आजच्या काळात आत्मरक्षण अथवा स्व-संरक्षण ही बाब महिला, पुरूष, मुले, ज्येष्ठ नागरिक यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची ठरली आहे. आज महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक यांच्यावर होणारे हल्ले ही चिंताजनक बाब लक्षात घेऊन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबईच्या नवमहाराष्ट्र अभियानातर्फे स्व-संरक्षण प्रशिक्षण वर्ग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रशिक्षण वर्गाचा कार्यक्रम शनिवारी दुपारी २ ते ५ यावेळेत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, जनरल जगन्नाथराव भोसले मार्ग, नरिमन पॉईंट, मुंबई येथे होईल. त्यानंतर हे प्रशिक्षण वर्ग आठवड्यातील सोमवार, बुधवार आणि शुक्रवार यादिवशी होणार आहेत. प्रवेश विनामुल्य असून संपर्क अरविंद खैरे यांच्याशी साधावा - ९८१९५०१५३२
Thursday, 28 June 2018
Tuesday, 26 June 2018
Thursday, 21 June 2018
लवकरचं एकल महिला धोरणाचा मसुदा मुख्यमंत्र्यांना देणार - कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे
विकास अध्ययन केंद्र आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने मागील दोन वर्षांपासून एकल महिलांसाठी स्वतंत्र धोरणाची आखणी करण्याचं काम सुरू होतं. मागील दोन वर्षांत बैठका, चर्चासत्र, राज्यभरातील लोकांची मतं घेऊन एक स्वतंत्र धोरणाचा मसूदा विविध संस्था आणि संघटनांनी तयार केला आहे.
मसूदा नूकताच यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांना सादर करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादीच्या आमदार मा. विद्याताई चव्हाण, डॉ.आशा मिरगे, विकास अध्ययन केंद्राचे संचालक मा. सुरेश शेळके उपस्थित होते. लवकरच हा मसुदा राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात येईल असे कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले.
मसूदा नूकताच यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांना सादर करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादीच्या आमदार मा. विद्याताई चव्हाण, डॉ.आशा मिरगे, विकास अध्ययन केंद्राचे संचालक मा. सुरेश शेळके उपस्थित होते. लवकरच हा मसुदा राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात येईल असे कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले.
Tuesday, 19 June 2018
कॅनव्हास पेंटिंगची कार्यशाळा
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबईच्या महाराष्ट्र महिला व्य़ासपीठातर्फे कॅनव्हास पेंटिंग कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा १६ जुलै ते २० जुलै दरम्यान यशवंत चव्हाण मध्ये सकाळी ११ ते सायंकाळी ६ यावेळेत बेसमेंट, यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये घेण्यात येणार आहे.
या कार्यशाळेत पोतकाम चित्रकला आणि चाकू चित्रकलेचे धडे देण्यात येणार असून यासाठी प्रशिक्षणार्थ्याकडून कोर्सची फी ३ हजार रूपये, तर मटेरिअल्स फी १ हजार रूपये आकारली जाईल. संपर्क संजना पवार - ८२९१४१६२१६, २२०४५४६०, २२०२८५९८ (२२४)
विनामूल्य आर्थिक गुंतवणूक मार्गदर्शन कार्यशाळा
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, महाराष्ट्र महिला व्यासपीठ आणि संवेदन प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने विनामूल्य आर्थिक गुंतवणूक मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा गुरूवार ५ जुलै २०१८ रोजी दुपारी ३ ते ५ यावेळेत बेसमेंट सभागृह, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान जनरल जगन्नाथ भोसले मार्ग, सचिवालय जिमखाना जवळ,नरिमन पॉईंट, मुंबई होणार आहे.
कार्यशाळेतील या विषयांवरती वाढती महागाई आणि घटते व्याजदर , वाढत चाललेळे दाम दुप्पट फसव्या योजनांचे प्रमाण, इन्शुरन्स का घ्यावा? का घेऊ नये?, उत्पन्न प्रमाणे आर्थिक शिस्त कशी असावी, नियोजन करताना कसा विचार करावा, शेअर बाजार , म्यूचुअल फंड ह्या बाबत सखोल चर्चा, सिप म्हणजे नक्की काय?जेष्ठ नागरिकांच्या दर महिना खरचायला हवे असलेले पैसे आणि त्या पैस्याचा वाढीचा दर ह्याचा समतोल कसा साधावा,जागतिक गुंतवणूक गुरू वॉरेन बफेट ह्यांचे विचार आणि नियम, समृद्ध आर्थिक विकासाच्या दृष्टीने पाउल कसे टाकावे! चर्चा करण्यात येणार आहे. संपर्क - संजना पवार - भ्रमणध्वनी 8291416261 कार्यालय - 22045460, 22028598
Thursday, 14 June 2018
'सूर पश्चिमेचे'मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयात...
'पाश्चात्य संगीतसंज्ञा कोश' या अशोक दा. रानडे लिखित आणि चैतन्य कुंटे संपादीत ग्रंथाच्या निमित्ताने लोकसत्ता, पॉप्युलर प्रकाशन, मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने 'सूर पश्चिमेचे' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे सादरकर्ते चैतन्य कुंटे असून हा कार्यक्रम शनिवार दिनांक २३ जून २०१८ रोजी सायंकाळी ५.३० वाजता, तिसरा मजला, मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय, दादर (पश्चिम) येथे होईल. मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाकडून कार्यक्रमाला अधिक संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
Subscribe to:
Posts (Atom)