Wednesday, 19 July 2017

‘चित्रपट चावडी’ यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे चित्रपटप्रेमींसाठी शुक्रवारी ‘अ समर्स टेल’

‘चित्रपट चावडी’
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे
चित्रपटप्रेमींसाठी शुक्रवारी ‘अ समर्स टेल’


यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिक व विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक, विश्वास ज्ञानप्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक, सारस्वत बँक व रेडिओ विश्वास ९०.८ कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने
‘चित्रपट चावडी’ उपक्रमांतर्गत शुक्रवार २१जुलै २०१७ रोजी सायंकाळी ६.३० वाजता सुप्रसिद्ध फ्रेंच दिग्दर्शक एरिक रोहमर यांचा ‘अ समर्स टेल’ हा चित्रपट दाखविण्यात येणार आहे. सदर चित्रपट डिझास्टर मॅनेजमेंट अ‍ॅण्ड ट्रेनिंग हब (विश्वास लॉन्स), ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास को-ऑप.बँकेसमोर, सावरकरनगर, गंगापूर रोड, नाशिक-४२२०१३. येथे दाखविण्यात येणार आहे.
विविध ऋतुंवर आधारित कथानकांच्या मालिकेतील एरिक रोहमर यांची ‘अ समर्स टेल’ ही नर्मविनोदी प्रेमकथा आहे. तरूण गणिताचा विद्यार्थी पण गिटार वादनाचा शौक असलेल्या गॅस्पार्ड व त्याची मैत्रिण लेना यांच्या सुट्टीमध्येˆस्पेनमधील भेटीची पण भेटीच्या दरम्यान त्याची आणखी दोन स्त्रियांशी गाठ पडते. गॅस्पार्ड आता तीन वेगवेगळ्या स्त्रियांच्या भेटीमुळे गोंधळात पडला आहे. त्यातुन तो कसा मार्ग काढतो ते पहाण्यासाठी जरूर या. १९९६ मध्ये प्रदर्शित झालेल्या या सिनेमाचा कालावधी ११३ मिनीटांचा आहे.
न्यू सिनेमाच्या लाटेमधील एरिक रोहमर अपरिचित पण महत्त्वपूर्ण दिग्दर्शक आहे. चाळीसहून अधिक दर्जेदार सिनेमांचे दिग्दर्शन त्यांनी केले आहे. खास फ्रेंच ठसा असलेला एरिकचा सिनेमा म्हणजे थेट सरळ, सर्वसामान्यांच्या आयुष्यातील सहज घटना टिपणारा त्यातून आपल्याला सौंदर्यदृष्टी, नातेसंबंधाची जाणीव सहजपणे जाणवते.
‘अ समर्स टेल’ हा चित्रपट बघण्यास जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन कार्याध्यक्ष विश्वास ठाकूर, सचिव डॉ.कैलास कमोद, कोषाध्यक्ष डॉ.सुधीर संकलेचा, सदस्य सौ.कविता कर्डक, राजवर्धन कदमबांडे, रऊफ पटेल, अ‍ॅड.नितीन ठाकरे व विक्रम मोरे यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment