Monday 7 May 2018

‘चित्रपट चावडी’ तर्फे चित्रपटप्रेमींसाठी शनिवारी ‘बॅबेल’


नाशिक : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिक व विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक, विश्वास ज्ञानप्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक, सारस्वत बँक व रेडिओ विश्वास ९०.८ कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘चित्रपट चावडी’ उपक्रमांतर्गत शनिवार ०५ मे २०१८ रोजी सायंकाळी ६.३० वाजता सुप्रसिद्ध दिग्दर्शक अलेजांडर इनारीतु यांचा ‘बॅबेल’ हा चित्रपट दाखविण्यात येणार आहे. सदर चित्रपट डिझास्टर मॅनेजमेंट अ‍ॅण्ड ट्रेनिंग हब (विश्वासलॉन्स), ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास को-ऑप. बँकेसमोर, सावरकरनगर, गंगापूर रोड, नाशिक- ४२२०१३ येथे दाखविण्यात येणार आहे.
मेक्सीकन सिनेमाचा उत्तुंग प्रतिभेचा तसेच आंतरराष्ट्रीय सिनेमाच्या तसेच मेनस्ट्रीम हॉलीवुड मध्येही तितक्याच ताकदीने मिरविणारा अलेजांडर इनारीतु हा प्रतिभावंत दिग्दर्शक आहे. आधुनिक समाजामध्ये विशेषत: शहरी जीवनात माणसांची आयुष्ये ही वरून जरी सुटी सुटी वाटली तरी एकमेकांशी घट्ट जोडलेली असतात. इनारीतु त्याच्या खास शैलीत कथानकांचे गोफ विणतो. त्यामध्ये त्यांची सुख:दु:खे, त्यांचे भोग, प्राक्तने, जन्म, मृत्यु सगळेच झपाटल्यासरखे विणलेले असतात. 
मेक्सीको येथे २००६ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बॅबेल’ या सिनेमाचा कालावधी १४३ मिनीटांचा आहे.
‘बॅबेल’ हा चित्रपट बघण्यास जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन अध्यक्ष विनायक पाटील, कार्याध्यक्ष विश्वास ठाकूर, सचिव डॉ.कैलास कमोद, कोषाध्यक्ष डॉ.सुधीर संकलेचा, सदस्य सौ.कविता कर्डक, राजवर्धन कदमबांडे, रऊफ पटेल, अ‍ॅड.नितीन ठाकरे व विक्रम मोरे यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment