अपंग हक्क विकास मंच आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने 'दिव्यांग कट्टा' अंतर्गत 'दिव्यांग व्यक्ती आणि सरकारी विविध अर्थिक योजना' या विषयावरती मा. नंदकुमार फुले यांचे व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी २९ डिसेंबर २०१८ रोजी दुपारी २ वाजता बेसमेंट हॉल मध्ये दिव्यांग कट्ट्याला सुरूवात होईल. अपंग विकास मंचतर्फे दिव्यांग मित्र मंडळीसह बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. अधिक संपर्क - सुकेशनी शेवडे ८६५२११८९४९
Monday, 24 December 2018
Sunday, 23 December 2018
रविवारी सुप्रसिद्ध लेखक वसंत लिमये यांची जाहीर मुलाखत मुलाखतकार, आ. हेमंत टकले
नाशिक : लॉक ग्रिफिन, विश्वस्त या लोकप्रिय कादंबर्यांचे लेखक वसंत लिमये यांच्या जाहीर मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. श्री. लिमये यांची मुलाखत आ. हेमंत टकले घेणार आहेत.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिक व विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक, ग्रंथ तुमच्या दारी, विश्वास ज्ञानप्रबोधिनी अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक, सारस्वत बँक व रेडिओ विश्वास ९०.८ कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने सदर मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार दि. २३ डिसेंबर २०१८ रोजी सकाळी १०.३० वाजता डिझास्टर मॅनेजमेंट अॅण्ड ट्रेनिंग हब, ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास को-ऑप. बँकेसमोर, सावरकरनगर, गंगापूर रोड, नाशिक येथे हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.
आय.आय.टी. मधून मेकॅनिकल इंजिनिअरची पदवी घेऊन बाहेर पडलेल्या वसंत लिमये यांनी आय.टी. क्षेत्रातील मोठ्या पगाराची नोकरी न करता गिर्यारोहण, फोटोग्राफी व लेखन अशा विविध क्षेत्रात मुशाफिरी करत आहेत. लॉक ग्रिफिन, विश्वस्त, कॅम्पफायर अशा पुस्तकांनी त्यांनी आपला स्वतंत्र वाचक वर्ग निर्माण केला आहे. अशा बहुआयामी व्यक्तिमत्त्वाची जीवन व साहित्य प्रवासाची सफर मुलाखतीतून उलगडली जाणार आहे.
तरी या कार्यक्रमास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन अध्यक्ष विनायक पाटील, कार्याध्यक्ष विश्वास ठाकूर, सचिव डॉ.कैलास कमोद, कोषाध्यक्ष डॉ.सुधीर संकलेचा, सदस्य सौ.कविता कर्डक, राजवर्धन कदमबांडे, रऊफ पटेल, अॅड.नितीन ठाकरे व विक्रम मोरे तसेच विश्वास ज्ञानप्रबोधिनी अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष डॉ. मनोज शिंपी, ग्रंथ तुमच्या दारीचे शिल्पकार विनायक रानडे यांनी केले आहे.
Tuesday, 18 December 2018
सोलापूर विभागातर्फे यंदाचा यशवंतराव चव्हाण गौरव पुरस्कार डॉ. शिवाजीराव देशमुख यांना प्रदान
सोलापूर विभागीय केंद्र आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबईतर्फे पहिला यशवंतराव चव्हाण गौरव पुरस्कार महाराष्ट्रातील जेष्ठ विचारवंत प्रा. डॉ. अशोक चौसाळकर यांच्या शुभहस्ते प्रा. डॉ. शिवाजीराव देशमुख यांना हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या डॉ. वा.का.किर्लोस्कर सभागृहात प्रदान करण्यात आला रोख रु. १५,०००/- मानपत्र शाल व श्रीफळ व पुष्पहार असे या पुरस्काराचे स्वरूप होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. गो. मा. पवार होते.
देशमुख यांनी यशवंतराव चव्हाण साहेबांच्या साहित्यावर संशोधनावर केल्यामुळे डॉ. बाबासोहब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने त्यांना पीएचडी ही पदवी बहाल केली आहे. चव्हाण साहेबांच्या साहित्यावर पीएचडी करणारे देशमुख हे पहिले पीएचडी धारक आहेत. तसेच यशवंतराव चव्हाण यांच्या साहित्यावर त्यांचे ३ ग्रंथ प्रकाशित झाले आहेत. यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्धी निमित्त त्यांनी महाराष्ट्रात ३०० हून अधिक व्याख्याने दिली आहेत. त्यांच्या एकूण साहित्य सेवेबद्दल त्यांना यंदाचा यशवंतराव चव्हाण गौरव पुरस्कार देण्यात येत असल्याचे मा. दत्ता गायकवाड यांनी सांगितले.
महाराष्ट्र निर्मितीचा पाया आणि यशवंतराव चव्हाण या विषयावर प्रमुख पाहुणे प्रा. डॉ. अशोक चौसाळकर यांनी सखोल माहिती आपल्या व्याख्यानातून दिली. या प्रसंगी विभागीय केंद्राचे कोषाध्यक्ष राजशेखर शिवदारे सदस्य युन्नुसभाई शेख, दत्ता गायकवाड, राहुल शहा, दीपक साळुंखे आणि प्रकाश येलगुलवार यांच्यासह साहित्य कला सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मंडळी या समारंभात उपस्थित होते.

Tuesday, 11 December 2018
ज्येष्ठ नागरिकांचा कायदा आणि विविध योजना या विषयावरती कायदेविषयक मार्गदर्शन
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई आणि कायदेविषयक सहाय्य व सल्ला फोरम यांच्या 'आपला कायदा जाणून घ्या' या व्याख्यानमाले तर्फे 'ज्येष्ठ नागरिकांचा कायदा आणि विविध योजना' या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. या विषयावरती मा. अॅड. भुपेश सामंत हे मार्गदर्शन करणार असून हा कार्यक्रम शुक्रवारी १४ डिसेंबर २०१८ रोजी सायंकाळी ५ वा. बोर्ड रूम, पाचवा मजला, यशवंतराव चव्हाण केंद्र. जनरल जगन्नाथ भोसले मार्ग, नरिमन पाईंट, मुंबई येथे सुरू होईल.
Monday, 10 December 2018
Wednesday, 5 December 2018
९ व्या यशवंत आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलच्या नोंदणीला सुरूवात..

दरवर्षीप्रमाणे यंदाही बहुचर्चित यशवंत आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला १८ जानेवारी २०१९ ला सुरूवात होत आहे. चित्रपट महोत्सव यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई आणि पुणे फिल्म फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने चव्हाण सेंटर, जनरल जगन्नाथराव भोसले मार्ग, नरिमन पॉईंट येथे होणार आहे.
चित्रपट महोत्सवाचे हे नववे वर्ष असून १८ जानेवारी ते २४ जानेवारी दरम्यान होणा-या महोत्सवामध्ये ग्लोबल सिनेमा, रेट्रोस्पेक्टीव्ह, इंडियन सिनेमा, कंट्री फोकस आणि मराठी सिनेमा इत्यादी प्रकारचे सिनेमे दाखवण्यात येणार आहेत. तसेच ऑनलाईन नोंदणी पुढील लिंकवरती करता येईल www.yiffonline.com.
Subscribe to:
Posts (Atom)