Friday 30 June 2017

नाशकात अम्ब्रेला पेंटींग कार्यशाळा

 नाशकात अम्ब्रेला पेंटींग कार्यशाळा

नाशिक : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिक व विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक, अबीर क्रिएशन्स, विश्वास ज्ञानप्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक, सारस्वत बँक, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ व विश्वास लॉन्स यांच्या संयुक्त विद्यमाने ख्यातनाम सुलेखनकार अच्युत पालव यांच्या अम्ब्रेला पेंटींग कार्यशाळेचे नाशकात आयोजन करण्यात आले आहे.
     रविवार दि. २ जुलै २०१७ रोजी सकाळी ९ ते दुपारी १२ या वेळात क्लब हाऊस (विश्वास लॉन्स), ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास को-ऑप. बँकेसमोर, सावरकरनगर, गंगापूररोड, नाशिक येथे सदर कार्यशाळा  होणार आहे.
     पावसाच्या अनेक रूपांचा शब्दांतून, अक्षरलेखनातून होणारा अविष्कार या कार्यशाळेत अनुभवास मिळणार आहे. ‘अम्ब्रेला पेंटींग’ हा नवा अक्षर सौंदर्याचा प्रकार अच्युत पालव यांनी विकसित केला आहे. कार्यशाळेत सहभागी होणार्‍या शिबिरार्थींकडून ‘अम्ब्रेला पेंटींग’ करून घेतले जाणार आहे. रंगरेषांचे सहज आणि सोप्या पद्धतीतून मार्गदर्शन सदर कार्यशाळेत अच्युत पालव करणार आहेत. गेली अनेक वर्षे महाराष्ट्रातील नव्हे तर भारतातील दुर्गम भागात जाऊन कॅलिग्राफीचा प्रसार  पालव करीत आहेत. कार्यशाळेसाठी लागणारे साहित्यही देण्यात येणार आहे. अधिक माहिती व नोंदणीसाठी चिंतामण पगार, मो. ९३७१६६१५०९, निलेश गायधनी, मो.९८८१४७२७७३, केतकी गायधनी, मो.७७६९९२२७७३ यांच्याशी संपर्क साधावा.
     तरी या कार्यशाळेस जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन कार्याध्यक्ष विश्वास ठाकूर, सचिव डॉ.कैलास कमोद, कोषाध्यक्ष डॉ.सुधीर संकलेचा, सदस्य सौ.कविता कर्डक, राजवर्धन कदमबांडे, रऊफ पटेल, अ‍ॅड.नितीन ठाकरे व विक्रम मोरे यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment