुरस्काराच्या सन्मानपत्राचे वाचन प्रतिष्ठानचे सरचिटणीस शरद काळे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमरिश मिश्रा यांनी केले
राजू परुळेकरांचे सत्याविरुध्दचे प्रचारयुग विषयावरवरती विध्यार्थ्यांना धडे
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई आणि विभागीय केंद्र ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने बा.ना बांदोडकर विज्ञान महाविद्यालय ठाणे येथे सत्याविरुद्धचे प्रचार या विषयावरती ज्येष्ठ पत्रकार राजू परुळेकर यांच्या व्याख्यानाचे आयोजन केले होते.
कार्यक्रम महाविद्यालयात असल्याने विद्यार्थ्यांची अधिक उपस्थिती होती. विध्यार्थ्यांना कळेल आणि समजेल अशा उदाहरणे देऊन परुळेकरांनी व्याख्यानाला सुरुवात केली. एक असत्य बोलल्यावर किती असत्य बोलावं लागतं. हे उदाहरण त्यांनी सुरुवातीला दिल. त्यानंतर त्यांनी प्रत्येक क्षेत्रातील उदाहरणे दिली. हा संपूर्ण कार्यक्रम खालील लिंकवरती उपलब्ध आहे.
https://www.facebook.com/ybchavanpratishthan/videos/2114104765570632/
फिल्म अॅप्रीसीएशन वर्कशॉप'...

९ वा यशवंत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०१९ च्या निमित्ताने दिनांक ३० नोव्हेंबर कलिना विद्यापीठ, १ डिसेंबरला मंगला हायस्कूल, ठाणे (पूर्व) या ठिकाणी 'फिल्म अॅप्रीसीएशन वर्कशॉप' होणार आहे. यासाठी डॉ. जब्बार पटेल व समर नखाते उपस्थित राहणार असून सहभागी होणा-यांना मार्गदर्शन करतील. हे वर्कशॉप मोफत असून नाव नोंदणीसाठी Registration yiffonline.com किंवा sms FAW to 7021753978 वर करणे आवश्यक आहे.
Tuesday, 20 November 2018
शनिवारी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये दिव्यांग कट्टा
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई आणि अपंग हक्क विकास मंच यांच्या संयुक्तविद्यमाने शनिवारी २४ नोव्हेंबर २०१८ रोजी दुपारी २ वाजता दिव्यांग कट्ट्याचे आयोजन प्रतिष्ठानच्या बेसमेंट हॉल मध्ये करण्यात आले आहे. हा कट्टा संयोजक मा. विजय कान्हेकर यांच्या उपस्थितीत होणार असून अधिक दिव्यांगांनी उपस्थित रहावे असे आवाहन आयोजीत संस्थाकडून करण्यात आले आहे. संपर्क सुकेशनी शेवडे ८६५२११८९४९.
ठाणे विभागातर्फे सत्याविरुध्दचे प्रचारयुग या विषयावरती व्याख्य़ान
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई विभागीय केंद्र ठाणे आणि बा. ना. बांदोडकर विज्ञान महाविद्यालय, ठाणे यांच्या संयुक्तविद्यमाने यशवंत व्याख्यानमाला कार्यक्रमांतर्गत सत्याविरुध्दचे प्रचारयुग या विषयावरती ज्येष्ठ पत्रकार राजू परूळेकर मार्गदर्शन करणार आहेत.
भारताचे माजी उपपंतप्रधान स्वर्गीय यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान हे एक द्रष्टे व्यक्तिमत्व होते. ज्ञान, विज्ञान, संशोधन, कला साहित्य, शिक्षण, क्रिडा, सामाजिक सुधारणा या प्रत्येक घटकांबाबत विलक्षण आस्था होती. भावी समाजाच्या उभारणीसाठी तरूण पिढीकडून त्यांना विशेष अपेक्षा होत्या. या दृष्टीकोनातून यशवंत व्याख्यानमाला सुरू केली आहे.
हा कार्यक्रम सोमवारी २६ नोव्हेंबर २०१८ रोजी सकाळी ११ वाजता पतंजली सभागृह, बा. ना. बांदोडकर महाविद्यालयात सकाळी ११ वाजता सुरू होईल. अधिक संख्येने व्य़ाख्यानास उपस्थित रहावे असे आवाहन मुरलीधर नाले आणि माधुरी पेजावर यांनी केले आहे.

Sunday, 18 November 2018
यंदाचा यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्कार विदर्भ संशोधन मंडळाला जाहीर
यशवंतराव चव्हाण यांच्या विविध क्षेत्रांतील लक्षणीय कामगिरीमुळे एक सुसंस्कृत नेते व द्रष्टे लोकाग्रणी म्हणून त्यांचे स्थान लोकमानसात आजही अढळ आहे. त्यांच्या कार्याचा आणि विचारांचा वारसा जतन करून सार्वजनिक हिताचे विविध उपक्रम हाती घेण्याच्या उद्देशाने १९८५ साली यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबईची स्थापना करण्यात झाली.
प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी मा. यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने राज्यस्तरीय पारितोषिक देण्यात येते. हे पारितोषिक कृषी औद्योगिक समाज रचना किंवा व्यवस्थापन प्रशासन, सामाजिक एकात्मता/विज्ञान तंत्रज्ञान, ग्रामीण विकास/अर्थिक सामाजिक विकास, मराठी साहित्य संस्कृती/ कला-क्रिडा या क्षेत्रातील भरीव व पथदर्शी कार्य करणा-या व्यक्तीस अगर संस्थेस देण्यात येते.
महाराष्ट्रात साहित्य, संस्कृती आणि इतिहास संशोधनाच्या क्षेत्रात विदर्भ संशोधन मंडळ ही एक नामवंत संस्था आहे. विदर्भातील नव्या पिढीच्या संशोधकांना स्वतंत्र व्यासपीठ प्राप्त व्हावे, त्यांच्यात संशोधनाविषयी आवड निर्माण व्हावी व त्यांच्या संशोधनाला चालना प्राप्त होऊन नव-नवीन संशोधन विव्दज्जनांच्या पुढे या उद्देशाने विदर्भ संशोधन मंडळाची स्थापणा होऊन विस्तार झाला. सदर संस्थेचे दीर्घकालीन वाङमयीन व ऐतिहासिक कार्य लक्षात घेता या कार्याची गौरवपूर्ण नोंद घ्यावी म्हणून या वर्षीचे यशवंतराव चव्हाण राज्यस्तरावरील पारितोषिक मा. यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथी निमित्त २५ नोव्हेंबर २०१८ या दिवशी प्रतिष्ठानचे अध्यक्ष मा. शरद पवार यांच्या हस्ते देण्यात येणार आहे. हा कार्यक्रम यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात सायंकाळी ५ वाजता सुरू होईल.

Tuesday, 13 November 2018
आहार, विहार, विचार,आचार मिळून स्वास्थ्याचा विचार - सेंद्रीय शेतीतज्ज्ञ जितुभाई कुटमुठीया
नाशिक : आहार, विहार, विचार, आचार मिळून स्वास्थ्याचा विचार पूर्ण होतो, त्यासाठी नकारात्मक विचार न करणे हा सर्वात मोठा सकारात्मक विचार आहे, त्याकरीता शरिरासाठी आवश्यक आणि मुलभूत गोष्टींचा विचार करणे म्हणजे निरोगी आयुष्य होय, असे प्रतिपादन सेंद्रीय शेतीतज्ज्ञ जितुभाई कुटमुठीया यांनी केले.
विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिक,विश्वास ज्ञानप्रबोधिनी अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक, ग्रेप कंट्री, ग्रंथ तुमच्या दारी, इशाश्री कन्सट्रक्शन, अॅम्रो कॉलेज सारस्वत बँक व रेडिओ विश्वास ९०.८ कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘मेक वर्ल्ड बेटर’ उपक्रमातंर्गत ‘मंत्रा टु बी हेल्थी’ या विषयावर जाहीर व्याख्यानाचे आयोजन डिझास्टर मॅनेजमेंट अॅण्ड ट्रेनिंग हब, ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास को-ऑप. बँकेसमोर, सावरकरनगर, गंगापूर रोड, नाशिक करण्यात आले होते त्याप्रसंगी ते बोलत होते. आर्किटेक्ट मंजु बेळे-राठी यांनी सदर उपक्रमाचे आयोजन केले होते. व्याख्यानाचा शुभारंभ विश्वास को-ऑप बँकेचे संस्थापक अध्यक्ष विश्वास जयदेव ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आला.
श्री. जितुभाई कुटमुठीया म्हणाले की, जगातील अशी एकही व्यक्ती नाही, ज्यांना एखादा विकार किंवा आजार नाही. वडापाव आपण अगदी चवीने खातो. पण आपलं पोट त्याला नाही म्हणतं. तरी देखील आपण चवीचवीने खातो आणि त्रास करून घेतो. आपल्यामध्ये कायम सकारात्मकता असावी. आपल्यातील नकारात्मकतेमुळे आपण मानसिक ताण वाढवून घेतो त्याचा शेवटी आपल्या शरीरावर विपरीत परिणाम होतो. मधुमेहाची वय असलेल्यांनादेखील तीन महिने औषध सेवन न करता बंद ठेवून त्यांची प्रकृती उत्तम राहिल्याचे त्यांनी उदाहरण दिले. औषधांच्या जास्त सेवनाने देखील विविध आजार बळावतात. औषधांच्या सवयीमुळे त्यातील अनावश्यक घटक लिव्हरपर्यंत पोहचतात. या सवयीमुळे विविध आजार वाढून माणसावर मृत्युदेखील ओढावला जाऊ शकतो.
आपण हायजेनिक - हायजेनिक म्हणतो पण आपल्या शरिरात देखील बँक्टेरीया देखील असतो. लहान मुलांना आपण अन्न पाणी सर्व काही स्वच्छ देतो उकडून देतो पण बाहेरचं काही खाल्लं तर ते लगेच आजारी पडतात. त्यांची रोग प्रतिकारक शक्ती कमी असते.
माजी कृषी मंत्री खा. शरद पवार यांनी जितुभाई यांच्या सेंद्रीय शेती प्रक्रियेची दखल घेतल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. जेव्हा आमच्या पिकांवर बी-१२ रोग नव्हता तेथील एका संस्थेतील एचओडीकडून त्यांनी खात्री केली की बी-१२ चा प्रादुर्भाव राज्यात सर्वत्र असतांना आमच्या शेतीतील पिकांवर हा रोग नसल्याची खात्री होताच शरद पवार यांनी जितुभाई यांची प्रत्यक्ष भेट घेत त्यांची प्रशंसा केली. हा रोग आमच्या कोणत्याही पिकांवर नव्हता कारण कोणत्याही प्रकारचं रासायनिक खत आमच्या पिकांवर टाकत नसल्याचे ते म्हणाले.
क्लोरीनचं पाणी आपल्या शरिराला खुप घातक असतं. जैन समाजबांधव लोक पाण्यात राख टाकून पाणी पितात. याने पाण्यातील क्लोरीन कमी होऊन पाण्यातील मिनरल्स वाढते आपण देखील रोज सकाळ संध्याकाळ पाण्यात राख टाकून पाणी पिले पाहिजे.
देशी शुद्ध तुप, कच्च्या घाण्याचे खोबर्याचे तेल शरिरासाठी चांगले असते. रिफाईन तेल हे शरिरासाठी घातक असते. गहू साखर, रिफाईन ऑईल दुर केल्यास तुम्हाला कोणताही आजार होणार नाही. त्याऐवजी नागली, भात खावा, असेही ते म्हणाले.
आपण फळांवर कीटकनाशकांचा मारा करतो. कीटक नाशकांसह खातो आणि आजारपण वाढवून घेतो एखाद्या पिकावर जिवाणी असतात ते पिक काढल्यावर मरतात मग जमीनीवर पसरतात आणि पाऊस पडल्यावर बी १२ सारखे रोग पिकांवर पसरतात. घरात आपण झाडलेली रस्त्यावरची धुळ, माती सुद्धा आपल्या कुंडीतील रोप चांगल्या पद्धतीने वाढवते.
‘मेक वर्ल्ड बेटर’ या संकल्पनेच्या माध्यमातून अशा अनेक व्याख्यान आणि पर्यावरण पुरक उपक्रम विनामुल्य स्वरूपात कोणताही आर्थिक उद्देश समोर न ठेवता पर्यावरणाच्या आणि मानवी आरोग्याच्या संरक्षणासाठी आपण यापुढे राबवणार असल्याचे मंजु बेळे-राठी म्हणाल्या.
यावेळी उपस्थितांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली. कार्यक्रमास डॉ.सुधीर संकलेचा, किरण चव्हाण, विनायक रानडे, धनंजय ठाकूर, मनिष मारू, शैलेश येवले, निता वैद्य, अश्विनी देशपांडे, जय नरसे, श्रीकांत चिंचोलीकर, प्रकाश कठपाळ, विनोद चावला, सुनंदा सोनी, संदीप मदाने आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक मंजु बेळे-राठी यांनी केले.

Monday, 12 November 2018
शिक्षण विकास मंच’आयोजित राज्यस्तरीय परिषद
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई आणि शिक्षण विकास मंच यांच्या संयुक्त विद्ममाने “शालेय शिक्षण : आज आणि उद्या” या विषयावरती राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ही परिषद रविवारी २५ नोव्हेंबर २०१८ रोजी सकाळी १० ते ५ यावेळेत ‘रंगस्वर’, चौथा मजला, मंत्रालयासमोर,यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई येथे होईल.
संयुक्त महाराष्ट्राचे शिल्पकार, पहिले मुख्यमंत्री, राज्यात कृषी आणि औद्योगिक विकासाचा पाया घालणारे, तळागाळातल्या लोकांना पंचायत राजच्या माध्यमातून लोकशाही ताकदीचे देणारे मा. यशवंतराव चव्हाण यांच्या मृत्युनंतर त्यांचे कार्य पूर्णत्वाला नेण्यासाठी दिनांक २५ सप्टेंबर १९८५ रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानची स्थापना झाली.
शेती, सहकार, महिला बचत गट आणि महिलांसाठीचे कार्यक्रम, युवकांसाठीचे कार्यक्रम, अपंगांसाठीचे कार्यक्रम आणि कायदेविषयक सल्ला अशा सामाजिक विकासाच्या क्षेत्रात यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान काम करत आहे.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या अंतर्गत कार्य करणाऱ्या शिक्षण विकास मंचाची स्थापना २००८ मध्ये डॉ. कुमुद बन्सल यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. त्यांचे २०१२ मध्ये अकाली निधन झाले.
प्रतिष्ठानच्या कार्याध्यक्ष सुप्रियाताई सुळे शिक्षण विकास मंचच्या निमंत्रक असून डॉ. वसंत काळपांडे मुख्य संयोजक, बसंती रॉय विशेष सल्लागार आणि माधव सूर्यवंशी समन्वयक म्हणून जबाबदारी पाहतात. शिक्षण विकास मंच शैक्षणिक विषयांवर परिषदा, चर्चासत्रे, शिक्षणकट्टे, व्हाट्सअॅप समूह, शिक्षक साहित्य संमेलने, दत्तक शाळा योजना, उत्कृष्ट शैक्षणिक ग्रंथांना पुरस्कार, प्राथमिक आणि माध्यमिक शाळांचे शिक्षक आणि मुख्याध्यापक यांचे प्रशिक्षण अशा वैविध्यपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन करत आहे.
“शालेय शिक्षण: आज आणि उद्या” हा या वर्षीच्या परिषदेचा विषय आहे. शिक्षण व्यवस्था समाजाच्या गरजा पूर्ण करत असते, तर शिक्षण व्यवस्थेत समाजाच्या आशा आकांक्षा प्रतिबिंबित झालेल्या असतात. तंत्रज्ञान, आर्थिक, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक अशा सर्वच क्षेत्रांत वेगाने बदल होत आहेत. शिक्षणात या बदलांचे प्रतिबिंब पडणे अपरिहार्यच असते. अभ्यासक्रम, पाठ्यपुस्तके, अध्ययन-अध्यापन पद्धती, प्रशासन, भौतिक सुविधा, शैक्षणिक साहित्य, पालकांची भूमिका अशा सर्वच क्षेत्रांत त्या अनुषंगाने बदल होत असतात. या बदलांचा ऊहापोह करणे या परिषदेचे मुख्य प्रयोजन आहे. सहभागी होण्यासाठी खालील गुगल फॉर्म वर नोंदणी करावी. गुगल फॉर्म- https://goo.gl/baHVoj अधिक माहितीसाठी माधव सूर्यवंशी - ९९६७५४६४९८
Sunday, 21 October 2018
विनामूल्य रांगोळी कार्यशाळा संपन्न
रांगोळी म्हणजे प्रसन्नता, सकारात्मक व भारतीय संस्कृतीचे कलात्मक प्रतिबिंब असं चित्र लगेच डोळ्यांसमोर चटकन उभं राहतं. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई आणि महाराष्ट्र महिला व्यासपीठातर्फे "मंजिरीच्या झटपट रांगोळ्या व रांगोळी काढायच्या सोप्या व विविध पद्धतीवरती प्रशिक्षणार्थींच्या आग्रहाखातर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
चूकीच्या पध्दतीने शेती केल्याने शेतीचं वाटोळं झालं...
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई व मराठी विज्ञान परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने विज्ञानगंगा कार्यक्रमांतर्गत एकतिसावे पुष्प व्याख्याते डॉ. आनंद कर्वे यांचे 'आदाने फुकट पण शेतकरी कर्जबाजारी' या विषयावरील व्याख्यान नुकतेच चव्हाण सेंटर, सांस्कृतिक सभागृह, चौथा मजला, जनरल जगन्नाथराव भोसले मार्ग, मंत्रालयासमोर, नरिमन पॉईंट येथे संपन्न झाले.
कार्यक्रमाला काही शेती जाणकार आणि शेतीविषयी अनभिज्ञ असलेली मंडळी हजर होती. कर्वे यांनी पिके कशा पद्धतीने घ्यावी, त्याचं नियोजन कसे करावे, कीटकनाशक फवारणी केव्हां करावी, एकाचवेळी दोन पिकं कशी घ्यावी आणि परदेशात कशी पिकं घेतली जातात इत्यादी मुद्द्यांवर उपस्थितांना मार्गदर्शन केले.
दोन पिके कशी घेतली जातात, याबाबत त्यांनी जपानचं उदाहरण दिलं. जपानमध्ये भाताच्या पिकासोबत गव्हाचं पीकं घेतलं जातं. भाताची पेरणी झाल्यानंतर महिनाभरात गहू पेरला जातो. गव्हामुळे तण अजिबात उगवत नाही आणि भाताचं पिकं काढल्यानंतर महिनाभरात गव्हाचंही पीक काढलं जातं असं त्यांनी सांगितलं.

Friday, 19 October 2018
६ हजार कर्णबधीर विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांना मोफत डिजिटल श्रवणयंत्राचे वाटप होणार
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबईच्या कार्याध्यक्ष मा. सुप्रिया सुळे यांच्या प्रयत्नाने यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई अपंग हक्क विकास मंच, स्टार्की फाऊंडेशन अमेरिका यांच्या संयुक्त विद्यमाने मागील पाच वर्षापासून महाराष्ट्रातील औरंगाबाद, ठाणे आणि पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात, विशेष शाळांमध्ये ० ते १० या वयोगटातील कर्णबधीर मुलांना आत्याधुनिक डिजिटल श्रवणयंत्र बसविण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. साधारण एका लाभार्थ्यांस दोन कानाचे दोन यंत्र व सहाय्यक साधनं असे २५००० रूपयांचे यंत्र बसविण्यात आले. आजपर्यंत या उपक्रमात १५००० हजार लाभार्थ्यांनी लाभ घेतला. यंत्र बसविल्यानंतर त्या मुलांची भाषा, वाचा विकासाचा व विविध पातळीवरील विकासाचा आढावा देखील घेण्यात येत आहे.
यावर्षी उपरोक्त कार्यक्रमाची व्याप्ती वाढवली असून स्टार्की फाऊंडेशन अमेरिका, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई अपंग हक्क विकास मंच, टाटा ट्रस्ट, मुंबई, आरव्हीएस एज्युकेशनल अॅण्ड चॅरिटेबल फाऊंडेशन, ठाकरसी ग्रुप मुंबई, पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई आणि महात्मा गांधी सेवा संघ जिल्हा अपंग पुनवर्सन केंद्र पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आणि अपंग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या सहकार्याने महाराष्ट्रातील (पुणे, सातारा, सांगली, हिंगोली, परभणी, कोल्हापूर, सोलापूर, रत्नागिरी, रायगड, ठाणे, उस्मानाबाद, नांदेड, जालना, औरंगाबाद, लातूर, बीड, अहमदनगर, धुळे, नंदुरबार, जळगांव, बुलढाणा, सिंधुदुर्ग अशा एकूण २२ जिल्ह्यांमध्ये सामान्य व विशेष शाळांमधील कर्णबधीर मुलांसाठी नाव नोंदणी कर्णसाचाचे मोजमाप शिबीरे आयोजीत करण्यात आली होती.
६००० कर्णबधीर विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांना शुक्रवार दिनांक २६ ऑक्टोबर २०१८ रोजी, शिवछत्रपती स्पोर्टस, कॉम्पलेक्स, बालेवाडी, पुणे येथे सकाळी ९ ते सायंकाळी ६ पर्यंत मोफत डिजिटल श्रवणयंत्राचे वाटप करण्यात येणार आहे. या शिबिरात सहभागी होणा-या लाभार्थ्यांची संख्या पाहता या कार्यक्रमाची नोंद ही जागतिक विक्रमासाठी प्रसिध्द असलेल्या गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये करण्याचा मानस आहे.
या कर्णबधिर मुलांना डिजीटल श्रवणयंत्र लावल्यानंतर ऐकू येणा-या ध्वनी लहरींमुळे, त्यांच्या चेह-यावर झळकणारा आनंद व्दिगुणीत करण्यासाठी आपली उपस्थिती प्राथनीय आहे.

Monday, 15 October 2018
वंचित बालकांचे हक्क विकासाच्या केंद्रस्थानी असावेत - भाल कोरगावकर
सोलापूर : वंचित बालकांचे हक्क विकासाच्या केंद्रस्थानी असले पाहिजेत. वंचित मुलांच्या शाश्वत पुनर्वसनासाठी समाज व शासन सक्रीय पुढाकार घ्यावा असे आवाहन भाल कोरगावकर यांनी केले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई विभागीय केंद्र सोलापूर, आपलं घर बालगृह, वालचंद कला वा शस्त्र महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आपलं घरच्या रौप्यमहोत्सवानिमित्त "वंचित मुले व समाज" या विषयावर एकदिवसीय परिसंवादात आयोजीत करण्यात आला होता. बीजभाषण करताना ते पुढे म्हणाले कि, पोषण आहार व बालशिक्षण हा भारतीय बालकांच्या संदर्भात जीवन-मरणाचा प्रश्न बनला आहे. सारे जग अक्षर साक्षरता साध्य करून डिजीटल साक्षरतेकडे वाटचाल करताना भारतातील मुले मुलभूत हक्कांपासून वंचित आहेत. बालपण निर्देशांकात ब्रिक्स देशांत भारताचा सर्वात शेवटचा क्रमांक आहे. वंचित मुलांचा प्रश्न समाजाच्या दया व सहानुभूतीवर अवलंबून न ठेवता कायद्यानेच शाश्वत पुनर्वसन करण्याकरिता शासनाने पावले उचलली पाहिजेत असे प्रतिपादन भाल कोरगावकर यांनी केले.
या परिसंवादाचे उद्घाटन शुभांगी बुवा यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.संतोष कोटी होते. तर विचारमंचावर साथी पन्नालाल सुराणा, विभागीय केंद्राचे सदस्य दत्ता गायकवाड, प्रा.डॉ.अबोली सुलाखे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. युवाशक्ती हीच राष्ट्रशक्ती आहे. युवकांच्या सहभागानेच वंचित मुलांचा प्रश्न सुटू शकेल व भविष्यात पाखर सारख्या संस्थांची गरज राहू नये अशी अपेक्षा शुभांगी बुवा यांनी यावेळी व्यक्त केली.
प्राचार्य. डॉ. संतोष कोटी म्हणाले कि समाजकार्याच्या विद्यार्थ्यांनी शिक्षण पूर्ण झाल्यावर काही महिने वंचित बालकांसाठी काम करणाऱ्यांनी संस्थेत विनामुल्य काम करावे. किल्लारी भूकंपात अनाथ झालेल्या बालकांचे बालकत्वाची जबाबदारी भाई पन्नालाल सुराणा व आपलं घरणे घेतली सदर प्रकल्प उभारणीसाठी मा. शरद पवार साहेबांनी मोलाची भूमिका बजावली आहे. व यास त्यांचा खारीचा वाटा आहे, हे ऐतिहासिक व अभिनंदनीय समाजकार्य आहे. आदिवासी समाजात एकही अनाथ बालक आढळत नाही. मात्र सुशिक्षित समाजातील वंचित व अनाथ बालकांची संख्या समाजाच्या सुसंस्कृतपणावर प्रश्न निर्माण करते असे प्रतिपादन प्राचार्य. डॉ. कोटी यांनी केले. उद्घाटनाच्या सत्रात प्रा. डॉ. अबोली सुलाखे यांनी वंचितांच्या पुनर्वसनात संगीताचे योगदान या विषयावर मार्गदर्शन केले. संगीत मनोरंजनासोबत जीवन जगण्याचा आधार मिळवून देते असे त्या म्हणाल्या. उद्घाटन सोहळ्याची प्रस्तावना साठी पन्नालाल सुराणा यांनी केली व आपलं घरच्या स्थापना व रौप्य महोत्सवी वाटचालीला आढावा घेतला. पाहुण्यांचा परिचय प्रा. डॉ. अभय जाधव व प्रा. श्रीकांत धारूरकर यांनी करुन दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. ज्योती वाघमारे यांनी केले तर आभार प्रदर्शन निलेश ठाकूर यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समाजकार्य विभागतीत सर्व प्राध्यापक. डॉ. इंदिरा चौधरी, डॉ. निशा वाघमारे, डॉ.विजया महाजन, डॉ.संदीप जगदाळे, डॉ.जितेंद्र गांधी व डॉ.अभय जाधव आणि समाजकार्य विद्यार्थी स्वयसेवक यांनी विशेष परिश्रम घेतले.

Wednesday, 10 October 2018
मोबाईल ट्रेनिंग वर्कशॉप
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबईच्या महाराष्ट्र महिला व्यासपीठ तर्फे मोबाईल ट्रेनिंग वर्कशॉपचे शनिवारी १७ नोव्हेंबर २०१८ रोजी सकाळी ११ ते ६ या कालावधीत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, ४ था मजला, सांस्कृतिक सभागृह, जनरल जगन्नाथ भोसले मार्ग, सचिवालय जिमखाना मुंबई येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेमध्ये व्हाट्सअप्प, फेसबूक, आणि ट्विटर सोबत स्मार्ट फोन बाबत परिपुर्ण माहिती कार्यशाळेत देण्यात येणार आहे. तसेच टॅक्सी बूक करणे, गूगल मॅप शोधून काढणे, बूक माय शो, एम-इंडिकेटर, स्विगी, बीग मार्केट आणि पेटीएम इ. अॅपची माहिती सुध्दा दिली जाणार आहे. प्रत्येक प्रशिक्षणार्थीकडून ५०० रूपये शुल्क आकारले जाईल. संपर्क संजना - ८२९१४१६२१६, ०२२-२२०४५४६० (२४४) आहे.
Tuesday, 9 October 2018
विज्ञानगंगाचे एकतिसावे पुष्प...आदाने फुकट पण शेतकरी कर्जबाजारी
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई व मराठी विज्ञान परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने विज्ञानगंगा कार्यक्रमांतर्गत एकतिसावे पुष्प व्याख्याते डॉ. आनंद कर्वे यांचे 'आदाने फुकट पण शेतकरी कर्जबाजारी' या विषयावरील व्याख्यान शुक्रवार दि १९ ऑक्टोबर २०१८ रोजी सायंकाळी ५. वाजता चव्हाण सेंटर, सांस्कृतिक सभागृह, चौथा मजला, जनरल जगन्नाथराव भोसले मार्ग, मंत्रालया समोर, नरिमन पॉईंट मुंबई येथे गुंफणार आहे. तरी वरील कार्यक्रमास आपण उपस्थित रहावे ही विनंती.
Monday, 8 October 2018
ज्येष्ठ नागरिकांचा १९ वा आनंद मेळावा संपन्न..
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई यांच्यातर्फे दरवर्षी ऑक्टोबरमध्ये एक विशिष्ट क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या ज्येष्ठ नागरिक संघटनांच्या व फेस्कॉमच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ नागरिकांचा आनंद मेळाव्याचे आयोजित केला जातो. आनंद मेळाव्याचे हे १९ वे वर्षे आहे. आतापर्यंत ५४ ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला आहे. मेळाव्यामध्ये दोन पुरुष व दोन महिनला ज्येष्ठ नागरिकांना सत्कार करण्यात येतो. यावर्षी रविवार दि. ७ ऑक्टोबर २०१८ रोजी चव्हाण केंद्रामध्ये कुर्ला ते मुलुंड, नवी मुंबई या क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या ज्येष्ठ नागरिक संघटनांचा मेळावा भरविण्यात आला. यामध्ये जयमाला गोडबोले (घाटकोपर)सावित्री राव (नवी मुंबई ), रमेश अहिरे (घाटकोपर) व मुकुद कोलागिनी (नवी मुंबई) यांचा सत्कार करण्यात आला त्यावेळी घाटकोपर ज्येष्ठ नागरिक संघ व उत्कर्ष ज्येष्ठ नागरिक संघ (नवी मुंबई) यांचा ही सत्कार करण्यात आला. मेळाव्याचे अध्यक्ष श्री. शरद काळे हे होते व प्रमुख अतिथी म्हणून लेखिका मीना वैशंपायन उपस्थित होत्या. अंदाजे ४०० पेक्षा जास्त ज्येष्ठ नागरिक मेळाव्यात उपस्थित होते. सोबत खालील लिंक वर क्लिक करुन कार्यक्रमाचा व्हिडिओ पाहू शकता..
Friday, 28 September 2018
मोफत श्रवणयंत्र वाटप पूर्व नाव नोंदणी आणि मोजमाप शिबीर
यशवंतराव चव्हाण प्रतिशष्ठान, मुंबई अपंग हक्क विकास मंच, जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्र पुणे, महात्मा गांधी सेवा संघ आणि स्टार्की फाऊंडेशन, अमेरिका यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत श्रवणयंत्र वाटप पूर्व नाव नोंदणी आणि मोजमाप शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. ठाकरसी ग्रुप मुंबई, टाटा ट्रस्ट, मुंबई, एस. आर. व्ही. ट्रस्ट मुंबई यांच्या विशेष सहकार्याने हे शिबीर रविवारी ३० सप्टेंबर २०१८ सकाळी ८ ते दुपारी २ पर्यंत नु. म. वि प्रशाला ह. दे प्रशाले शेजारी, सोलापूर येथे हे शिबीर होईल.
विनामूल्य रांगोळी कार्यशाळा
रांगोळी म्हणजे प्रसन्नता, सकारात्मक व भारतीय संस्कृतीचे कलात्मक प्रतिबिंब असं चित्र लगेच डोळ्यांसमोर चटकन उभं राहतं. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई आणि महाराष्ट्र महिला व्यासपीठातर्फे "मंजिरीच्या झटपट रांगोळ्या व रांगोळी काढायच्या सोप्या व विविध पद्धती" या विषयावरती प्रशिक्षणार्थींच्या आग्रहाखातर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक २० ऑक्टोबर २०१८ शनिवारी दुपारी २ ते ५ यावेळेत बेसमेंट सभागृह, वाय बी सेंटर, जनरल जगन्नाथ भोसले मार्ग, सचिवालय जिमखाना जवळ, मुंबई २१ कार्यशाळा होईल. अधिक संपर्क संजना पवार ८२९१४१६२१६, ऑफीस २२०४५४६० (२४४).
Thursday, 27 September 2018
ठाणे विभागातर्फे ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार
ज्येष्ठ नागरिक दिनाच्या निमित्ताने ठाणे शहरातील काही निवडक ज्येष्ठांचा, त्यांच्या सार्वजनिक जीवनातील कार्याचा गौरव करण्यासाठी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई विभागीय केंद्र ठाणे रोटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थ यांच्या संयुक्त विद्यमाने 'ज्येष्ठ नागरिक गौरव संध्या' कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
विशेष म्हणजे या कार्यक्रमाला मा. महेश झगडे, आय. ए. एस. निवृत्त प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई हे अध्यक्ष म्हणून उपस्थित राहतील, तर श्री. विश्र्वंभर दास, डॉ. दामोदर खडसे, फादर फ्रान्सिस दिब्रिटो, श्री. अरबिंद हेब्बार आणि डॉ. भगवान नागापूरकर यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देण्यात येणार आहेत. सत्कारानिमित्त मुकेश, किशोर कुमार, लता, आशा यांच्या काही निवडक गाण्यांचा खास कार्यक्रम आयोजीत केला आहे.
हा कार्यक्रम मंगळवारी २ ऑक्टोबर २०१८ रोजी संध्याकाळी ६ वाजता नरेंद्र बल्लाळ सभागृह, पहिला मजला, ठाणे महानगरपालिका ठाणे (प) येथे सुरू होईल. रोटोरीयन दिलीप दंड, अध्यक्ष, रोटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थ, रोटेरीयन अॅड. विशाल लांजेकर, सचिव, रोटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थ, अमोल नाले, सचिव, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान ठाणे जिल्हा केंद्र, आणि मुरलीधर नाले अध्यक्ष, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान ठाणे जिल्हा केंद्र यांनी अधिक संख्येने लोकांनी कार्यक्रमाला उपस्थित रहावे असे आवाहन केले आहे.

Wednesday, 26 September 2018
डॉ. कुमुद बन्सल उत्कृष्ट शैक्षणिक ग्रंथ’ पुरस्कारासाठी पुस्तके पाठविण्याचे आवाहन
सर्व विद्यार्थांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे या उद्देशाने यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबईचा विभाग शिक्षण विकास मंच मागील ६ वर्षांपासून कार्यरत आहे. प्रतिष्ठानच्या शिक्षण विकास मंचाने आतापर्यंत अनेक परिषदा, कार्यशाळा आणि चर्चासत्रे चव्हाण सेंटर आयोजित केली आहेत. तसेच शासनाला धोरणात्मक बदल करण्याच्या दृष्टीने शिफारशीही केल्या आहेत.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या शिक्षण विकास मंचतर्फे प्रतिवर्षी शैक्षणिक विषयक लिखाण केलेल्या उत्कृष्ट पुस्तकाचे लेखक आणि प्रकाशक यांना ‘डॉ. कुमुद बन्सल उत्कृष्ट शैक्षणिक ग्रंथ’ पुरस्काराने सन्मानित केले जाते. यावर्षी हा पुरस्कार दि. २५ नोव्हेंबर २०१७ रोजी प्रदान करण्यात येणार आहे. यासाठी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या शिक्षण विकास मंचाकडून उत्कृष्ट शिक्षणविषयक पुस्तकं मागविण्यात आले आहे. शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण, शिक्षणाची गुणवत्ता, मूल्यमापन पध्दती, शालेय उपक्रम, समाजाचा सहभाग, शैक्षणिक प्रशासन अशा विषयांना स्पर्श करणारे हे पुस्तक असावे.
तसेच शैक्षणिक प्रश्नांवर उपाययोजना त्यात मांडलेल्या असाव्यात. हे पुस्तक दि. १ ऑक्टोबर २०१७ ते दि. ३० सप्टेंबर २०१८ या कालावधीत प्रकाशित झालेले असावे. तरी संबंधित प्रकाशकांनी/लेखकांनी सदर ग्रंथाच्या दोन प्रती यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या मुख्य कार्यालयात शनिवार दि. ३१ ऑक्टोबर २०१८ पर्यंत शिक्षण विकास मंच, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, जनरल जगन्नाथराव भोसले मार्ग, मंत्रालयासमोर, मुंबई – २१. येथे पाठवाव्यात अशी विनंती डॉ. वसंत काळपांडे मुख्य संयोजकशिक्षण विकास मंच यांनी केली आहे. अधिक माहितीसाठी संपर्क : श्री. माधव सूर्यवंशी – ९९६७५४६४९८ श्री. रमेश मोरे – ९००४६५२२६२
Monday, 24 September 2018
वाहतूक सुरक्षा कार्यशाळा संपन्न
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र सोलापूर, सारथी सुरक्षा, सहा महाविद्यालये यांच्या संयुक्त विद्यमाने ६, ७, व ८ सप्टेंबर २०१८ रोजी वाहतूक सुरक्षा कार्यशाळेचे आयोजन सोलापूरातील सहा महाविद्यालयामध्ये करण्यात आले होते.
६ सप्टेंबर २०१८ रोजी संगमेश्वर येथील महाविद्यालयामध्ये पहिली कार्यशाळा घेण्यात आली. कार्यशाळेत २५० विद्यार्थी आणि विद्यार्थींनींनी सहभाग घेतला, सौ. राजमान्य यांनी कार्यशाळेच्या प्रमुख पाहुण्या श्रीमती वैशाली शिदे सहाय्यक पोलीस आयुक्त वाहतूक शाखा सोलापूर यांचा सत्कार केला त्यानंतर सारथी सुरक्षा या संस्थेचे प्रमुख श्री.विनय मोरे आणि त्यांचे सहकारी आनंद राजेभोसले यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. तसेच विभागीय केंद्राचे सदस्य श्री दत्ता गायकवाड यांचा देखील प्राचार्यांनी सत्कार केला.
प्रा. श्री. मोहोरकर यांनी कार्यक्रमाची संकल्पना विषद केली. त्यानंतर सारथी सुरक्षाचे विनय मोरे यांनी कार्यशाळेस प्रारंभ केला आणि आपल्या व्याख्यानातून रोज सरासरी ४०० अपघात आपंल्या देशामध्ये होतात आणि त्याची कारणे अनेक असल्याचे त्यांनी सांगितले. १८ ते ४० वयोगटातील नागरिकाचे अधिक बळी जातात. ही बाब लक्षात घेऊन या उपक्रमाच्या निमंत्रक खासदार सौ.सुप्रियाताई सुळे यांनी राज्यातल्या महाविद्यालयामध्ये जाऊन तरुण व तरुणींना याबाबत जागरूकता निर्माण व्हावी म्हणून या उपक्रमाचे आयोजन केले आहे.
संवाद स्वरुपात कार्यशाळा पार पडल्या त्यामुळे गंभीर आणि करमणूक याची जोड या कार्यशाळेत जाणवली. वाहतुकीचे नियम नीट समजावून सांगितले. फुटपाथ वरूनच का चालावे तसेच फुटताथ नसल्यास कोणती काळजी घ्यावी आणि न घेतल्यास कशाप्रकारे अपघात होऊ शकतात याची माहिती सुध्दा त्यांनी दिली. त्याचबरोबर वाहन चालवताना वेग,वाहतुकीचे नियम का पाळले जावेत तसे न केल्यास कोणत्या गंभीर परिणामांना सामोरे जावे लागते. त्यामुळे अपघात कसे होतात याची माहिती व्याख्यानातून आणि दृकश्राव्याच्या माध्यमातून विनय मोरे यांनी करून दिली. अपघात टाळण्यासाठी किती बारकाव्याने काळजी घेतली पाहिजेयाचे विस्तृत विवेचन श्री.विनय मोरे यांनी आपल्या २ तासांच्या व्याख्यानातून दिले. संवादाच्या माध्यमातून अनेक शंका आणि नियम व कायदे याबाबत विद्यार्थी व विद्यार्थीनींनी अनेक प्रश्न विचारून आपल्या शंका दूर केल्या.
त्यानंतर प्रमुख पाहुणे मा.वैशाली शिंदे सहाय्यक पोलीस आयुक्त वाहतूक शाखा यांनी मार्गदर्शन केले. आणि मोलाच्या सूचना दिल्या. तसेच तरुण पिढी हि देशाची संपत्ती आहे. आपण सर्वजण याच वयोगटातले आहात वाहतुकीचा कायदा असो अथवा इतर कायदे किंवा नियम आपण जरूर पाळले पाहिजेत. एक चांगला नागरिक म्हणून या देशाच्या विकासात योगदान दिले पाहिजे म्हणूनच यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने हा उपक्रम आयोजीत केल्याचे सोलापूर विभागीय केंद्राचे सदस्य श्री.दत्ता गायकवाड यांनी याप्रसंगी सांगितले.
दि.०७ सप्टेंबर २०१८ रोजी सकाळी वि. गु. शिवदारे कला व विज्ञान महाविद्यालय दुपारी शंकरराव पाटील विज्ञान महाविद्यालय अनगर ता. मोहोळ व सायंकाळी छत्रपती शिवाजी रात्र महाविद्यालय येथे सदर कार्यशाळा संपन्न झाली. दि.०८ सप्टेंबर रोजी सकाळी नागेश करजगी ओरचीड महाविद्यालय आणि दुपारी कुचन महाविद्यालय येथे ही कार्यशाळा संपन्न झाली.
सप्टेंबर ६, ७, ८ या तीन दिवसात सहा महाविद्यालयात एकूण सहा कार्यशाळा संपन्न झाल्या हा तीन दिवसांचा उपक्रम यशस्वी करण्यासाठी संगमेश्वर महाविद्यालयाचे प्रा.मोहोरकर, शिवदारे महाविद्यालयाच्या प्रा.सौ.शिवपूजे, छत्रपती शिवाजी रात्र महाविद्यालयाचे प्रा. गवळी, ओरचीड महाविद्यालययाचे प्रा. राजाराम चव्हाण तर कुचन महाविद्यालयाचे प्रा.निंबाळकर आणि तात्या महाविद्यालायाचे प्राध्यापक यांनी मोलाचे सहकार्य केले हि कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी सारथी सुरक्षाचे आनंदराजे भोसले यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे दिनेश शिंदे, प्रशांत बाबर आणि दत्ता भोसले यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अधिक परिश्रम घेतले.

Monday, 17 September 2018
सामाजिक व क्रीडा युवा पुरस्कार - २०१९
यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय
सामाजिक व क्रीडा युवा पुरस्कार - २०१९
सामाजिक व क्रीडा युवा पुरस्कार - २०१९
साठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई व
नवमहाराष्ट्र युवा अभियान यांचा उपक्रम...
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई व
नवमहाराष्ट्र युवा अभियान यांचा उपक्रम...
दरवर्षी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई व नवमहाराष्ट्र युवा अभियानाच्या वतीने राज्यस्तरीय सामाजिक व क्रीडा युवा पुरस्कार दिले जातात. सामाजिक व क्रीडा विभागात एक युवक व एक युवती यांना विशेष कामगिरीसाठी हा पुरस्कार दिला जातो. ‘यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा क्रीडा पुरस्कार’(युवक व युवती) व ‘यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा सामाजिक पुरस्कार’(युवक व युवती) असे एकूण चार पुरस्कार दिले जातात. क्रीडा व सामाजिक क्षेत्रात भरीव कामगिरी करुन इतर युवांसमोर एक आदर्श ठेवणार्या युवा वर्गाच्या कर्तृत्वाची दखल घेऊन त्यांना सन्मानित करण्याचा यामागे उद्देश आहे. पुरस्काराचे यंदाचे अठरावे वर्ष आहे.
महाराष्ट्रातील उत्कृष्ट खेळाडूंच्या कार्याचे मूल्यमापन होऊन त्यांचा गौरव व्हावा आणि प्रोत्साहन मिळावे, हे या क्रीडा पुरस्काराचे उद्दिष्ट आहे. तसेच महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी युवा आंदोलनाच्या क्षेत्रात विधायक व भरीव कार्य करणार्या युवक-युवतींची समाजाला ओळख व्हावी हे या सामाजिक युवा पुरस्काराचे उद्दीष्ट आहे. रु. २१,०००/- चा धनादेश, स्मृतीचिन्ह व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. पुरस्कारासाठी व्यक्तीचे वय ३१ डिसेंबर २०१७ अखेरीस ३५ वर्षांच्या आत असले पाहिजे. पुरस्कारासंबंधीची संपूर्ण माहिती व फॉर्म www.ycpmumbai.com या वेबसाईटवरुन डाऊनलोड करावे. आपले प्रस्ताव व अर्ज संपूर्ण माहितीनीशी दिलेल्या फॉर्मवर भरुन शनिवार दि. १ डिसेंबर २०१८ च्या आत संघटक, नवमहाराष्ट्र युवा अभियान, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, जनरल जगन्नाथराव भोसले मार्ग, मंत्रालयासमोर, मुंबई - २१ या पत्त्यावर, अथवा navmaharashtra@gmail.com या मेल आयडीवर पाठवावेत. या पुरस्कारासंबधी अधिक माहितीकरीता कार्यालयामध्ये ०२२-२२०२८५०८ या दूरध्वनी क्रमांकावर किंवा मनिषा खिल्लारे (९०२२७१६९१३) व मिनल सावंत (८४२४०७३३२२) यांच्याशी संपर्क साधावा. असे आवाहन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई-नवमहाराष्ट्र युवा अभियानाचे संयोजक दत्ता बाळसराफ, सहसंयोजक विश्वास ठाकूर, विजय कान्हेकर व संघटक नीलेश राऊत यांनी केले आहे.
डाऊनलोड माहितीपत्रक व फॉर्म
१) राज्यस्तरीय युवा क्रीडा पुरस्कार अर्ज - https://goo.gl/RiHYtM
२) राज्यस्तरीय युवा क्रीडा पुरस्कार नियमावली - https://goo.gl/vJ5Lnj
३) राज्यस्तरीय सामाजिक युवा पुरस्कार अर्ज - https://goo.gl/z8a8Us
४) राज्यस्तरीय सामाजिक युवा पुरस्कार नियमावली - https://goo.gl/EU2k7T

Thursday, 13 September 2018
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे चित्रपटप्रेमींसाठी शनिवारी ‘पेशन्स स्टोन’
नाशिक (प्रतिनिधी) : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिक व विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक, विश्वास ज्ञानप्रबोधिनी अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक, सारस्वत बँक व रेडिओ विश्वास ९०.८ कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘चित्रपट चावडी’ उपक्रमांतर्गत शनिवार १५ सप्टेंबर २०१८ रोजी सायंकाळी ६.३० वाजता सुप्रसिद्ध दिग्दर्शक अतिकी रहीमी यांचा ‘पेशन्स स्टोन’ हा चित्रपट दाखविण्यात येणार आहे.
सदर चित्रपट डिझास्टर मॅनेजमेंट अॅण्ड ट्रेनिंग हब, ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास को-ऑप. बँकेसमोर, सावरकरनगर, गंगापूर रोड, नाशिक येथे दाखविण्यात येणार आहे.
अफगाणिस्तानमध्ये घडलेली ही एक नाजूक आणि हृदयद्रावक कहाणी आहे. एक स्त्री आपल्या मूक पतीजवळ तिच्या जगण्याचा रहस्यमय, रोमांचकारी सत्यप्रवास कथन करते. त्यातूनच हा चित्रपट पुढे सरकत जातो. यात स्त्रीचे बालपण, एकाकीपण, तिची अपूर्ण स्वप्ने, इच्छा आकांक्षा मांडते. नात्यामधील असलेली जगण्याची आस आणि प्रेमभावना याचे विलक्षण मिश्रण यात आहे.
सन २०१२ मध्ये अफगाणिस्तान येथे प्रदर्शित झालेल्या या पर्शियन चित्रपटाचा कालावधी १०० मिनिटांचा आहे.
हा चित्रपट बघण्यास जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन अध्यक्ष विनायक पाटील, कार्याध्यक्ष विश्वास ठाकूर, सचिव डॉ.कैलास कमोद, कोषाध्यक्ष डॉ.सुधीर संकलेचा, सदस्य सौ.कविता कर्डक, राजवर्धन कदमबांडे, रऊफ पटेल, अॅड.नितीन ठाकरे व विक्रम मोरे यांनी केले आहे.

Tuesday, 11 September 2018
'बलुतं'ची चाळीशी
आता तुम्हीच प्रकाशाचे पुंजके व्हा
अन क्रांतीचा जयजयकार करा...
पद्मश्री दया पवार प्रतिष्ठान, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान (मुंबई) आणि ग्रंथाली वाचक चळवळ.....
आयोजित
'बलुतं'ची चाळीशी
कधी - गुरुवार, २० सप्टेंबर २०१८
सकाळी 10 ते सायंकाळी 6 पर्यंत
कुठे - रंगस्वर, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई
सविस्तर तपशिल लवकरच..

Thursday, 6 September 2018
विज्ञानगंगाचे तिसावे पुष्प कृत्रिम बुध्दिमत्ता
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई व मराठी विज्ञान परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने विज्ञानगंगा कार्यक्रमांतर्गत तिसावे पुष्प शास्त्रज्ञ सचिन सातपुते यांचे कृत्रिम बुध्दिमत्ता या विषयावरील व्याख्यान शुक्रवार दि २१ सप्टेंबर २०१८ रोजी सायंकाळी ५. वाजता चव्हाण सेंटर, सांस्कृतिक सभागृह, चौथा मजला, जनरल जगन्नाथराव भोसले मार्ग, मंत्रालया समोर, नरिमन पॉईंट मुंबई येथे गुंफणार आहे. तरी वरील कार्यक्रमास आपण उपस्थित रहावे ही विनंती.
बालाजी सुतार यांच्या कथेवर, कवितांवर आधारीत ‘गावकथा’ नाट्य-सादरीकरणाचा ९ सप्टेंबरला प्रयोग....
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - विभागीय केंद्र औरंगाबाद व स. भु. कला व वाणिज्य महाविद्यालय, औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दि. ९ सप्टेंबर २०१८ रोजी सायं. ६ ते ८ या वेळेत, गोविंदभाई श्रॉफ ललित कला अकादमी सभागृह, स. भु. कला व वाणिज्य महाविद्यालय, औरंगाबाद येथे ‘गावकथा’ हा बालाजी सुतार यांच्या कथांचे, ललित गद्याचे अंश आणि कविता यांच्यावर आधारित संहितेच्या नाट्य-सादरीकरण प्रयोगाचे आयोजन करण्यात आले आहे.हा नाट्यप्रयोग सध्या राज्यभर गाजत असून मुंबई पुण्यासह राज्यातील अनेक शहरांत या कार्यक्रमाचे प्रयोग झालेले आहेत.ग्रामीण महाराष्ट्रातील गाव-खेड्यांचा भोवताल, मागच्या दोन-तीन दशकांत अतिशय झपाट्याने बदलून गेला आहे.
सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक मूल्यभानाचा र्हासही खूप मोठ्या प्रमाणात झाला आहे. शेतीची बिकट अवस्था, स्त्रियांचं अवघड आयुष्य, दिशाहीन तरूणाई आणि मूल्यविहीन ग्रामीण राजकारण अशा अनेक अंगांनी गावाचा वेध घेणारी ही रंगमंचीय मांडणी आहे. ‘रंगदृष्टी, पुणे’या संस्थेने या प्रयोगाची निर्मिती केली असून संजय मोरे यांनी याचे दिग्दर्शन केले आहे. प्रयोगाला मयुर मुळे, दीप डबरे यांचे संगीत असून, संगीत साथ शिवानी कंधारकर, अनिरुद्ध गोरे, गोपाळ तिवारी यांनी केली आहे. यामध्ये संजय ठाकुर, महेंद्र प्रकाश, विनोद वणवे, अनिता डेंगळे, श्रीकांत शिवाजी, ऋताली वैद्य, रश्मी साळवी, तुषार हांडे, हर्षा ए.जी., अरबाज मुलानी आदी एकूण १६ कलाकारांचा चमू असून प्रयोगाचा वेळ साधारणपणे ऐंशी मिनिटांचा आहे. प्रवेश सर्वासाठी खुला असून नाट्यरसिक, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, काव्यरसिकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई विभागीय केंद्र औरंगाबादचे अध्यक्ष अंकुशराव कदम, कोषाध्यक्ष सचिन मुळे, सचिव नीलेश राऊत, डॉ. श्रीरंग देशपांडे, स. भु. कला वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जगदीश खैरनार, कार्यकारिणी सदस्य डॉ. भालचंद्र कांगो, प्रा. अजीत दळवी, बिजली देशमुख, डॉ. अपर्णा कक्कड, डॉ. मुस्तजीब खान, सुनील किर्दक, प्रा. दासू वैद्य, विजय कान्हेकर, डॉ. रेखा शेळके, सुहास तेंडूलकर, एमजीएम फिल्म आर्ट विभाग प्रमुख शिव कदम, सुबोध जाधव,गणेश घुले,मंगेश निरंतर,श्रीकांत देशपांडे, महेश अचिंतलवार,श्रीराम पोतदार आदींनी केले आहे
शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांचा सत्कार...
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई आणि विभागीय केंद्र ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षक दिनानिमित्त विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या शिक्षकांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. हा सत्कार समारंभाचा कार्यक्रम शनिवारी ८ सप्टेंबर २०१८ रोजी सकाळी ११ वाजता मो. ह. विद्यालय ठाणे येथे होणार असून या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे प्रभारी अध्यक्ष चंद्रशेखर ओक आणि संवादक प्रा. दीपा ठाणेकर या असतील.
सौ. वंदना मिश्रा चतुर्वेदी, सौ. प्राजक्ता पं सामंत, श्री. भगवान दत्तात्रय चक्रदेव, श्री. नरेंद्र वाबळे आणि डॉ. मृदुला निळे या शिक्षकांचा सत्कार करण्यात येणार आहे. ठाणे विभागीय केंद्राचे अध्यक्ष मुरलीधर नाले, उपाध्यक्ष महेश केळुसकर आणि सचिव अमोल नाले यांनी कार्यक्रमाला अधिक संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन केले आहे.

दिव्यांग व्यक्तींसाठी युनिक आयडी कार्ड (स्वालंबन कार्ड) नोंदणी शिबीराचे आयोजन
परभणी : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, अपंग हक्क विकास मंच, समाज कल्याण विभाग, जि. प. परभणी व महात्मा गांधी सेवा संघ परभणी संचलीत अपंग पुनर्वसन केंद्र परभणी यांच्या संयुक्त विद्यामाने परभणी जिल्ह्यातील अपंग व्यक्तींसाठी "स्वालंबन कार्ड/युनिक आयडी कार्डची ऑनलाईन नोंदणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. ८ सप्टेंबर २०१८ रोजी जि. प. कन्या प्रशाला, स्टेशन रोड, परभणी येथे सकाळी ११ वाजल्या पासून ते सायंकाळी ४ पर्यंत ऑनलाईन नोंदणी करण्यात येणार आहे. तरी कार्डसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे दिव्यांग ऑनलाईन प्रमाणपत्र, आधार कार्ड, सही/अंगठा, शाळा सोडल्याचा दाखला, रेशन कार्ड, फोटो इत्यादी कागदपत्रे घेवून उपस्थितीत रहावे असे मा. जि. समाज कल्याण अधिकारी जि. प. परभणी. मा. श्री. आर. जी. गायकवाड (वै. सा. का. परभणी) आणि मा. श्री. विजय कान्हेकर (संचालक तथा सचिव म. गा. से. सं. परभणी) यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी मा. श्री. विष्णू वैरागड संपर्क - ९८५०१४१४३१
Wednesday, 5 September 2018
स्व-संरक्षण प्रशिक्षण वर्ग
आजच्या काळात आत्मरक्षण अथवा स्व-संरक्षण ही बाब महिला, पुरूष, मुले, ज्येष्ठ नागरिक यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. आज महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक यांच्यावर होणारे हल्ले ही चिंताजनक बाब लक्षात घेऊन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबईच्या नवमहाराष्ट्र अभियानातर्फे स्व-संरक्षण प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रशिक्षण वर्गाचा कार्यक्रम शनिवारी १५ सप्टेंबर २०१८ रोजी दुपारी २ ते ५ यावेळेत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, जनरल जगन्नाथराव भोसले मार्ग, नरिमन पॉईंट, मुंबई येथे होईल. प्रवेश विनामुल्य असून संपर्क अरविंद खैरे यांच्याशी साधावा - ९८१९५०१५३२
Friday, 31 August 2018
‘चित्रपट चावडी’तर्फे चित्रपटप्रेमींसाठी ‘दिग्दर्शक इंगेमार बर्गमन फिल्म उत्सव’
नाशिक : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिक व विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक, विश्वास ज्ञानप्रबोधिनी अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक, सारस्वत बँक व रेडिओ विश्वास ९०.८ कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘चित्रपट चावडी’ उपक्रमांतर्गत शनिवार १ सप्टेंबर व रविवार २ सप्टेंबर २०१८ रोजी सुप्रसिद्ध स्विडीश इंगेमार बर्गमन फिल्म उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर चित्रपट क्लब हाऊस, ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास को-ऑप. बँकेसमोर, सावरकरनगर, गंगापूर रोड, नाशिक येथे दाखविण्यात येणार आहेत.
इंगेमार बर्गमन यांचा सिनेमा जागतिक सिनेमा सृष्टीत क्लासिक किंवा अभिजात म्हणून ओळखला जातो. मानवी संबंधांची गुंतागुंत, अनेक मानव निर्मित संस्था व सामाजिक अनुबंध व त्यातील परस्पर व्यवहार यावर भाष्य करणारा त्यांचा सिनेमा अनुभव विश्व समृद्ध करणारा आहे. त्यांच्या सिनेमातील पात्रे व प्रतिमासृष्टी सिनेमाला एका वेगळ्याच उंचीवर घेऊन जातात. अत्यंत मनस्वी, कलंदर अशा बर्गमन यांनी तटस्थपणे व तीव्रपणे मानवी संवेदनांचा, सबंधांचा व व्यवहारांचा शोध घेतला.
शनिवार १ सप्टेंबर २०१८ रोजी सायंकाळी ४.३० ते ५.३० या वेळेत बर्गमन यांच्या कारकीर्दीचा वेध घेणार्या लघुपटाचे सादरीकरण होणार आहे.
रविवार २ सप्टेंबर २०१८ रोजी दुपारी २ ते रात्री ९ या वेळेत बर्गमन यांनी दिग्दर्शित केलेले खालील चित्रपट दाखविण्यात येणार आहेत.
१)वाईल्ड स्ट्रॉबेरीज : हा एक रूपकात्मक रोड मुव्ही आहे. चित्रपटात वर्तमान आणि भूतकाळ, स्वप्न आणि सत्य ह्यांचा सतत लपंडाव चालू रहातो. एका वयोवृद्ध प्राध्यापकाचा ह्या बाह्य आणि त्याच्या अंर्तजगताचा शोध अत्यंत मनोरंजक आहे. सदर चित्रपट १९५७ मध्ये प्रदर्शित झालेला असून कालावधी ९१ मिनीटांचा आहे.
२)सेवन्थ सील : युरोपातील धर्मयुद्धांचा कालखंड, प्लेगच्या साथीनी थैमान घातलेले ह्या पार्श्वभूमीवर एक सरदार व त्याचा उचभ्रु मित्र एका मोहिमेवरून घरी येत असतात. मृत्युचे, भितीचे, रोगराईचे, स्वदेशातील वातावरण त्यांना खिन्न करते. त्यातच त्यांची गाठ प्रत्यक्ष मृत्युशी पडते. सरदार मृत्युबरोबर बुद्धीबळाचा पट मांडतो. मृत्युला सरदाराचे नियतीतून सुटका नाही याची खात्री असते. त्यातुन अनेक मुलभूत तात्विक प्रश्न निर्माण होतात. बर्गमनच्या प्रतिभेचा उत्तुंग अविष्कार म्हणजे सेवन्थ सील. सदर चित्रपट १९५७ मध्ये प्रदर्शित झालेला असून कालावधी ९६ मिनीटांचा आहे.
३) समर इंटरल्युड : ही मारीची एका बॅलेरीनाची गोष्ट आहे. स्वान लेक ह्या बॅलेचा सराव चालू असतांना तिला टपालाने पाठविलेली एक डायरी मिळते. तेरा वर्षांपूर्वी तीची एका हेन्सीक नावाच्या तरूणाशी गाठ पडलेली असते. त्यातून त्या दोघांची मैत्रीही जुळते. तेरा वर्षांनी तिच्या आयुष्यात घडलेल्या सर्व घटनांच्या कडु गोड स्मृती त्या डायरीच्याद्वारे जाग्या होतात. सदर चित्रपट १९५१ मध्ये प्रदर्शित झालेला असून कालावधी ९६ मिनीटांचा आहे.
४) ऑटम सोनाटा : जगप्रसिद्ध पियानो वादक शार्बेट आणि तिच्या मुलींच्या संबंधांची ही नाट्यमय कहाणी आहे. शार्लोट आता निवृत्तीनंतरचे जीवन जगत आहे. तिच्या वादनाच्या कारकिर्दीत तिचे आपल्या इव्हा व हेलेन ह्या मुलींकडे दुर्लक्ष झाले आहे. इव्हाच्या घरी ती येते. तेथे तिची हेलेन ह्या तिच्या मतीमंद मुलीशीही गाठ पडते. इव्हा व शार्लोट ह्यांच्या भेटीमध्ये इतक्या वर्षांच्या तणावाचे निराकरण होते कां? सदर चित्रपट १९७८ मध्ये प्रदर्शित झालेला असून कालावधी १०० मिनीटांचा आहे.
हे चित्रपट बघण्यास जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन अध्यक्ष विनायक पाटील, कार्याध्यक्ष विश्वास ठाकूर, सचिव डॉ.कैलास कमोद, कोषाध्यक्ष डॉ.सुधीर संकलेचा, सदस्य सौ.कविता कर्डक, राजवर्धन कदमबांडे, रऊफ पटेल, अॅड.नितीन ठाकरे व विक्रम मोरे यांनी केले आहे.

Monday, 27 August 2018
फोम फ्लोअर (तीनदिवसीय कार्यशाळा)
सध्या विविध कार्यक्रमात आणि रोजही फोम फ्लोअरचे विविध प्रकार वापरले जात आहेत. ते कसे बनवले जातात व त्याचं साहित्य काय असेल अशी शंका प्रत्येक महिलेच्या मनामध्ये असते, त्याच अनुषंगाने यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबईच्या महाराष्ट्र महिला व्यासपीठातर्फे फोम फ्लोअर तीनदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेत प्रियांका घरात या प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन करणार आहेत. विशेष म्हणजे मर्यादीत १२ सीट असून प्रथम येणा-यास प्राधान्य देण्यात येईल.
नेकलेस विथ अरनिंग, फिंगर रिंग, ब्रेसलेट, हेअर ब्रोच, सारी ब्रोच इत्यादी प्रकार शिकविले जाणार आहेत. प्रत्येक प्रशिक्षणार्थीकडून २००० रूपये शुल्क, आणि १०५० मटेरिअल्स शुल्क आकारले जाईल.
ही कार्यशाळा ५,६,७ सप्टेंबरला दुपारी २ ते ५ यावेळेत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, बेसमेन्ट हॉल, जनरल जगन्नाथ भोसले मार्ग, सचिवालया शेजारी नरिमन पॉईंट येथे सुरू होईल. संपर्क संजना पवार ८२९१४१६२१६, २२०४५४६०, २२०२८५९८ (२४४)
कॅफे स्टाईल कॉफी घरी कशी तयार करतात (एकदिवसीय कार्यशाळा)
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबईच्या महाराष्ट्र महिला व्यासपीठातर्फे कॅफे स्टाईल कॉफी घरी कशी तयार करतात या विषयावरती एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेत पल्लवी नेने या प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन करणार आहेत. विशेष म्हणजे मर्यादीत सीट असून प्रथम येणा-यास प्राधान्य देण्यात येईल.
कार्यशाळेत क्रन्ची कॉफी, चोकोमोचा, हॉट चॉकलेट, क्रीमी कोल्ड कॉफी, हॉट कॉफी आणि ट्रॅडीशनल हॉट कॉफी इत्यादी प्रकार शिकविले जाणार आहेत. प्रत्येक प्रशिक्षणार्थीकडून ८५० रूपये शुल्क आकारले जाईल. त्यामध्ये प्रिंटेड नोटस् आणि कॉफीसाठी लागणारं सर्व साहित्य पुरवलं जाईलं.
ही कार्यशाळा शनिवारी १ सप्टेंबरला ४ वाजता यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, बेसमेन्ट हॉल, जनरल जगन्नाथ भोसले मार्ग, सचिवालया शेजारी नरिमन पॉईंट येथे सुरू होईल. संपर्क संजना पवार ८२९१४१६२१६, २२०४५४६०, २२०२८५९८ (२४४)

Sunday, 26 August 2018
६० वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत कृत्रिम अवयव व सहाय्यभूत साधने वाटप
सामाजिक न्याय एवं अधिकारीता मंत्रालय, भारत सरकार भारतीय कृत्रिम अंग निर्माण (अलिमको) कानपूर जिल्हा परिषद, पुणे जिल्हा परिषद, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई अपंग हक्क विकास मंच आणि जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्र, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे जिल्ह्यातील ९ तालुक्यांमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी वयोश्री योजनेअंतर्गत ६० वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत कृत्रिम अवयव व सहाय्यभूत साधने वाटप केंद्रिय स.क.मंत्री कृष्णपाल गुर्जर,मा खा.शरदचंद्रजी पवार,मा.खा.सुप्रियाताई सुळे यांच्या उपस्थिती करण्यात आले.
विवेकवादी चळवळीत हवी तरूणांची साथ हवी - मुक्ता दाभोळकर
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र ठाणे, कोकण मराठी साहित्य परिषद, युवा शक्ती मुंबई-ठाणे यांच्या विद्यमाने डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या स्मरण दिनानिमित्त विवेकवादी चळवळीत हवी तरूणांची साथ हवी आणि वक्तृत्व स्पर्धा आणि संवाद लेखन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. विशेष म्हणजे मुंबई-ठाण्यातील अधिक विद्यार्थ्यांनी स्पर्धेत भाग घेतला.
प्रशिक्षक, विद्यार्थी आणि पालक यासर्वांनी दोन वर्ग भरून गेले होते. अ आणि ब असे दोन गट करून दुपारी २ वाजता स्पर्धेला सुरूवात झाली. वेगवेगळे विषय समोर असताना १) डॉ. नरेंद्र दाभोळकर यांनी भारतीय समाजासाठी दिलेले योगदान २) डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची ग्रंथसंपदा या दोन विषयांवर पूर्व पदवीधरकांचा या विषयांवरती बोलण्याचा कल अधिक होतो. महाविद्यालयीन विद्यार्थी मोबाईल या विषयावरती अधिक बोलले.
व्याख्यानाच्या सुरूवातीला मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांचं प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. त्यानंतर अमोल नाले यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविकं केलं. सुरूवातीला मुक्ता दाभोळकर यांनी तरूणांनी विवेकवादी का व्हायला हवं हे समजून सांगितलं, त्यानंतर विविध विषयांवर मार्गदर्शन केले. कार्यंक्रमाचा विडिओ या लिंकवर उपलब्ध आहे. https://youtu.be/g84gINPo7H8
इनकन टॅक्स आणि जीएसटी संबंधीत को-ऑपरेटिव्ह सोसायटी विषयावरती मार्गदर्शन
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या महाराष्ट्र महिला व्यासपीठातर्फे इनकन टॅक्स आणि जीएसटी संबंधीत को-ऑपरेटिव्ह सोसायटी या विषयावरती मंगळवारी ४ सप्टेंबर २०१८ रोजी दुपारी २ ते ५ यावेळेत सनदी लेखापाल (सीए) अजीत जोशी हे उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. तसेच हा कार्यक्रम बेसमेंट हॉल, चव्हाण सेंटर, जनरल जगन्नाथ भोसले मार्ग, सचिवालयाच्या शेजारी, नरिमन पॉईंट येथे होईल. संपर्क संजना पवार ८२९१४१६२१६, २२०४५४६०, २२०२८५९८ (२४४)
Monday, 20 August 2018
वयोश्री योजनेअंतर्गत ६० वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत कृत्रिम अवयव व सहाय्यभूत साधने वाटप
सामाजिक न्याय एवं अधिकारीता मंत्रालय, भारत सरकार भारतीय कृत्रिम अंग निर्माण (अलिमको) कानपूर जिल्हा परिषद, पुणे जिल्हा परिषद, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई अपंग हक्क विकास मंच आणि जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्र, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे जिल्ह्यातील ९ तालुक्यांमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी वयोश्री योजनेअंतर्गत ६० वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत कृत्रिम अवयव व सहाय्यभूत साधने वाटप शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
शुक्रवारी २४ ऑगस्ट २०१८ रोजी ग. दी माडगुळकर सभागृह, विद्या प्रतिष्ठान, एम. आय. डी. सी, बारामती पुणे येथे सकाळी १० वाजता ते सायंकाळी ६ पर्यंत ज्येष्ठ नागरिकांची तपासणी करण्यात येईल. यापूर्वी तपासणी झालेल्या व मोजमाप केलेल्या ३५०० ज्येष्ठ नागरिकांना कृत्रिम अवयव व सहाय्यभूत साधनांचे वाटप करण्यात येईल.
या कार्यक्रमाला मा. ना. थावररचंदजी गेहलोत (केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री) मा. खा. शरदचंद्रजी पवार साहेब (अध्यक्ष यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई) मा. खा. सौ. सुप्रिया सुळे ( निमंत्रक, अपंग हक्क विकास मंच, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई) मा. आ. अजित पवार, मा. श्री. रूपेश जयवंशी (आयुक्त, अपंगकल्याण आयुक्तालय, पुणे) मा. श्री. नवलकिशोर राम (जिल्हाधिकारी, पुणे) याचबरोबर केंद्रातील राज्यातील सचिव, आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती असेल.

Sunday, 19 August 2018
मराठी साहित्य, भाषा आणि संस्कृतीसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करणे गरजेचे आहे
मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी साहित्य, भाषा आणि संस्कृतीसाठी काय करता येणे शक्य आहे तसेच उत्तम कार्यक्रम कसे करता होतील आणि विचारांची, साहित्याची देवघेव होऊन एकूणच मराठी भाषा/वाड्:मयाचा विकास कसा साधता येईल या विषयावरती बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. विविध महाविद्यालयातील विद्यार्थी आणि प्राध्यापक कार्यक्रमाला हजर होते.
मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय ही राज्यातील एक नामांकित संस्था आहे. मराठी वाड्:मय, भाषा आणि संस्कृती या क्षेत्रात संस्थेचे मोठे कार्य आहे. मुंबईत संस्थेच्या असलेल्या ४४ शाखांच्या माध्यमातूंन अनेक उपक्रम सुरू आहेत.
बैठकीला उपस्थित राहिलेल्या प्राध्यापकांनी सहली, पुस्तक प्रकाशन सारखे विविध उपक्रम राबिवण्याचा सल्ला आयोजकांना दिला. तसेच विद्यार्थ्यांनी कविता वाचन करत येणाऱ्या पिढीला ईरिडिंग विचार करावा असेही सांगितले.

औरंगाबादेत युवा स्वातंत्र्य ज्योत रॅली उत्साहात संपन्न
औरंगाबाद : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - विभागीय केंद्र औरंगाबाद - नवमहाराष्ट्र युवा अभियान व रोटरॅक्ट क्लब ऑफ औरंगाबाद एअरपोर्ट यांच्या संयुक्त विद्यमाने युवकांमध्ये राष्ट्रभावना जागृत व्हावी या भावनेने ‘युवा स्वातंत्र ज्योत रॅली’चे आयोजन स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच मंगळवार, दि. १४ ऑगस्ट रोजी करण्यात आले होते. रॅलीचे उद्घाटन विभागीय केंद्राचे कार्यकारिणी सदस्य डॉ.श्रीरंग देशपांडे यांच्या हस्ते सायं. ६ वा. मशाल प्रज्वलीत करून करण्यात आले. यावेळी विभागीय केंद्राचे सचिव नीलेश राऊत, सुहास तेंडुलकर, रोटरी क्लब ऑफ औरंगाबाद सेंटरचे अध्यक्ष आशुतोष बडवे, डीआरआर रोटरॅक्ट क्षितिज चौधरी, सुबोध जाधव, गणेश घुले, डॉ.दिनेश वंजारे, श्रीकांत देशपांडे, श्रीराम पोतदार आदी मान्यवर होते.
रॅलीचे यंदा अकरावे वर्ष होते,रॅली चा समारोप पैठणगेट येथे भारतीय संविधानाच्या सरनामा वाचनाने व राष्ट्रगीताने झाला. याप्रसंगी तीनशेहून अधिक युवांची उपस्थिती होती.रॅलीच्या यशस्वीतेसाठी मंगेश निरंतर, प्रवीण देशमुख, दीपक जाधव, डॉ.राहुल बडे, ऍड.तथागत कांबळे, ऍड.सुस्मिता दौड, अक्षय गोरे, सचिन दाभाडे, ऋषिकेश खंडाळे, सुशील बोर्डे, ओंकार तेंडुलकर, प्रभाकर लिंगायत, गिरीजाराम क्षिरसागर, उमेश राऊत, निलेश काळे,निलेश निकम आदींनी पुढाकार घेतला.

