Monday 10 July 2017

शेतक-यांची आंदोलने आत्ताच का ?

शेतक-यांची आंदोलने आत्ताच का ?

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र औरंगाबाद, एमजीएम जनसंवाद व वृत्तपत्र संवाद महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने देशभरात सुरू असलेल्या शेतक-यांच्या विविध आंदोलनाच्या अनुषंगाने शेतक-यांची आंदोलने आत्ताच का ? या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवारी १२ जुलै रोजी सकाळी १०.३० वा आईस्टाईन सभागृह, जेएनईसी महाविद्यालय एमजीएम परिसर औरंगाबाद व्याख्यानाला सुरूवात होईल. 
व्याख्यानाकरिता ज्येष्ठ पत्रकार व शेती प्रश्नाचे अभ्यासक मा. सुनील तांबे (मुंबई) यांना आमंत्रित करण्यात आलेले असून ते  देशभरातील शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य शासनाची भूमिका, दुष्काळामुळे प्रभावित कृषी जीवन, केंद्र सरकारचे आयात निर्यात धोरण  शेतकरी आंदोलनांमधील राजकीय सामाजिक सहभाग, कर्जमाफी आदी मुद्यांवर भाष्य करतील. 
सुनील तांबे हे मागील पंचवीस वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून कृषी पत्रकारितेच्या अनुषंगाने त्यांनी विपुल लेखन केलेले आहे. 'रॉयटर्स' या आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेत अनेक वर्ष त्यांनी कार्य केलेले असून 'शेती व मान्सून' तसेच हवामान बदल व त्याचा शेतीवर होणारा परिणाम' हे त्यांचे लिखानाचे विषय प्रामुख्याने राहिलेले आहे.
आताच्या परिस्थितीवर नेमकेपणाने सर्वांगीण मांडणी करणा-या या विशेष व्याख्यानाचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन विभागीय केंद्राचे अध्यक्ष नंदकिशोर कागलीवाल, कोषाध्यक्ष सचिन मुळे, सचिव मुकूंद भोगले, नीलेश राऊत, डॉ. अपर्णा कक्कड, डॉ. रेखा शेळके, सुहास तेंडूलकर, सुबोध जाधव, रेणुका कड आदींनी केलेले आहे.  

No comments:

Post a Comment