देशासाठी लढणार्यांचे स्मरण करून प्रत्येकाने देशहिताचा विचार करावा- विश्वास ठाकूर
नाशिक : देशासाठी लढणार्या हुतात्म्यांचे स्मरण करून देश विकासासाठी व देशरक्षणासाठी प्रत्येकाने पुढे येणे गरजेचे असून लोकशाही मूल्यांची जपणूक करून समानता जोपासावी. असे प्रतिपादन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, विभागीय केंद्र नाशिकचे कार्याध्यक्ष विश्वास ठाकूर यांनी केले.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिक, नवमहाराष्ट्र युवा अभियान, विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक, विश्वास ज्ञानप्रबोधिनी अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक, सारस्वत बँक व रेडिओ विश्वास ९०.८कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने ७२ व्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला ‘युवा स्वतंत्रता ज्योत रॅली’चे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी ७ वाजता हुतात्मा चौक, गंगापूर रोड येथून रॅलीला प्रारंभ झाला. गंगापूरनाका, के.टी.एच.एम. महाविद्यालय, अशोकस्तंभ, मेहेर सिग्नल, हुतात्मा स्मारक सीबीएस येथे रॅलीचा समारोप झाला. त्यावेळी अर्चना भागवत यांनी राज्यघटनेच्या सरनाम्याचे सामुहिक वाचन केले. भारतमातेच्या वेशातील मुलगी सजविलेल्या रथात विराजमान झालेली होती.
यावेळी उपस्थित युवकांनी देशभक्तीपर गीतांनी व घोषणांनी वातावरणात चैतन्य निर्माण केले. रॅलीत अनेक सामाजिक संस्था उत्स्फुर्तपणे सहभागी झाल्या होत्या. रॅलीच्या सुरूवातीला शिक्षण व आरोग्यविषयक प्रबोधनपर पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले. रॅलीमध्ये प्रतिष्ठानचे कोषाध्यक्ष डॉ. सुधीर संकलेचा, सदस्य अॅड. नितिन ठाकरे तसेच अमर भागवत, चंद्रशेखर ओढेकर, किरण निकम, प्रसाद पाटील, गोरख चव्हाण, विवेकराज ठाकूर, मंदार ठाकूर, कैलास सुर्यवंशी, किशोर त्रिभुवन, रमेश बागुल, सुरेश वाघ, पूनम काशिकर, प्रियंका ठाकूर तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर सहभागी झाले होते.
‘चित्रपट चावडी’ तर्फे चित्रपटप्रेमींसाठी शनिवारी ‘द मिस्टीक मॅस्युर’
नाशिक : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिक व विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक, विश्वास ज्ञानप्रबोधिनी अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक, सारस्वत बँक व रेडिओ विश्वास ९०.८ कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘चित्रपट चावडी’ उपक्रमांतर्गत शनिवार १८ ऑगस्ट २०१८ रोजी सायंकाळी ६.३० वाजता सुप्रसिद्ध दिग्दर्शक ईस्माईल मर्चंट यांचा ‘द मिस्टीक मॅस्युर’ हा चित्रपट दाखविण्यात येणार आहे.
सदर चित्रपट डिझास्टर मॅनेजमेंट अॅण्ड ट्रेनिंग हब, ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास को-ऑप. बँकेसमोर, सावरकरनगर, गंगापूर रोड, नाशिक येथे दाखविण्यात येणार आहे.
नोबेल पारीतोषिक विजेते लेखक विद्याधर सुरजप्रसाद नायपॉल (व्ही.एस. नायपॉल) यांचे नुकतेच निधन झाले. ते भारतीय वंशाचे पण त्रिनीदाद, टोबॅगो येथील रहिवासी त्यांच्या पहिल्याच कादंबरीवर आधारीत द मिस्टीक मॅस्युर हा चित्रपट आहे.
साधारण १९४० चे त्रिनीदाद हे शहर एक ब्रिटीश वसाहत तिथे गणेश रामसेयोर नावाचा भारतीय वंशाचा तरूण व त्याची पत्नी लीला रहात असतात. गणेश लेखक होण्याची स्वप्ने पहातांना हिंदु धर्माचा प्रचार करतो. परंतु, त्याची किर्ती हळुहळु दैवी शक्ती असलेला अशी झाली. गणेशच्या महत्त्वाकांक्षा वाढत जातात. त्यानंतर नेमके काय घडते? हे बघण्यासाठी अवश्य या. सन २००१ मध्ये प्रदर्शित झालेल्या या इंग्लिश चित्रपटाचा कालावधी ११७ मिनिटांचा आहे.
हा चित्रपट बघण्यास जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन अध्यक्ष विनायक पाटील, कार्याध्यक्ष विश्वास ठाकूर, सचिव डॉ.कैलास कमोद, कोषाध्यक्ष डॉ.सुधीर संकलेचा, सदस्य सौ.कविता कर्डक, राजवर्धन कदमबांडे, रऊफ पटेल, अॅड.नितीन ठाकरे व विक्रम मोरे यांनी केले आहे.
सदर चित्रपट डिझास्टर मॅनेजमेंट अॅण्ड ट्रेनिंग हब, ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास को-ऑप. बँकेसमोर, सावरकरनगर, गंगापूर रोड, नाशिक येथे दाखविण्यात येणार आहे.
नोबेल पारीतोषिक विजेते लेखक विद्याधर सुरजप्रसाद नायपॉल (व्ही.एस. नायपॉल) यांचे नुकतेच निधन झाले. ते भारतीय वंशाचे पण त्रिनीदाद, टोबॅगो येथील रहिवासी त्यांच्या पहिल्याच कादंबरीवर आधारीत द मिस्टीक मॅस्युर हा चित्रपट आहे.
साधारण १९४० चे त्रिनीदाद हे शहर एक ब्रिटीश वसाहत तिथे गणेश रामसेयोर नावाचा भारतीय वंशाचा तरूण व त्याची पत्नी लीला रहात असतात. गणेश लेखक होण्याची स्वप्ने पहातांना हिंदु धर्माचा प्रचार करतो. परंतु, त्याची किर्ती हळुहळु दैवी शक्ती असलेला अशी झाली. गणेशच्या महत्त्वाकांक्षा वाढत जातात. त्यानंतर नेमके काय घडते? हे बघण्यासाठी अवश्य या. सन २००१ मध्ये प्रदर्शित झालेल्या या इंग्लिश चित्रपटाचा कालावधी ११७ मिनिटांचा आहे.
हा चित्रपट बघण्यास जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन अध्यक्ष विनायक पाटील, कार्याध्यक्ष विश्वास ठाकूर, सचिव डॉ.कैलास कमोद, कोषाध्यक्ष डॉ.सुधीर संकलेचा, सदस्य सौ.कविता कर्डक, राजवर्धन कदमबांडे, रऊफ पटेल, अॅड.नितीन ठाकरे व विक्रम मोरे यांनी केले आहे.
मान्यवरांनी पेमानंद रूपवते यांच्या आठवणींना उजाळा दिला
कालकथित प्रेमानंद रुपवते यांचे शनिवार दि. ४ ऑगस्ट २०१८ रोजी दु:खद निधन झाले. त्यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई , बहुजन शिक्षण संघ आणि चेतना संस्था, तसेच विविध संस्था –संघटना-मित्रपरिवार यांच्या संयुक्त विद्यमाने यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान,मुंबई जनरल जगन्नाथ भोसले मार्ग, मंत्रालयाजवळ, मुंबई येथे स्मृती –अभिवादन सभेचे आयोजन केले होते. या सभेस मा. बाळासाहेब थोरात , मा. सुप्रिया सुळे, मा. डॉ. भालचंद्र मुणगेकर, मा. मिलिंद रानडे, मा. आनंदराज आंबेडकर, मा. भीमराव पांचाळे, मा. रावसाहेब कसबे, मा. क्रांती शाह, मा. लामा लोबझांग, मा. उल्हास पवार, मा. डॉ. सुधीर तांबे, मा. मधुकरराव पिचड आदि मान्यवर उपस्थित होते. सर्वांना रूपवते यांच्या आठवणींना उजाळा दिला. संपुर्ण कार्यक्रम या लिंक वरती उपलब्ध आहे. https://www.facebook.com/ybchavanpratishthan/videos/311493786075160
Monday, 13 August 2018
घरी पिज्जा कसा तयार करायचा (एकदिवसीय कार्यशाळा)
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या महाराष्ट्र महिला व्यासपीठातर्फे स्पेशल पॅन पिज्जाची एकदिवसीय कार्यशाळा आयोजीत करण्यात आली आहे. कुकिंग मंत्रा अकादमीच्या अध्यक्ष पल्लवी नेने सहभागी होणा-या प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन करतील. शुक्रवारी २४ ऑगस्ट २०१८ रोजी दुपारी २ ते ५ यावेळेत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान बेसमेंट हॉल, जनरल जगन्नाथ भोसलेमार्ग, नरिमन पॉईट येथे कार्यशाळा होईल. (ही कार्यशाळा फक्त २० लोकांसाठी असून प्रथम संपर्क साधणा-यास पहिले प्राधान्य दिले जाईल.)
कार्यशाळेत सहभागी होणा-या प्रत्येक प्रशिणार्थीकडून १५०० रूपये शुल्क आकारलं जाईल. त्याबरोबर घरी ज्वारी, बाजरी, गहू, यांच्या पीठापासून पीज्जा कसा तयार करता येईल. तसेच सॉस, बीबीक्यू, डबल चीज, स्पेशल पनीर, असे अनेक पीज्जाचे प्रकार घरी कसे तयार करायचे याबाबतही नेने मार्गदर्शन करणार आहेत.
कार्यशाळेला लागणारं सर्व साहित्य महाराष्ट्र महिला व्यासपीठातर्फे पुरवलं जाईल. त्याच्यासोबत तूम्हाला नोटस देण्यात येतील. तसेच प्रक्टील सत्र, पिज्जा बनवण्याच्या आणखी नवीन पध्दती, आरोग्याला हितकारण रेसीपी, शिकवतं असताना तयार केलेल्या पिज्जाची टेस्ट सुध्दा सहभागी प्रशिक्षणार्थीला देण्यात येईल. संपर्क संजना पवार - ८२९१४१६२१६, २२०४५४६०, २२०२८५९८
धनकवडी येथे ६०० कर्णबधिर व्यक्तिंना मोफत श्रवणयंत्र
स्टार्की फाउंडेशन अमेरिका, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई विभागीय केंद्र अपंग हक्क विकास मंच, आरव्हीएस एज्युकेशनल अॅन्ड चॅरिटेबल फाऊंडेशन, मुंबई, ठाकरसी ग्रुप, मुंबई, विद्या प्रतिष्ठान, बारामती, पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई आणि महात्मा गांधी सेवा संघ संचलित जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्र पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आज शरदचंद्र जी पवार बहुउद्देशीय केंद्र धनकवडी येथे ६०० कर्णबधिर व्यक्तिंना मोफत श्रवणयंत्र देण्यात आले.
या कार्यक्रमास यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या कार्यध्यक्ष मा.सुप्रियाताई सुळे, मा. आयुक्त रुचेश जयवंशी , मा. विजय कान्हेकर व संस्थेचे इतर कर्मचारी व पदाधिकारी उपस्थित होते.
बारामती मध्ये मोफत आधुनिक डिजिटल श्रवणयंत्र वाटप
स्टार्की फाऊंडेशन अमेरीका, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई अपंग हक्क विकास मंच, आरव्हीएस एज्युकेशनल अॅण्ड चॅरिटेबल फाऊंडेशन मुंबई, ठाकरसी ग्रुप मुंबई, विद्या प्रतिष्ठान बारामती, महात्मा गांधी सेवा संघ आणि जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्र पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने बारामती तालुक्यात ग्रामीण व शहरी विभागातील कर्णबधीर मुलांना व ज्येष्ठ नागरिकांना मोफत वैद्यकीय तपासणी करून मोफत आधुनिक डिजिटल श्रवणयंत्र वाटप करण्यात आले.
दिव्यांग कट्टयाला उस्फुर्त प्रतिसाद
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबईचे अपंग हक्क विकास मंचातर्फे दर महिन्याला होणा-या आयोजित दिव्यांग कट्टयामध्ये "स्टॉलधारक अपंग व्यक्तींच्या समस्या" या विषयाला अनुसरुन या विषयावरती नूकतीच चर्चा झाली.
कट्टयामध्ये बृन्हमुंबई, अंबरनाथ, कल्याण, ठाणे, उल्हासनगर, भिवंडी, वसई-विरार, बदलापुर या महानगरपालिका/ नगरपरिषदेतील अपंग व्यक्तींनी सहभाग घेतला, आपआपल्या महानगरपालिकेत, नगरपरिषदेत स्टॉलधारक अपंग व्यक्तींना मिळणा-या सोयी-सुविधा आणि निर्माण झालेल्या समस्यांची मांडणी करण्यात आली. रमेश कोळी यांच्या मदतीने पाठपुरावा करुन प्रतिष्ठानच्या माध्यमातुन बृन्हमुंबई महानगरपालिकेच्या 24 वार्डाच्या स्टॉलधारक अपंगांची तपशीलवार माहिती प्राप्त केली असल्याचे अब्दुल्ला शेख यांनी सांगितले, त्याच धर्तीवर माहितीचा अधिकार अंतर्गत इतर नगरपालिकेतील स्टॉलसंदर्भातील सर्व माहिती मागविण्यासाठी अर्ज संबंधित नगरपालिकांना देण्यात आल्याची माहिती कट्टयाचे संयोजक शमीम खान यांनी दिली. तसेच बृन्हमुंबई महानगरपालिका व परिसरातील काही नगरपालिका, नगरपरिषदेच्या प्रत्येक वार्डमध्ये विषयाच्या अनुषंगाने एक संघटक नेमण्यात येणार असल्याचे मंचाचे अनिल चाळके यांनी सांगितले. या कामाला अधिक वेग येण्यासाठी प्रत्येक नगरपालिकेच्या हद्दीत या विषयावर साप्ताहिक बैठका घेण्यात येतील असे खान म्हणाले शेवटी उपस्थित सर्वांचे आभार अंबरनाथचे रवी कौल यांनी मानले.

Subscribe to:
Posts (Atom)